सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ५ मार्च, २०२२

सुविचार संग्रह भाग ६

 

सुविचार संग्रह भाग ६ 

1001  शाळा व कॉलेज ही दोन्ही म्हणजे चैतन्यानी बहरलेली बाग होय.

1002  वाढदिवस साजरा करताना आयुष्यातील एक वर्ष सरले म्हणून रडावे व एका वर्षाने अधिकच सुसंस्कृत झालो म्हणून हसावे.

1003  वाढदिवस साजरा करणारा प्रत्येक माणूस हा किती अज्ञानी असतो कारण दर वाढदिवसागणिक मृत्युही एकेक पाऊल पुढे सरकत असतो हे त्याला माहीत नसते.

1004  उन्मत्त पिसाराप्रमाणे वागणाऱ्या माणसाला माहित नसते की नियती नावाची अज्ञात शक्ती आहे जी बघता बघता एखाद्याला वाघाची शेळी बनवते.

1005  औषध जपून आणि काळजीपूर्वक वापरात, कारण औषधाचा वाजवीपेक्षा जास्त डोस झाला की औषधपण विष होते.

1006  आजच्या जगात स्त्री आणि पुरुष बरोबरीने सर्व क्षेत्रात वावरत. आहे तरी अजूनही स्त्री ही पूर्वीचाच ‘स्त्री’ राहिली आहे.

1007  परिस्थितीचे फासे उलटे पडले की सापाची गोगलगाय व्हायला वेळ लागत नाही.

1008  अक्करमाशी सर्पाची जात ही सर्पाच्या जातीतील अतिशय घातकी आहे तशीच लावालावी करून घर, मन उध्वस्त करणारी माणसे समजावीत.

1009  तुम्ही साहित्यिक विचारवंत वा लेखक नसणार पण तुमची कला जर चांगली असेल तर तिची जोपासना करायला हवी कारण आजच्या या शिदोरीतून उद्याचा मोठा माणूस घडणार असतो, जसे कळीचे . फुल बनते तसे.

1010  कोणतीही कला ही निसर्गदत्त देणगी आहे, पण त्या देणगीचा विकास करणे माणसाचे कर्तव्य आहे.

1011  जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती मिळविताना झगडावे लागले तरी चालेल पण झगडा वस्तू मिळेपर्यंत चालू ठेवा नाहीतर तुम्ही जीवन जगण्यास नामर्द ठराल.

1012  जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा तुमच्या जीवावर अनेकांचा हक्क असतो आणि त्यामुळे तुमच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा तुम्हाला अधिकार नसतो.

1013  माणूस लिहितो म्हणजे तरी काय? ते एक प्रकारचे त्याचे अनुभवच असतात.

1014  माणसाच्या वृत्ती वाईट असतात त्या वृत्तीचा तिरस्कार करा. माणसाचा नको.

1015  साहित्य ही जीवनाची नक्कल नव्हे तर ते भावी दर्शन होय. जीवनाच्या हेतूसाठी ते जीवनाला अनुरूप बनवते.

1016  कला म्हणजे पूर्णतः कला परिपूर्णतेची अपेक्षा करते. खूप वाचा उत्तमोत्तम वाचा.

1017  सुख हा सुगंध आहे. तो दुसऱ्यावर शिंपीत असता स्वतःवरही शिंपला जातो.

1018  प्रसंग पुष्कळांना वळण लावतात पण प्रसंगाला वळण लावणारा एखादाच.

1019  ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर मदत बरी.

1020  कलहामुळे घर बुडते, वाईट वर्तणूकीने स्नेह बुडतो, वाईट राजामुळे देश लयास जातो आणि वाईट कर्मानी सुकिर्तीचा नाश होतो.

1021  मुलांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होतात ती मुलांमुळे नव्हे तर पालकांमुळे.

1022  अनर्थ होऊ नये म्हणून तुमच्या गुणांवर जी पांघरूण घालते ती माया.

1023  जात, कुळ, खानदान, धर्म हे सर्व माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेत जगात! जगात जाती फक्त दोनच आहेत स्त्री-पुरुष!

1024  मुलीला आईचं हृदय-आईची माया त्याच वेळी कळते जेव्हा ती आई होते. आणि त्या अनुभवातून जाते तेव्हा.

1025  तुमचे साहित्य तुम्हाला निर्माण करायचे तेव्हा त्याची मांडणी, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि आपल्या साहित्यांचा मालमसाला यांची जोडणी तुम्हीच करायला हवी आणि ते आर्थिक आकर्षण करण्यासाठी व्यावहारिक जगाकडे चौकस लक्ष ठेवायला हवे.

1026  कडुलिंबाचा रस कितीही कडू असला तरी त्याचा परिणाम उत्तमच.

1027  हे जग म्हणजे रंगभूमीच. जी नाटकं होतात त्याचा कर्ता करविता परमेश्वरच आहे.

1028  जुळलेली मने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जो घरचाच माणूस तोडतो त्या घरभेद्याला घरात स्थान म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखे आहे.

1029  ज्याला गुणांची थोरवी माहित नसते त्याने कोणाचीही निंदा करता कामा नये.

1030  उच्चत्व हे गुणांमुळे प्राप्त होते ते केवळ उच्चासनावर बसण्यामुळे नाही राजप्रसादाच्या शिखरावर बसणारा कावळा कधीतरी गरुड बनू शकेल काय?

1031  बेंबीत कस्तुरी घेऊन फिरणाऱ्या त्या कस्तुरीमृगाला माहित नसते की आपल्याकडे कस्तुरी आहे कारण त्या वासाने धुंद होऊन तो त्या वासाच्या शोधार्थ पळत राहतो. तसं एखाद्या विद्वानाला त्याच्यातील विद्वत्तेच्या कस्तुरीचा पत्ताच नसतो.

1032  लक्ष्मी चंचल आहे ती एका जागी कधीच स्थिर रहात नाही. तर सरस्वती (विद्या) मात्र तुमच्याशी इमान राखून मरेपर्यंत सोबत करते.

1033  सर्वसामान्यपणे लक्ष्मी आणि सरस्वती या कधीच एकत्र नांदत नाहीत.

1034  अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.

1035  अप्पलपोटे पण हे सर्व पापांचे माहेरघर आहे. मी आणि ‘माझे’ याचाच जप सदोदीत करणारे अंतःकरण अपवित्र होय.

1036  चंद्राकडे जसे चांदणीचे आकर्षण असते तसेच विद्याभ्यासाकडेच विद्यार्थ्याचे आकर्षण असते.

1037  जिज्ञासा, कौतुकवृत्ती यात साहित्याचा आत्मा आहे.

1038  फुलपाखराचे पंख कापू नका, त्यांना बांधू नका असे शिकविणारे आई-बापच आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मुलांना वाकवून, वागवून त्यांचे उत्साहाचे प्रगतीचे पंख कापत असतात आणि त्यांच्या कलाने त्यांना शिक्षण न देऊन त्यांची मानसिक कोंडी करतात.त्यांना हे माहित नसते की आपली मुलंसुद्धा फुलपाखराचं प्रतीक आहेत.

1039  माणूस आणि प्राणी यांच्यात फरक आहे कारण परमेश्वराने त्यांना वाचा आणि बुद्धी अशा दोन अमोल देणग्या दिल्या आहेत. पण जो माणूस याचा दुरूपयोग करतो तो पशू या कोटीतच गणला जातो.

1040  परिक्षा ही विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची चाचणी असते. तुम्ही जर त्या वेळी कॉपी करून लेखन केलेत तर तुमचा तोटा तुम्हीच करून घेत असता.

1041  विद्वानाची सर्वत्र पूजा होते पण मूर्खाची मात्र निंदाच होत असते.

1042  एखाद्या गुन्हेगाराच्या मनातसुद्धा माणूस वसलेला असतो पण त्याच्या कपाळावर लावलेल्या गुन्हेगारीच्या पट्टीमुळे समाजाकडून त्याची सतत अवहेलना होत राहाते पण एखादा उच्च गणल्या जाणाऱ्या माणसाच्या मनात जर गुन्हेगार वावरत असेल तर मात्र समाज त्याचे काही करत नाही किंवा त्याच्या विरुद्ध आवाज पण उठवू शकत नाही.

1043  टिटवी देखील समुद्र आखते.

1044  सुविचार हे केवळ फळ्यावर लिहिण्यासाठी नाहीतर तर ते रोजच्या जीवनात आचारण्यासाठी आहेत,.

1045  आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

1046  आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मात्र जगात कशाचीच किंवा स्वतःच्या जगण्याची पण किंमत वाटत नाही.

1047  लहान लहान बोबड्या बाळाच्या ओठातून व अंतःकरणातून दिसून . येणारा परमेश्वर जणू आईच.

1048  आईला सर्व दोषांसकट मुल गोड वाटते.

1049  आई असंख्य काव्य जगते पण ती एकसुद्धा कविता लिहू शकत नाही, मातेच्या हृदयात जे गाणे मूकपणे वावरत असते, तेच मुलाच्या ओठावर नाचत असते.

1050  अपत्य संगोपन हा स्वार्थ, त्याग व सेवा याचा अस्सल नमुना.

1051  माता मुलासाठी सर्व दिवस अविश्रांत कष्ट करीत राहते. मुले तिचे उपकार मानत नाहीत. उलट तिच्यावर चरफडतात, तिचा अपमान करतात पण त्याचे तिला काही वाटत नाही.

1052  स्त्रीला मातृत्वाची पदवी प्रदान करणारे जे बालक किती श्रेष्ठ कारण त्याच्यामुळेच ती जगात आई होते.

1053  ज्याला गुलाबाचे फुल हवे त्याने काटे लागले तरी सहन करण्याची तयारी ठेवायला हवी.

1054  सूर्यफूल जसं किरणानी उमलते फुलते तसेच ध्येयाच्या दिशेनेच वाटचाल करणाऱ्या माणसाचे जीवन फुलू शकते.

1055  ईश्वर हा एकच आहे पण कोणी त्याला अल्ला, येशू, गुरूसाहेब किंवा भगवान म्हणत असतात.

1056  दुसऱ्याचं वाईट चिंतणारा माणूस हा स्वतःच द्वेषाच्या जाळ्यात गुरफटत असतो.

1057  शत्रूपुत्र शत्रूच होतो. आणि शत्रूला केव्हाही मृत्युदंडच योग्य. पण मित्रताच सुंदर, शांत आणि प्रगतीशील आत्मा होते आणि मृत्युदंड देऊनसुद्धा शत्रूता वाढतच राहते तेव्हा मित्रता राखूनच राजकारण चालवावे.

1058  शत्रूला मृत्युपेक्षा मैत्रीचा हात पुढे करा.

1059  दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास.

1060  काटेरी शब्दांच्या वागण्यानी एखाद्याने मन/हृदय घायाळ करणे हे एक प्रकारचे माणसाचा जिवंतपणी खून करण्यासारखे आहे.

1061  अक्कल केव्हाही मेंदूत असावी गुडघ्यात असू नये.

1062  खुर्चीलाही मन असते पण ते मन खुर्चीत बसणाऱ्या वेगवेगळ्या माणसाच्या मनोवृत्तीप्रमाणे बदलत असते.

1063  कधी कधी साप्ताहिकातील न सुटणाऱ्या शब्दकोड्याप्रमाणे माणसाला स्वतःच्या जीवनाचे कोडे उलगडत नाही.

1064  कॉलेज ही प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या जीवनातील लॉटरी आहे ती ज्याला लागते त्यालाच कॉलेजच्या विश्वात प्रवेश मिळतो.

1065  काटेरी मनाच्या माणसाच्या हृदयातसुद्धा काटेरी फणसातील रसाळ गऱ्याप्रमाणे गोडवा असतो.

1066  जगात माणसाला किंमत नसते, निश्चयाला असते. मन खरे कोणाचे जो आपल्या मनाकरीता मरण्यास तयार होतो.

1067  जगात फक्त ज्ञानाची किंमत होते अज्ञानाची नाही.

1068  संपादन केलेले ज्ञान ज्याला आचरणात आणता येत नाही तो एक पढत मूर्खच.

1069  ज्ञान म्हणजे तरी काय अनुभवाचे परिपक्व झालेले आयुष्याचे सार होय.

1070  अज्ञान हेच माणसाच्या संशयाचे सार असते.

1071  रिकामपणीचा वेळ लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा चिंतन, नामस्मरण, जप यात व्यतीत केला तर आयुष्याचे सार्थक होईल.

1072  सुदृढ शरीर व निरोगी मन हीच माणसाची खरी दौलत आहे.

1073  दुःखी माणसाविषयी नुसती सहानभूती दाखवण्यापेक्षा आपण स्वतः त्याच्यापेक्षा दुःखी होणे बरे.

1074  पैशाने अडलेल्या आणि परिस्थितीने गांजलेल्या माणसावर कोरड्या उपदेशाचे बाण सोडण्यापेक्षा तुम्हाला होईल तेवढी मदत केलीत तर ते जास्त श्रेयस्कर.

1075  तुमच्या आश्रयार्थी आलेल्या माणसाला आश्रय द्यायचा नसेल तर देऊ नका पण आश्रय देऊन कटू शब्द बोलून व काबाडकष्ट करवून घेऊन त्याच्या शरीराला व मनाला शिणवू नका.

1076  माणूस हा उत्तम नट आहे आणि आयुष्यभर तो नाटकच करत असतोच.

1077  मुक्या मारापेक्षाही मुके दुःख जास्त असहाय्य असते.

1078  ‘मी दुःखी आहे, मी दुःखी आहे.’ असा आपल्या दुःखाचा डांगोरा पिटीत जगण्यापेक्षा दुःख मुकपणे सोसायला शिका नाहीतर रोज मरे त्याला कोण रडे असे म्हणून लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करतील.

1079  झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठविणार?

1080  आपल्या परिस्थितीत मिळणारी सुखे न उपभोगता अशक्य असलेल्या सुखाचा हव्यास धरून जर त्या मागे धावलात तर मृगजळामागे धावल्यासारखे होईल.

1081  आपण जीभेच्या ताब्यात जाण्यापेक्षा जीभेला आपल्या ताब्यात ठेवा नाहीतर चविष्ट खाण्यामागे धावून शेवटी पिंजऱ्यात सापडलेल्या उंदरात आणि तुमच्यात काही फरक नाही.

1082  देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवशी, देणायांचे हात घ्यावे, म्हणजे त्या दात्याचा दातृत्व हा जो गुण आहे तो घ्यावा कारण दातृत्वच खरे सुख आहे.

1083  सोने हे घणाचे घाव सोसून अधिक चकचकीत होत जाते तसेच दुःखाचे घाव सोसून माणूस अधिक दृढ आणि अधिक निडर होत असतो.

1084  अत्तर लावताना ते लावणाऱ्याच्या हाताला लागते, सुखाचेही तसेच आहे दुसऱ्याला सुख देताना ते आपल्याला मिळते.

1085  सुख-दुःखात भेद कोणता, सुखाला भागीदार मिळाले तर ते वाढते, दुःखात जर कोणी वाटेकरी झाले तर ते कमी होते.

1086  मतभेदामुळे कलावंताचा नाश कलावंतच करतात.

1087  पराक्रम करता येईल असे दिसले तर त्याचा शोक न करता प्रतिकार करावा. दुःखावर औषध हेच की त्याचे एकसारखे चिंतन करीत बसू नये.

1088  आयुष्यात दुःखे दोन प्रकारात आहेत, एक जे हवे ते मिळणे आणि दुसरे हवे ते न मिळणे.

1089  आशावादी विसरण्याकरता हसतो आणि निराशावादी हसण्याचे विसरून जातो.

1090  सुख-दुःख हे प्रत्येकाच्या कर्माचे फळ असते. आणि आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार तो सुख-दुःख उपभोगत असतो.

1091  आपल्या सुख-दुःखात जो आपल्या इतकाच समरस, सहभागी तोच खरा मित्र व या उलट वर्तणूक म्हणजे शत्रूचे लक्षण.

1092  ज्ञानाचा गर्व झाला की सुख न होता दुःखच होते.

1093  श्रीमंत जर पैशाप्रमाणे मनानेही श्रीमंत झाला तरच खरा श्रीमंत नाहीतर पैशाच्या बळावर उद्दाम झालेला तो पशूच.

1094  माणसाचे शरीर रोगी असेल तर ते बरे करता येते पण आत्मा कधीही रोगी होता कामा नये आणि आत्मा निरोगी राहण्यासाठी माणसाचे मन स्वच्छ आणि संस्कारक्षम असणे आवश्यक आहे.

1095  साहित्य हे जीवनाची नक्कल नव्हे तर ते भावी दर्शन होय. जीवनाच्या हेतूसाठी ते जीवनाला अनुरूप आहे.

1096  पाणी माणसाचे जीवन आहे.

1097  आयुष्य हे जगण्यासाठी आहे जीवनातील अडीअडचणी, दुःख, निराशा यांनी गांजून भ्याडासारखी आत्महत्या करून संपविण्यासाठी नव्हे.

1098  माणसाने आपले जीवन सतत कसे फुलेल याकडे लक्ष दिले पाहिजे. झाडावर उमलणाऱ्या कळ्यांना कोठे माहित असते की आपले जीवन देवाच्या चरणावर आहे की पायदळी तुडवले जाणार आहे कि निर्माल्य होऊन कुस्करले जाणार पण संकटाच्या भितीने कळ्या कधी फुलण्याचे सोडत नाहीत.

1099  कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच सरळ होत नाही तसेच दुष्ट माणसाचे अंतःकरण उपदेश करूनसुद्धा कोमल होत नाही.

1100  ज्याला बागेत वाढणारा मोगरा आणि कुंपणावर वाढणारी कोरांटी यातील फरक कळत नाही त्याला जीवनातील बऱ्या-वाईटची जडण घडण काय कळणार.

1101  मानवी सृष्टीचा नियम काही अजबच आहे तो नवजात अर्भक काय हसत असतो पण जन्माला आलेला तो जीव रडत असतो आणि दिवंगताच्या आपल्या माणसाच्या सांत्वनासाठी माणूस जातो तेव्हा जीव गेलेला असतो आणि त्याची सारी माणसे रडत असतात.

1102  माणसाला वरचे बोलावणे आले की त्याची इच्छा असो वा नसो त्याला जावेच लागते.

1103  कला रंजनाचा हेतू रंजना पलिकडे जाता येत नाही.

1104  तुमच्या मुलाचे बौद्धिक इतपतच की ते त्याच्या बुद्धीला पचले पाहिजे आणि मेंदूला रुचले पाहिजे.

1105  कविता हे ज्ञानपुण्याचे अत्तर आहे.

1106  अनिवार्य भावनेचा सहज स्फूर्ती उद्रेक म्हणजे काव्य.

1107  प्रतिभा ही अनंत परिश्रमाने सामावलेली असते.

1108  प्रतिभा संपन्न व्यक्ती प्रचलित नियम झुगारून देतात ते त्या ठिकाणी नविन नियम करण्यासाठीच.

1109  डोक्यावर जणू दुःखाचा मुकुट चढवून सुख मनुष्यापुढे उभे ठाकते, जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचेही स्वागत केलेच पाहिजे.

1110  आईच्या दुधाची चव काही न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम व वात्सल्य असते.

1111  हे जग भेकड माणसासाठी नाही, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, जयापजयाची पर्वा करू नका.

1112  सर्व कामाच्या यशाची किल्ली त्या त्या कामात एकाग्र म्हणजे तल्लीन होऊन इतर सर्व गोष्टीब्दल भान विसरण्यात आहे.

1113  स्वतः मंगल होऊन मंगलाची सेवा करणे हे आपले ध्येय आहे, मनुष्यातील मंगलता म्हणजेच चारित्र्य.

1114  क्रांती ही रक्तरंजित असते आणि क्रांतीशिवाय इतिहास नाही.

1115  लोकशाही म्हणजे माणसाना मेंढरासारखं वागायला लावणारी अवस्था खास नव्हे.

1116  यश प्राप्तीला असंतोष हे कारण आहे. संतुष्ट मनुष्य राजकारणात निरुपयोगी आहे.

1117  आंतरीक जागरूकता हीच स्वातंत्र्याची किंमत असते.

1118  सत्ता ही अशी नशा आहे की ती माणसाला स्वर्गाला तरी पोचवते नाहीतर रसातळाला नेते.

1119  स्वतःच्या खोटेपणानेच राजकीय पक्ष सरतेशेवटी नामशेष होतो.

1120  देशभक्ताचे रक्त म्हणजे स्वातंत्र्य वृत्तीचे बीजच होय.

1121  स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वैराचार नव्हे.

1122  पूर्वजांचा गौरव करणे, वर्षातून एकदा स्मरण करणे हे भावी उत्कर्षणाचे चिन्ह होय, उदयोन्मुख राष्ट्राला याची गरज आहे.

1123  माणसाने नेहमी प्रकाशाकडे पहावे आणि मात्र परिस्थितीत चांगल्यावाईट प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्यावे.

1124  सर्वसामान्य माणसाने राजकारण हा विषय शिळोप्याच्या गप्पाप्रमाणेच जवळ करणे श्रेयस्कर.

1125  माणसात गुणारुपाची सांगड क्वचितच पहावयास मिळते.

1126  माणसाच्या हृदयातील काळा रंग लपवण्यासाठीच परमेश्वर त्याला रूपाची देणगी देत असतो.

1127  सौंदर्यापासून जीवास विश्रांती आणि मनाची उन्नती झालीच पाहिजे.

1128  आनंदीवृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.

1129  तथापी, पण, परंतु हे शब्द श्रद्धेच्या कोशात बसतच नाहीत.

1130  सुंदर स्त्रीला बहीण मानणे सोपे असते पण तसे आचरण करणे कठीण असते.

1131  पथ्य नाही पाळले तर औषधाचा उपयोग होत नाही.

1132  काट्यावाचून गुलाब नाही, रात्रीशिवाय दिवस नाही, तसेच बदमाशावाचून राजकारण नाही.

1133  दुर्बल मन ओढ घेते सागराच्या प्रवाहाकडे तर सबळ मन ओढ घेते. प्रेमाच्या विशाल आकाशांकडे.

1134  बळजबरीत लादलेले प्रेम हे पुरुषार्थाचे लक्षण नव्हे.

1135  जीवनाची दुरंगी दुनिया ही दुःखाने तशीच सुखाने पण काठोकाठ भरली आहे.

1136  सूर तेच पण ते बुलबुलाच्या तोंडून बाहेर पडले की त्याला संगीताचे महत्त्व प्राप्त होते, पाणी तेच पण ते गोमुखातून बाहेर पडले की त्याला अमृताचा महिमा प्राप्त होतो, तसेच ज्ञान जर का प्रतिभेच्या शैलीतून लिहिले गेले तर त्याला साहित्याचा दर्जा प्राप्त होतो.

1137  अचल प्रितीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही.

1138  तुमची श्रद्धा खरीखुरी योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालासुद्धा देवत्व येते पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतळी करतो.

1139  मानवतेच्या सौजन्यशील स्पर्शातून सुखाचे सिंचन होते, तर अहंकाराच्या हर्षातून सर्पाचे जहरी फुस्कार बाहेर पडतात.

1140  प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण करून चार सुज्ञ माणसांचा सल्ला घेऊन स्वतःच्या मनाने सल्ला घेतो तो शहाणा.

1141  डोळे स्वतःवर विश्वास ठेवतात पण कान मात्र दुसऱ्यावर विश्वास ठेवतात.

1142  चांगल्या सवयी मुलांना बालपणीचं लावाव्या लागतात.

1143  जीवनातील बरे-वाईट अनुभव घेत असताना भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांनी विशेष करून प्रतिकुलताच आपल्या वाट्याला आहे असेच माणसाने नेहमी गृहित धरून चालावे.

1144  स्वभावातील गोडीने आणि जीभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

1145  ज्याचे हातपाय धडधाकट आहेत आणि सतत धडपड करून इप्सित साध्य करण्याची जिद्द आहे असा माणूस नेहमी यशस्वी होणारच.

1146  चूक कबूल करण्यात जर माणसाला शरम वाटत असेल तर ती चूक मुळात करताना शरम वाटली पाहिजे.

1147  सौंदर्य महालात असते आणि सौजन्य मातीच्या मंदिरात वास करते.

1148  दुःख म्हणजे परमेश्वराचा आशिर्वाद आणि सुख म्हणजे दुःखावरील फुकर होय.

1149  ज्ञान हे बाहेरून आत ओतण्याची वस्तू नसून तन, मन, धन व एकाग्र करून आत्मसात करण्याची जीवन गाथा आहे.

1150  ढोंग म्हणजे सद्गुणापुढे दुर्गुणाने स्विकारलेली हार आहे.

1151  मातीशी वैर ठेवण्यापेक्षा मातीशी ईमान राखा.

1152  डोंगरआड गेलेला सूर्य दुसरे दिवशी दिसू शकतो, पण मातीआड गेलेली व्यक्ती पुन्हा दिसू शकत नाही.

1153  मोठमोठ्या नद्या किंवा सागराने माणसाचे मन धुतले जात नाही, ते स्वच्छ होते डोळ्यातील खारट पाण्याच्या डोहाने.

1154  घोड्यावरून पडलात तर सावरले जाल पण मनातून उतरलात तर सावरू शकणार नाही.

1155  शांत मनुष्य क्रोधी व रागिट गाणसाचा पराभव करतो.

1156  दुसऱ्याचे मूल खूप खेळते, जेवते, हसते म्हणून आपल्या मुलाने पण तसेच करावे अशी अपेक्षा न ठेवता ते त्याच्या कुवतीप्रमाणे होऊ द्या. फक्त त्याची कुवत वाढविण्याला त्याला उत्तेजन द्या.

1157  ज्याच्या योगाने माणूस जगण्यास लायक होते त्याचे नाव शिक्षण.

1158  शिक्षण हे प्राधान्यानं लोकांच्या गरजा पूर्ण करएणारे असले पाहिजे.

1159  मारणायाचे हात धरता येतात पण बोलणान्याचे तोंड धरता येत नाही.

1160  चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.

1161  कीर्ती हवी असेल तर तिच्या पाठी लागू नका, तिच्याकडे पाठ फिरवा.

1162  प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.

भाग ५                                                        भाग १

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा