सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ५ मार्च, २०२२

सुविचार संग्रह भाग ४

 

सुविचार संग्रह भाग ४ 

601  अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

602  तलवार ही शौर्याची नव्हे; भीतीची निशाणी आहे.

603  जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे, परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.

604  आज्ञेला सामर्थ्य यायला आधी सेवा करावी लागते.

605  माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो . अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो.

606  जीभ जिंकणारा जग जिंकतो.

607  झाले गेले विसरुनि जावे… पुढे पुढे चालावे… जीवनगाणे गातच राहावे.

608  गुलाब पाणी देणाऱ्या हातांना त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.

609  जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.

610  विचार कराण्यासाठी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

611  कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचनं ॥

612  ज्या घरात स्त्रीची पुजा होते, त्या घरात देवता रमतात.

613  प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.

614  शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.

615  शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

616  पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

617  अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.

618  देश तुमच्यासाठी काय करील हे विचारण्यापेक्षा देशासाठी तुम्ही काय कराल ते सांगा.

619  अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

620  समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.

621  फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.

622  पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.

623  दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.

624  श्रध्देच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य करता येतात.

625  महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते.

626  क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

627  आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.

628  पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.

629  जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.

630  अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.

631  जे तलवार चलवतील ते तलवारीनेच मरतील.

632  मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

633  दुष्टांच्या संगतीत सदाचार लोप पावतो.

634  विचार परीपक्व झाले की शब्दांचे रूप देऊन कागदावर उतरवता येतात.

635  नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खूप अवघड.

636  राजाला फक्त राज्य मानते, तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व.

637  निंदकाचे घर असावे शेजारी.

638  कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही; मात्र मोर मेला तर आपण हळहळतो. कारण सौंदर्य नष्ट होते.

639  लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे.

640  बुध्दी आणि भावना यांचा योग्य संयम म्हणजेच विवेक.

641  त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे.

642  आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

643  मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

644  प्रत्यक्षानुभूती हेच खरे ज्ञान.

645  कुणाचेही अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे “खरे भाषण” !

646  खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे आणि देशाचे हीत ज्यात असेल तेच करावे.

647  जो आत्मप्रौढी करेल त्याची मानहानी होईल आणि जो नम्रतेने राहील त्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल.

648  खरी प्रीती ही कुसुमापेक्षाही कोमल व वज्रापेक्षाही कठोर असते.

649  कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.

650  मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे, तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

651  कीर्ती ही सावलीप्रमाणे सदगुणांबरोबर वावरत असते.

652  औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

653  हात उगारण्यासाठी नसतात; उभारण्यासाठी असतात.

654  तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून असते.

655  माणसाचे चरित्र्य आरशात दिसत नसते.

656  वैयक्तिक तृष्णेला अंत नसतो.

657  जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.

658  सन्मित्र ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.

659  गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच.

660  ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.

661  लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.

662  दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे.

663  सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले.

664  प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते.

665  नियम अगदी थोडा असावा पण तो प्राणापलिकडे जपावा.

666  शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

667  सदगुणांवर हल्ला केला तरी त्याला इजा होत नाहीत.

668  मानापमानाच्या पलिकडे जगणं शिका.

669  माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे म्हणा.

670  जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

671  सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड.

672  माणंसाकरिता धर्म आहे, धर्माकरिता माणसे नाहीत हे लक्षात घ्या.

673  जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.

674  माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशूत होते.

675  कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो.

676  प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लागतो.

677  केल्याविण सांगो नये आपला पराक्रम ॥

678  विचार बदला; आयुष्य बदलेल.

679  ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

680  एकच नियम पाळा – कोणताही नियम तोडू नका.

681  ज्याला काय लिहावं यापेक्षा काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक !

682  मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का !

683  बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !

684  मृत्यू म्हणजे दु:ख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही.

685  आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप !

686  ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

687  आपली बाजू न्याय्य असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.

688  आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

689  आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.

690  अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

691  आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.

692  आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते.

693  आशा ही उत्साहाची जननी आहे.

694  अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

695  आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

696  आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो.

697  आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते !

698  अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.

699  अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

700  आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.

701  आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

702  असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.

703  असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगूर असतो.

704  इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

705  उद्योगी माणूस कधीच निर्धन नसतो.

706  कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

707  कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.

708  कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

709  कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.

710  कोमलता हा हृदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.

711  खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

712  खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.

713  घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

714  गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

715  घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.

716  घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे.

717  चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

718  छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते.

719  चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी.

720  जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.

721  ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

722  जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार?

723  ज्याची कृती सुंदर तो सुंदर !

724  जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.

725  ज्योतीचं महत्त्व आणि पावित्र्य हे अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळंत.

726  जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !

727  जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख का येतं ? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती, क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून !

728  ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !

729  झऱ्याचे रुपांतर नदीत होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात. वाईट सवयींचेही असेच होते.

730  जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो.

731  ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.

732  तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.

733  थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !

734  थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.

735  दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.

736  दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.

737  दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.

738  शिक्षणाला जीवनाचे उद्दीष्ट बनवण्यापेक्षा जगण्याचे साधन बनवा.

739  दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.

740  दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.

741  दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.

742  ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

743  नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.

744  नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.

745  नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.

746  प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

747  पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो, तो आपोआप जिरू द्यावा लागतो.

748  कलेची पारंबी माणसाला बळ देते.

749  फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

750  बुद्धीमत्तेपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आहे.

751  काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.

752  मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

753  मुलांच्यात बदल हाच शिक्षकाचा आनंदाचा ठेवा !

754  माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.

755  माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

756  माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.

757  मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

758  नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.

759  मोठ्या लोकांचा मत्सर करु नका; कारण त्यामुळे तुमचा क्षुद्रपणा प्रकट होतो.

760  यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

761  रडण्याने भविष्य बदलत नसते.

762  लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं.

763  विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत.

764  वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.

765  विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.

766  शिक्षेपेक्षा क्षमेनेच कार्यभाग साधता येतो.

767  शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.

768  संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.

769  संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं – स्वत:लाही आणि इतरांनाही !

770  जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.

771  सोप्यातले सोपे कामही अविचाराने केल्यास अधिक अवघड बनते.

772  समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका.

773  प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणे होय.

774  स्वत:च स्वत:चे न्यायाधीश बनू नका.

775  संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दु:ख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो.

776  संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव !

777  हृदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते.

778  हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

779  हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.

780  आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.

781  श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात

782  क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.

783  ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चात्रित्र्य निर्माण करणे हेच असले पाहिजे.

784  आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.

785  प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.

786  जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे.

787  दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.

788  काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.

789  जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.

790  असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.

791  वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

792  स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.

793  त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.

794  ‘स्व’ चा शोध घेण्यास ‘स्व’ बद्दलचे सत्य मत लागते.

795  तुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी तेवढीच तुमची बदनामी जास्त.

796  पापी माणसाला पाप कधीही शांतपणे झोपू देत नाही.

797  सुधारणा ही बाहेरुन लादता येत नाही, तिचा उगम आतूनच पाहिजे. भीती घालून कुणालाही सदगुणी बनवता येत नाही.

798  अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.

799  गैरसमज कधीही मनात ठेवू नये. त्याचे निराकरण करावे.

800  ज्याच्याजवळ पैशाशिवाय दुसरे काहीच नाही तो सर्वात गरीब!

भाग ३                                                      भाग ५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा