सुविचार संग्रह भाग २
201 दुर्जन कितीही मातला तरी अखेर त्याला पापाचे शंभर अपराध घडल्यावर केलेल्या कृत्याचा भोग भोगावाच लागतो.
202 केल्या कर्माची फळे माणूस याच जन्मी भोगत असतो पण ते बघायला सोसणारा असतोच असे नाही.
203 पोट हे माणसाला काहीही करायला भाग पाडते.
204 गरीबांच्या जीवावर श्रीमंतांची पोळी भाजत असते.
205 स्त्री पुरुषाची दासी किंवा बटीक नाही तर ती गृहदेवता आहे.
206 संतुट स्त्री हेच घराचे सौभाग्य. स्वच्छता हीच खरी दौलत. समाधान हेच घराचे वैभव.
207 पाठीमागून वार करणाऱ्या शत्रूपेक्षा पुढून वार करणारा शत्रू परवडला.
208 कळीचे फुल उमलले की मध चाखायला भुंगे जमतात.
209 दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपावे लागते.
210 बिंदूचा जन्म जसा विरण्यासाठी असतो तसे त्यागी माणसाचे जीवन विरक्तीत असते.
211 हिंदुधर्म संस्कृती ही एक सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, तिच्यावरच सर्व जगाची पाळेमुळे पोसली आहेत. .
212 घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना!
213 क्षणैक राग हा आयुष्यभर पश्चाताप करावयास लावतो.
214 क्षणैक मोह हा आयुष्यभर पश्चाताप करावयास लावतो.
215 एक खोटे बोललेले लपविण्यासाठी अनेकवेळा खोटे बोलावे लागते.
216 आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार असतो.
217 एकवेळ विष पचविणे सोपे पण यश पचविणे अवघड आहे.
218 मित्राच्या मृत्युपेक्षा मैत्रिच्या मृत्यूचे दुःख जास्त असते.
219 आपल्या पडीक काळात जो उभा राहतो तो खरा मित्र.
220 आयुष्य हे यश अपयश याचा खेळ आहे.
221 तुमच्या महत्त्वाकांक्षेला किल्ली द्या, पराक्रम आपोआप होतो.
222 महत्त्वाकांक्षा नेहमी चांगली ठेवा.
223 आपल्या महत्त्वाकांक्षेने जर एखाद्याचे नुकसान होत असले तर ती महत्त्वाकांक्षा नव्हे, राक्षसी लालसा होय.
224 मरणाचा मार्ग मोक्षाच्या मैदानातून जातो.
225 फुल फुलले की त्याला स्पर्श व हुंगण्याचा मोह हा होतोच.
226 पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोके नव्हे.
227 मनात किंतू आला की तो विंचू म्हणून ठेचावा.
228 बकरी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन एक वर्ष जगा.
229 कला ही नैसर्गिक देणगी असते तिचा विकास करणे आपल्या हातात असते.
230 विद्या विनयेन शोभते.
231 दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण होय.
232 ईश्वराच्या दरबारात श्रेष्ठ व कनिष्ठ, श्रीमंत व गरीब हा भेदभाव नसतो. म्हणून तो आपल्या मनातही ठेवू नये.
233 तुमच्या रस्त्यात काटे पसरले तर तुम्ही त्याच्या रस्त्यात फुले पसरा.
234 तुमच्या रस्त्यात काटे पसरले तर तुम्ही त्याच्या रस्त्यात फुले पसरा.
235 परमेश्वर हा इकडे तिकडे नसून तो आपल्या हृदयात असतो.
236 शब्द हे शस्त्र आहे ते जपूनच वापरा.
237 तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण हा कधीही परत येत नाही.
238 जखम भरून येते पण व्रण मात्र तसाच रहातो.
239 घेतलेले काम मग ते लहान असो वा मोठे ते जिद्दीने तडीस न्या.
240 शहाणा माणूस चूक विसरतो पण तिची कारणे विसरत नाही.
241 जो चोच देतो तोच चारा देतो.
242 आयुष्याच्या वाटेवर भोग व त्याग हेच दोन रस्ते आहेत.
243 तहानलेल्याला विहीरीवर नेले तर तो पाणी पितो. पण ज्याला तहानच लागली नाही त्याला जर विहीरीवर नेले तर तो कोरडाच परत येतो.
244 स्वप्न ही रंगविण्यासाठी असतात कारण स्वप्न सत्यात साकारणे फार कठीण असते.
245 यशाचा डोंगर गाठायचा असेल तर जिद्द आणि चिकाटी सोडू नका.
246 स्वप्नरंजन करणे म्हणजे मृगजळ बघणे.
247 जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
248 माणसाच्या जिवनाच्या पतंगाची दोरी नियतीच्या हातात असते.
249 घरात अपशब्द बोलू नका वास्तू तथास्तू म्हणत असते.
250 घरात वाढणारी मुलगी व दारात येणारी चिमणी या दोघीही सारख्या असतात. चिमणी दाणे टिपून जाते तर मुलगी सासरी जाते.
251 प्रत्येकजण आपापले नशिब घेऊन येत असतो.
252 प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.
253 मुळावर घाव घातल्यावर फांद्या आपोआप तुटतात.
254 सरस्वती विद्येची भोक्ती, लक्ष्मी उद्योगाची भोक्ती, अक्काबाई आळसाची भोक्ती. या तीन देवींतून आपण कोणाची उपासना करायची हे आपणच ठरवायचे.
255 आळस हा माणसाचा शत्रू आहे.
256 उद्योग हा माणसाचा मित्र आहे.
257 पैशाने श्रम विकत घेता येतात, पण मन नाही.
258 माणसाने माणूसकी सोडली की त्याचे रूपांतर पशूत होते.
259 दुबळी माणसे नेहमी रडगाणे ऐकविण्यासाठी उभी असतात.
260 साध्या गवताची दोरी वळली तर मदमस्त हत्तीही बांधला जातो.
261 गरीबांचा अपमान करू नका व श्रीमंतांची स्तुती करू नका.
262 फिनिक्स पक्षी हा राखेतून जन्माला येत असतो.
263 मरावे परी कीर्ती रूपे उरावे.
264 सत्य हे अजरामर असते.
265 परिस्थितीशी जुळवून घ्या पण लाचारी पत्करू नका.
266 अनेक गोष्टीवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल.
267 मित्र परीसारासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होत.
268 आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
269 रागाला जिंक्ण्याचा एकमेव उपाय – मौन
270 देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.
271 नियमितपणा हा माणसाचा मित्र, तर आळस हा माणसाचा शत्रू.
272 तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते.
273 परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी.
274 भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.
275 प्रत्येक यशस्वी असनाऱ्या पुरुषामागे एक स्त्री असतेच.
276 अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही.
277 किर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते.
278 संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय.
279 गणिताच्या अरण्यातून जातांना सूत्रांची बंदूक हाती घ्यावीच लागते.
280 कर्तुत्वाची भरारी माणसाला अमरत्व मिळवून देते.
281 जीवाचे रान केल्याशिवाय विद्याचे उद्यान फुलत नाही.
282 अनुभव हाच जीवनाचा खरा शिक्षक आहे.
283 आवड असली तरच सवड मिळू शकते.
284 इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
285 प्रेम हि नेसर्गाची खरी प्रेरणा आहे.
286 गरिबी जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टीना जन्म देते.
287 कृती चटका लावणारी असावी, देणारी नको.
288 जीवन म्हणजे सुख दुःखाच्या उनपावसाचा खेळ आहे.
289 जीवन फुलासारखे असू द्यावे, पण ध्येय मात्र मधमाशी प्रमाणेच असावे.
290 जो मूळचाच सद्गुणी आहे, त्यावर दुर्गुणांचा काहीही परिणाम होत नाही.
291 जो ओरडतो त्याला अंतकरण असते.
292 जीभ जरी तोंडात असते तरी ती कधी कधी डोके फिरवते.
293 प्रेम सर्वांवर करा; विश्वास थोड्यांवर ठेवा; पण व्देष मात्र कोणाचाच करू नका.
294 जो समंजसपणे दु:खे सहन करतो तो खरा शूर.
295 तिरस्कारामुळे झालेली जखम स्मितामुळे भरून निघते.
296 आनंदी मनुष्य दीर्घायुषी असतो.
297 ज्याची आपल्याला भीती वाटते त्याचीच आपण निंदा करतो.
298 आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
299 उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
300 पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
301 अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
302 मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
303 रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
304 अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
305 अंथरूण बघून पाय पसरा.
306 कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
307 तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
308 अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
309 संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
310 सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
311 सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
312 शरीरमाध्यम खलुं सर्वसाधनम ॥
313 सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
314 शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
315 जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
316 एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
317 कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
318 आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दूर्मिळ असते.
319 ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
320 कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
321 देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
322 आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
323 मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
324 ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
325 जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
326 आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
327 रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
328 जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
329 लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
330 कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
331 जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
332 पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
333 आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
334 गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
335 कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
336 स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
337 ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.
338 जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
339 सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
340 श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
341 आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
342 एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
343 प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
344 आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
345 आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
346 स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
347 अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.
348 हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
349 आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
350 बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
351 कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
352 टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.
353 नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
354 यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
355 आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
356 खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
357 जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
358 प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
359 स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
360 आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
361 माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
362 जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
363 तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
364 शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
365 हसा, खेळा पण शिस्त पाळा.
366 आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
367 स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
368 तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
369 काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
370 काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
371 एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
372 हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
373 उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
374 या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
375 तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !
376 केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
377 दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
378 माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
379 प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
380 व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
381 काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
382 दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
383 शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
384 जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
385 दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
386 शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
387 जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
388 परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
389 ऐकावे जनाचे करावे मनाचे.
390 एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
391 केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
392 बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
393 चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
394 तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
395 दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
396 स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
397 स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
398 त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
399 जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
400 दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा