सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ५ मार्च, २०२२

सुविचार संग्रह भाग ३

 

सुविचार संग्रह भाग ३ 

401  पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

402  उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

403  जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

404  मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

405  आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.

406  मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

407  बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

408  तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

409  गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

410  स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

411  प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

412  आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

413  जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

414  सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

415  उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

416  लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

417  मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.

418  जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

419  सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

420  जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.

421  संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

422  जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

423  क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.

424  जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

425  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

426  जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

427  वैभव त्यागात असते, संचयात नाही.

428  तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.

429  खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.

430  मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.

431  पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.

432  ह्रदयात अपार प्रेम असले की सर्वत्र मित्र.

433  टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

434  प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

435  मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

436  भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.

437  वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

438  त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

439  शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.

440  कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

441  बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

442  दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

443  ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

444  दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

445  जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

446  एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

447  सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

448  श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

449  राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

450  संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

451  असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

452  उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

453  ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

454  जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.

455  पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

456  मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

457  दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.

458  जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

459  आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार?

460  पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.

461  आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

462  अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.

463  मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

464  नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.

465  अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.

466  सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.

467  शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.

468  गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.

469  दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

470  पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.

471  पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !

472  स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.

473  अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.

474  चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.

475  स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.

476  अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

477  क्रोध माणसाला पशू बनवतो.

478  आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

479  आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

480  जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !

481  कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

482  परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.

483  भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.

484  माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.

485  बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

486  शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

487  तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.

488  आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात. आणि नुसते सुविचार असुन चालत नाही; ते आचरणात आणावे लागतात.

489  जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

490  आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

491  जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !

492  लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.

493  हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

494  कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.

495  हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.

496  आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

497  गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

498  आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.

499  जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.

500  अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.

501  तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.

502  न मागता देतो तोच खरा दानी.

503  चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.

504  केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

505  समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

506  भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

507  थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

508  निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

509  खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा.

510  क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

511  जशी दृष्टी तशी सृष्टी.

512  श्रवण, भाषण, वाचन, निरीक्षण आणि लेखन एवढे दुर्मीळ अलंकार परमेश्वराने दिले असताना इतर आभूषणांची गरजच काय ?

513  प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी.

514  सत्तेशिवाय शहाणपन काय कामाचे!

515  लक्ष्मी सत्पुरूषाच्या घरी त्याच्या गृहिणीच्या स्वरूपात नांदत असते.

516  जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ॥

517  चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या चंगल्या परंपरा मोडू नका.

518  निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.

519  माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

520  कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.

521  आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.

522  सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात.

523  बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.

524  संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.

525  हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे, अहिंसा हे सबलांचे.

526  परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.

527  शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही.

528  कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

529  प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.

530  मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ !

531  ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते.

532  अतिपरिचयाने अवाज्ञा होते.

533  विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

534  शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय.

535  जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.

536  न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.

537  भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती.

538  वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

539  कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती !

540  साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.

541  जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.

542  दुर्बल मनाचा मनुष्य कधीच महात्मा होऊ शकत नाही.

543  अन्न हे पूर्णब्रह्म आहे; त्याचा अनादर करू नका.

544  ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते; तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

545  केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा सुविचार वाढवून विवेकानंद व्हा.

546  संकटी जो हाक मारी, हात त्याला दे तुझा रे ! हीच आहे लोकसेवा, हेच आहे पुण्य रे !

547  डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

548  काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.

549  प्रफुल्लता हेच चेहऱ्याचे खरे सौदर्य. औदासिन्य चेहऱ्याला कुरूप बनवते.

550  अंतःस्थपणे जीवन संपन्न करते तेच खरे मनोरंजन.

551  शारीरिक सौदर्य कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौदर्य कधीच नष्ट होत नाही.

552  ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय.

553  जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

554  तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका; कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

555  केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

556  सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.

557  रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका. शहाणपणाने काम करा.

558  सहित्य ही उपासना आहे, वासना नाही. ती वासना झाल्यास साहित्य अवनत होते.

559  समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे, एकी होय.

560  कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा; भक्ती म्हणजे सेवाभाव.

561  बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु । झाडे, वेली, पशुपाखरे यांची संगत धरु ॥

562  आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो.

563  आरोग्य हाच सर्वोतम लाभ, तृप्ती हेच खरे धन, विश्वसनीय मित्र हेच सर्व सर्वोत्कृष्ट नातेवाईक आणि निर्मिती हाच परमानंद आहे.

564  जीवनाचे सोने होईल अशी खटपट करा.

565  वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.

566  पायदळी चुरगळलेली फ़ुले चुरगळणाऱ्या पायाला आपला सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षमेचेही कार्य हेच आहे.

567  आवड असली की सवड आपोआप मिळते.

568  जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते.

569  स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात.

570  अंथरूण बघून पाय पसरावेत.

571  आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.

572  मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात हा प्राथेनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो.

573  चिंतेऐवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही.

574  प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

575  गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उतम !

576  तासभराचे ध्यान हे वर्षभर केलेल्या पूजेअर्चेहून श्रेष्ठ आहे.

577  उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते.

578  एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं.

579  अधर्म, अनीती, अनाचार यांच्या साहाय्याने मिळविलेला जय पराजयापेक्षाही आधिक लांच्छनास्पद आहे.

580  शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे.

581  स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना.

582  लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.

583  सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात: म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

584  सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.

585  भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.

586  परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.

587  माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे तर गुणांनी प्राप्त होते.

588  स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.

589  चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.

590  काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?

591  अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

592  यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.

593  सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

594  सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते.

595  अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.

596  झाडासारखे जगा… खूप उंच व्हा… पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

597  स्वर्गापेक्षाही चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करा. कारण चागंली पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होईल.

598  इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.

599  अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात.

600  कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

भाग २                                                       भाग ४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा