सुविचार संग्रह भाग १
1 हृदयात दोनच अक्षरे कोरलेली असतात ती म्हणजे आई.
2 तारुण्याचा काळ हा पुढील जीवनाचा मार्गदर्शक असतो.
3 संस्कार आणि विकास जो साधतो तो मनुष्य व जो साधत नाही तो पशु होय!
4 अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका.
5 आपली स्तुती आपण करू नये. ना ती इतरांना करू द्यावी.
6 जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय.
7 सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो.
8 भीड ही भिकेची बहिण आहे.
9 स्त्री ही अशी व्यक्ती आहे, तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत नाही तर वेळप्रसंगी त्याची मैत्रिण व त्याची आई सुद्धा व्हावे लागते.
10 श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.
11 शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते.
12 सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र.
13 ग्रंथ हेच आपले गुरु.
14 पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.
15 खरा मित्र आपली पुस्तके होय.
16 पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.
17 सत्य हेच अंतिम समाधान असते.
18 कुणीही जन्मतः दुर्जन नसतो. पण त्याला दुर्जन बनवतो तो समाज.
19 पापी मनुष्याला सत्य हे सापासारखे दंश करत असते.
20 तुम्हाला कोणाचा मान करायचा नसेल तर करू नका. पण त्याचा अपमानही करू नका.
21 दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.
22 दान देताना बघावे आपले दान योग्य वक्तिला देतो की नाही.
23 तुमच्या अंगी शौर्य नाही तर सांगण्यास घाबरू नका. इतरांना तेवढे ही धारीष्ट नसते.
24 अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
25 अंधारातच आहे उद्याचा उषःकाल.
26 आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत. प्रत्येकाने ठरवायचे की आपण कोणाशी मैत्री करावी.
27 गर्वाने मित्र शत्रू बनतात.
28 रोपाला खतपाणी दिल्याने त्याचा वृक्ष बनतो. तसेच मुलावर संस्कार केले तर त्याचा विकास होतो.
29 आई, वडील, गुरुजन व देश यांच्यावर निष्ठा ठेवावलाच हवी.
30 एखाद्याचे तुम्ही भले करू शकत नसल्यास निदान त्याचे वाईट तरी चिंतू नका.
31 निसर्गाच्या पुढे प्रगतशिल माणूस खुजाच असतो.
32 खोटी ऐट व खोटा मान सोडा. आयुष्यात काही कमी पडणार नाही.
33 सुख हे पैशात नसून ते संतुष्टात असते.
34 पैशाने सर्वकाही घेता येते पण प्रेम पैशाने घेता येत नाही.
35 पैशाने माणूस पशू बनतो.
36 अंगात घातलेला कपडा किती उंची आहे याच्यापेक्षा किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचे आहे.
37 कपडा मळला तरी धुता येतो पण अब्रूवर पडलेला दाग आपल्या मरणाबरोबर सुद्धा मिटत नाही.
38 आई, वडील ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती फक्त एकदाच मिळते.
39 प्रेमाची तुलना सोन्याशी होत नाही.
40 प्रत्येकजण सर्वधर्मसमभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल.
41 रूप हे आज आहे, उद्या नाही पण गुण मात्र अविनाशी असतात.
42 धनाच्या लालसाने माणसात पशुत्व येते.
43 धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.
44 कष्टार्जित धनाला कधी मरण नाही.
45 सुख-समाधान हेच आयुष्याचे खरे धन.
46 वडीलोपार्जित इस्टेटीपेक्षा स्वकष्टाची इस्टेट सर्वांत श्रेष्ठ.
47 बापकमाईच्या हजार रुपयांपेक्षा आपकमाईचा रुपायाच जास्त किंमतीचा आहे.
48 संपत्तीच्या लोभाने भुजंग होऊ नका.
49 अडचणीच्या वेळी सखे-सवंगडी नातेवाईक दूर होतात, पण शेवटी मिळवलेली विद्याच कामी येते.
50 पैसा कितीही प्रिय असला, तरी तो मिळवताना माणुसकी गहाण टाकू नका.
51 पैशावर विश्वास देऊ नये. विश्वासावर पैसा द्यावा.
52 मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म होय. देव हा दगडात नसून माणूसकीत आहे.
53 जसे काठीने पाणी तोडता येत नाही त्याप्रमाणे रक्ताची नाती तोडून तोडता येत नाहीत.
54 पैशाने मिळविलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात.
55 विजेच्या लखलखाटापेक्षा समईची शितलता मनाला आल्हाद देते.
56 प्रेम हे चंद्रासारखे शितल असते.
57 मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका.
58 मन हे प्रेमाने जिंकायचे असते पैशाने नाही.
59 स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
60 ‘आई’ हेच दोन शब्द आयुष्य तरण्यास समर्थ आहेत.
61 आईचे प्रेम हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.
62 हाताची बोटे ज्याप्रमाणे सारखी नसतात, त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेल्या प्रेमात कमी अधिकपणा असतो.
63 समुद्रातील असंख्य रत्नांपैकी मोत्यांचे रक्षण शिंपले करीत असतात. त्याच प्रमाणे जगातील कोट्यवधी माणसापासून आईचे प्रेम रक्षण करीत असते.
64 पैसा झाला उतू नका व नसला तर प्रेम सोडू नका.
65 मान सांगावा जनात अपमान ठेवावा मनात.
66 वाईट सवयीपासून लांब रहाता येते पण सवय लागल्यावर लांब रहाता येत नाही.
67 सूर्य किरणांनी फुले उमलतात तसेच आईच्या प्रेमाने जिवनकळ्या उमलतात…
68 माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे.
69 आशा ही तेजश्री आहे.
70 धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.
71 सर्व फुलात कापसाचे फुल श्रेष्ठ.
72 स्तुतीला भाळू नका निंदेला डरू नका.
73 विद्यारूपी अंगठी मध्ये विनयरुपी रत्न चमकत असतो.
74 परोपकार करणारे संतपुरूष फळाची अपेक्षा कधीच ठेवत नाही.
75 नशिबात जे लिहिलेले आहे ,ते विधिलिखित कोणीच बदलू शकत नाही.
76 दया हा मानवाचा धर्म आहे.
77 तरुण स्त्रीला तिच्या सौदर्यापासूनच भय असते.
78 चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो.
79 प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.
80 खोटी प्रशंसा अत्यंत दु:ख देणारी असते.
81 फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय.
82 साधू असावेत पण सावधान करणारे.
83 धन मिळवणे हे जीवनाचे ध्येय नवे, ईश्वरसेवा हेच जीवनाचे ध्येय आहे.
84 चांगल्यातून चांगले निर्माण होते; वाईटातून वाईट.
85 आतिथ्य हे घराचे वैभव आहे.
86 समाधान हे घराचे सुख आहे.
87 प्रेम हि घराची प्रतीष्ठा आहे.
88 परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य.
89 आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्यालाच भोगावे लागते.
90 क्षमा वृत्ती ठेवून क्रोध जिंकावा.
91 माणूस प्रयन्तवादाने सर्व काही करू शकतो.
92 संपत्तीचा अमर्याद संचय करू नका.
93 परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.
94 जे स्वत:बलवान असूनही दुर्बलांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात.
95 आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
96 पशूंना बळी देणे हि अंधश्रध्दा आहे.
97 वैर प्रेमाने जिंकावे.
98 माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणीमात्रांवर हृद्यपुर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
99 आईबापाची सेवा करा.
100 हुंडा देऊन किंवा घेऊन लग्ने करू नका.
101 दान घेण्यासाठी हात पसरू नका दान देण्यासाठी हात वर करा.
102 सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
103 आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
104 प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान.
105 जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
106 यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
107 प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
108 ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
109 यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
110 प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
111 चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
112 मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
113 छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
114 आपण जे पेरतो तेच उगवतं.
115 फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
116 उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
117 शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
118 प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
119 आधी विचार करा; मग कृती करा.
120 आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
121 फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
122 एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
123 अतिथी देवो भव ॥
124 अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
125 दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
126 आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
127 निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
128 खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
129 उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
130 चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
131 नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
132 माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
133 सत्याने मिळतं तेच टिकतं.
134 जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
135 परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
136 हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
137 स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
138 प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
139 खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
140 तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
141 वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
142 जो गुरुला वंदन करतो; त्याला आभाळाची उंची लाभते.
143 गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
144 झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
145 माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
146 क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
147 सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
148 मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
149 आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
150 बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
151 मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
152 तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
153 शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
154 मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
155 आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
156 एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
157 परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
158 खिडकी म्हणजे आकाश नसतं.
159 जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
160 वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
161 भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.
162 कविता म्हणजे भावनांचं चित्र!
163 संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
164 तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
165 ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
166 स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
167 अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
168 तुलना करावी पण अवहेलना करू नये.
169 समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
170 आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
171 मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
172 चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
173 व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
174 आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
175 तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
176 अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.
177 विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
178 मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
179 आयुष्यात प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
180 आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
181 प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
182 सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
183 तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
184 काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
185 लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
186 चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
187 तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
188 बोलणे चांगलेच पण त्यानुसार कृती करणे सर्वांत चांगले.
189 रिकामे डोके सैतानाचे घर.
190 उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी.
191 बालपण ही जीवनाची पहाट तर तारुण्य आणि वार्धक्य हे अनुक्रमे उषःकाल आणि सायंकाल आहे.
192 उषा आणि निशा जशा दिवसाच्या साथीदार आहेत तसे सुख दुःख माणसाचे सोबती आहेत.
193 आयुष्यातील सुखाची एक तार दुःखाचा डोंगर पचवून जाते.
194 माणसाच्या कर्माने जेव्हा एक सुखाचा दरवाजा बंद होतो तेव्हा दैव आणखी दोन दरवाजे उघडत असते, पण समजण्याची माणसाची कुवत नसते.
195 अवघड क्षणीही न डगमगता जो अचूक निर्णय घेतो तोच जीवनाच्या लढाईत जिंकतो.
196 जीवनरूपी पटावर माणसाची प्यादी हलवणारा सूत्रधार परमेश्वर बसला आहे.
197 माणूस दुसऱ्याला कितीही फसविणारा असला तरी आपल्या मनाला तो कधीच फसवू शकत नाही.
198 मनाच्याही अंतर्मनात चाललेली उलाढाल माणूस निद्रावस्थेत पहात असतो.
199 माणसाच्या पापपुण्याचा हिशोब त्याला परमेश्वराच्या दरबारात चुकता करावाच लागतो.
200 सत्य हे कटू असते पण शेवटी ते पचवावेच लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा