सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ५ मार्च, २०२२

सुविचार संग्रह भाग ५

 

सुविचार संग्रह भाग ५ 

801  जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ट होत नाही. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते, तेव्हा त्याचे काहीतरी नष्ट होते. परंतु, जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते.

802  एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे.

803  कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.

804  परिश्रमाशिवाय प्रारब्ध पांगळे असते.

805  देशातील प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत स्वत:च्या कर्तव्याची जाणीव होत नाही किंवा ती जाणीव होऊनही

806  त्यानुसार वागावेसे वाटत नाही, तोपर्यंत त्या देशाचा उध्दार होणे कठीण असते.

807  तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फेडावे लागते.

808  जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.

809  शहाणा मनुष्य स्वत:च्या उत्पन्नाप्रमाणेच स्वत:चे जीवन जगतो.

810  प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत:च असतो.

811  विश्वास म्हणजे मनुष्याला जीवंत ठेवणारी शक्ती होय.

812  चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शितल असतो.

813  जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका.

814  त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.

815  विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो.

816  मृत्यूला सांगाव, ये ! कुठल्याही रुपाने ये. पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

817  जगातील प्रत्येक घर हे शाळा आहे, आणि माता पिता हे शिक्षक !

818  स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते.

819  ज्यांना नमस्कार करायला जागा नाही अशी माणसं अभागी आणि जागा असूनही.

820  ज्यांना नमस्कार करता येत नाही ती निव्वळ कपाळकरंटी.

821  सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत. येतो म्हणतात पण येत नाहीत.

822  नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.

823  धर्माच्या नावाने मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळणे हा अधर्म आहे.

824  हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे स्वत:ची विक्री केल्यासारखे आहे.

825  या जगात एकच जात आहे- माणूस ! आणि धर्मही एकच- माणूसकी!

826  परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.

827  कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन.

828  नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली तो म्हातारा.

829  खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥

830  ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

831  ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.

832  आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.

833  पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.

834  ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥

835  स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !

836  जीवन हे यश आणि अपयशाचे परिणाम आहे.

837  समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.

838  ज्याला या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.

839  महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.

840  माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

841  गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

842  यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

843  आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

844  आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

845  मी करतो या भावनेचे नाव प्रपंच, तर परमेश्वर माझ्याकडून करवून घेतो या भावनेचे नाव परमार्थ !

846  विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्ती शिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही.

847  मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

848  आयुष्यात तुम्ही किती अनादी आहात ते महत्त्वाचं नाही तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्त्व आहे.

849  शब्दांमुळे माणसे जुळतात आणि तुटतातही म्हणून शब्दांची किमत समजून घ्या. आहात तोपर्यंत चार प्रेमाचे शब्द वापरा तेच कामी येतील.

850  तरुण स्त्रीला नुसती नवऱ्याची बायको होऊन चालत नाही तर कधी त्याची प्रेयसी, कधी बहिण फार तर काय कधीकधी आईही व्हावे लागते. कारण स्त्री शक्ती रुपीणी आहे.

851  जर आपण आपल्या कामाला आनंदाने स्वीकारले नाही तर काम कधीतरी आपल्याला चांगलाच आनंद देईल.

852  जीभ हि दोन माणसात बसवते अन दोन माणसातून उठवते म्हणून शब्दांचा वापर व्यवस्थित करावा.

853  जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.

854  क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

855  उद्यासाठीची सर्वात चांगली तयारी म्हणजे वर्तमानातील तुमचे सर्वोत्तम प्रयत्न होय.

856  आपण किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याचा विचार करा. दुर्बल माणूस कायम भीती बाळगतो तर शूर कायम ताठ मानेने जगतो.

857  भूतकाळात भटकत राहणे किंवा भविष्याबद्दल चिंता करणे यापेक्षा आजचा आलेला अनमोल क्षण सर्वोत्तम काम करून व्यतीत करा; मग यश तुमचेच.

858  अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

859  ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.

860  सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे: पाप होईल इतके कमाउ नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये, आणि भांडण होईल इतके बोलू नये.

861  व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

862  व्यर्थ गोष्टीची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. अश्रू येणे हे माणसाला हृदय असल्याचे द्योतक आहे.

863  खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात,पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

864  सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे, आपले गुपित कुणालाही सांगू नका ते तुम्हाला हानिकारक आहे.

865  ज्या व्यक्तीने कुठलीही चूक केली नाही त्या व्यक्तीने काहीही नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही.

866  आनंदी राहायच असेल तर अपेक्षा स्वतः कडून ठेवा, समोरच्यांकडून नव्हे. 

867  केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. 

868  दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे. 

869  दुःख विभागल्याने कमी होत आणि सुख विभागल्याने वाढते. 

870  अज्ञानी असणं तेवढं शर्मेच नाही जेवढं काहीही शिकण्याची इच्छा न ठेवणं. 

871  कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका. 

872  मित्र परिवारासारखे असावेत म्हणजे आयुष्याचे सोन होत. 

873  तुमचं आनंदी राहणंच तुमच्या शत्रुकरिता सर्वात मोठी शिक्षा आहे.

874  प्रत्येक पतंगीला माहिती असत कि शेवटी कचऱ्यात जायचंय, पण त्याच्याअगोदर आकाश गाठायचंय. जीवन सुद्धा हेच मागत असत. 

875  विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

876  विद्वत्त्ता सगळ्यांत असत, त्यानुसार जगण्याच धेर्य मात्र सगळ्यात नसत.

877  कष्टामुळे भविष्यकाळ चांगला होतो आणि आळसामुळे वर्तमानकाळ. 

878  न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न कारण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं.

879  रोज काहीतरी उपयुक्त वाचून आत्मसात करायला शिका. 

880  मनगटातली ताकद सपंली की माणूस हातामध्ये भविष्य शोधतो. 

881  सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात , काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. 

882  काम केल्याने माणूस मरत नाही, तो आळसानेच मरतो. 

883  आपले नेमके ध्येय निश्चित करा आणि मगच प्रयत्नाला लागा. 

884  जे आपण विचार करतो, तेच आपण बनत जातो.  

885  विचार करूनही फायदा होत नसेल, तर खरंच विचार करायला हवा. 

886  असं काम करा की नाव होऊन जाईल नाही तर असं नाव करा की लगेच काम होवून जाईल.

887  तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या जोवर तुम्ही धावण्याच धाडस करणार नाहीत, तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील. 

888  आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसत. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असत . चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस.

889  माणुस घरे बदलतो , माणुस मित्र बदलतो , माणुस कपडे बदलतो , तरी तो दु :खी असतो  कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.

890  केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

891  यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

892  विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

893  वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही.

894  आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

895  सुखी आणि आनंदी रहायचं असेल तर समाजात राहण्याचा प्रयत्न करा. एकटे रहाल तर दुखः पदरी पडेल.

896  पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा , पुत्री व्हावी ऐसी भागीरथी  तिन्ही कुळ उद्धरती.

897  स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

898  अपयश हि यशाची पहिली पायरी आहे.

899  जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

900  भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

901  आपण नेहमी आपल्या कमी असलेल्या माणसाकडे बघितले की आपल्याला कळते की आपण किती सुखी आहोत.

902  दुसऱ्याच्या तोंडाला काळे फासताना प्रथम स्वतःच्या हाताला काळे लागते हे पाहा.

903  कावळ्याने कधी कोकीळेशी बरोबरी करू नये कारण कोकीळा कुहू कुहूच गाणार आणि कावळा काव काव करून अपशकूनच करणार.

904  नागाच्या दातात विष असते, माशीच्या सोंडेत विष असते पण माणूस हा इतका भयानक प्राणी आहे की, त्याच्या सर्वांगातच विष भिनलेले असते.

905  माणसाला जीवनात पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारीक ज्ञानच जगायचे कसे ते शिकविते.

906  माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत विद्यार्थी असतो.

907  शाळा कॉलेजात प्रथम श्रेणीने पास झालेला माणूस जेव्हा जबाबदार व्यक्ती म्हणून व्यावहारिक जगात उतरतो तेव्हाच त्याने घेतलेल्या शिक्षणाचा खरा कस लागतो.

908  भोपळ्याचा वेल मोडक्या काठ्यांच्या सहाय्यानेच वर चढतो पण वरती गेल्यावर सुद्धा काठ्यांना विसरत नाही. तसेच शिकून कितीही मोठा झाला तरी माणसाने त्याच्यासाठी ज्या ज्या हातांचे सहाय्य झाले आहे त्यांना अंतर देऊ नये.

909  सरोवरात अनेक बदके पोहताना दिसतात. पण हंस मात्र एकच असतो.

910  कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहचण्याची अपेक्षा करू नये.

911  सत्तालालसेपायी माणूस आपल्या स्वतःला अनेक शत्रू निर्माण करतो.

912  दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होणे हे पण शहाणपणाचे असते.

913  जगात चिरंजीव कोणीच नाही, शिवाय सप्तचिरंजीव मारुती, अश्वत्थामा, बिभिषण, परशुराम, कृपाचार्य, कार्तिकेय.

914  आपण उच्चकुळीचा आणि दुसरा नीच कुळीचा अशा दृष्टीने राहू व वागू नये.

915  घेतलेल्या विद्येचा योग्य वापर करा. मग तुमची ती विद्या विधायक असो अथवा विघातक.

916  ज्ञानाने माणसाची विद्वत्ता वाढते पण सदाचार वाढतोच असे नाही. १६८. सुविद्य माणसाच्या मनात नेहमी सुविचारच असतात.

917  मुलांनो सुविचार आचरणात आणा, केवळ वाचनासाठी पुस्तक संग्रह करू नका.

918  अविरत परिश्रम करून मिळणाऱ्या यशाचा अमृत कुंभ हातात घेण्यापूर्वी हलाहल पचवावे लागते.

919  लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.

920  आपल्या छोट्या घरातसुद्धा सुखामृत भरलेले असताना बाहेरील सुखाच्या मृगजळामागे जो धावतो तो एक मूर्ख होय.

921  जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला.

922  सोन्याची सुरी मिळाली म्हणून कोणी गळा कापून घेत नाही.

923  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

924  पुरुषाच्या हातावरच्या रेषा पहावयाच्या नसतात तर हातावरचे घठे बघावयाचे असतात.

925  तोंडातून गेलेला शब्द दहा गाड्या पाठविल्या तरी परत येत नाही.

926  तलवारीचा वार भरून निघतो. शब्दांचा घाव मात्र सतत मरण देत असतो.

927  शरणागताला अभय द्या, वाटेवरच्या वाटसरूला पाणी द्या आणि घरी आलेल्या अतिथीला सुग्रास भोजन द्या हाच खरा गृहस्थधर्म.

928  भवसागर तरून न्यायला गुरुवं लागतोच तेव्हा आपला गुरु कराल तो पारखूनच करा.

929  प्रत्येकाला जीवनात तीन ऋण फेडायचे असतात. मातृऋण, पितृऋण आणि देशाचे ऋण.

930  समाजात मिळून मिसळून रहा कारण ज्या समाजात तुम्ही रहाता त्याचेसुद्धा तुम्ही काही देणे आहात.

931  मनी नाही भाव नी देवा मला पाव.

932  जीवन जगाल तर पारिजातकाच्या फुलासारखे जगायचा प्रयत्न करा, साधे पण कोमल सौंदर्य तरीपण सुगंधी.

933  जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे.

934  आपल्या संस्कृती मूल्यांचे जतन करा. तिची कबर खोदू नका.

935  मातीशी इमानी रहा कारण शेवटी एक दिवस आपण पण त्याच मातीत जाणार आहोत.

936  बाह्य रंगापेक्षा अंतरंग मोकळे ठेवा.

937  मनात ठेवून कुढत रहाण्यापेक्षा चार शब्द स्पष्टपणे बोलून मन साफ ठेवा.

938  झेप असावी गरुडाची, नजर असावी ससाण्याची, जिद्द असावी फिनीक्स पक्ष्याची राखेतून निर्माण होण्याची.

939  वृक्षाचे संगोपन म्हणजे देशाचे व निसर्गाचे रक्षण करणे.

940  मोकळा वेळ लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा विघायक कामात खर्च करा.

941  पाणी हे जीवन आहे ते जपून वापरा.

942  लहान मुले मातीच्या गोळ्यासारखी असतात, त्यांना योग्य वळण आकार देणे तुमचे काम आहे.

943  आजचे बालक उद्याचे नागरीक आहे. त्यादृष्टीने त्याला योग्य शिक्षण द्या.

944  मुलांना मारून शिस्त लावण्यापेक्षा त्याच्या कलाने व प्रेमाने घ्या.

945  खरे आणि खोटे यात फक्त चार बोटांचे अंतर असते.

946  सद्गुण, सदाचार, सत्कार्य आणि सेवाभाव ही माणसाच्या जीवनाची चतुःसुत्री आहे.

947  कुठलाही मनुष्य जात्या वाईट नसतो वाईट असते त्याची वृत्ती.

948  जीवनात विचाराने वागल्यास पश्चातापाच्या आगीत जळावे लागत नाही.

949  मोठ्या झाडाखाली लहान झाडे वाढत नाहीत.

950  दाता कर्णासारखा असावा, भ्राता श्रीकृष्णासारखा असावा.

951  कुठल्याही गोष्टीचा परामर्श हा बघावाच लागतो.

952  फुटलेले मणी आणि तुटलेले मन सांधता येत नाही.

953  वादळे झाली तरी सागर कधी आटत नाही.

954  झटपट परिचय अंगाशी येण्याचा संभव जास्त.

955  काम करायचे नसेल तर मोठ्या अटी घातल्या जातात.

956  गवतापेक्षा कापूस हलका, कापसापेक्षाही याचक हलका पण वारा त्याला उडवून नेत नाही कारण वायाला भिती वाटते की याचक आपल्याकडे काही दान मागेल का?

957  वेष असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना कळा.

958  भुंकणाऱ्या कुत्र्याला जर पोळीचा तुकडा टाकला तर तो गप्प बसतो तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करणाऱ्याला काही देऊन आपले काम साधावे.

959  ज्या ठिकाणी ज्ञानी माणूस नसतो त्या ठिकाणी कमी शिकलेला माणूस ज्ञानी असतो.

960  काव्याचा आनंद हा अमृताप्रमाणे असतो.

961  पावसाला सुरुवात झाली की कोकीळा गात नाहीत तर बेडूक डराव डराव करतात. त्याचप्रमाणे ज्ञानी माणसांनी अज्ञानी माणसांसमोर गप्प रहाणे हे श्रेयस्कर असते.

962  असंतोष हेच वैभवाचे प्रतिक आहे.

963  कर्म हे च मनुष्याच्या बरोबर जात असते तेव्हा त्यानी ठरविले पाहिजे आपण चांगले कर्म करावे की कुकर्म करावे.

964  ईश्वर हा एकच असून देव ही त्याची अनेक रूपे आहेत.

965  प्रेमाचा ओलावा दुःखी हृदयाच्या माणसाला धन संपत्तीपेक्षा जास्त असतो.

966  शत्रूबरोबर मैत्री राखणे ही प्रेमाची परीक्षा असते. हा गुण संपत्तीपेक्षा जास्त असतो.

967  सुहास्य हा असा अलंकार आहे की तो कोणत्याही व्यक्तिच्या मुखकमलावर शोभा देतो.

968  संकटे, दुःख, अडचणी याची माळच तयार असते. ती एका पाठोपाठ येत राहातात.

969  सौंदर्याची स्तुती करणे हा आपण त्या व्यक्तिला दिलेला मानच होय.

970  पराभवाने खचून न जाता पुन्हा त्याच धैर्याने उभे रहाणारा खरे जीवन जगू शकतो.

971  वृक्ष हे तुमच्या माता पित्या समान असतात.

972  वृक्षाने निसर्गाचा समतोल राहातो.

973  काम, क्रोध, मत्सर, मोह हे माणसाचे शत्रू आहेत.

974  सत्याचा मार्ग सुख समाधानाच्या वाटेने जातो.

975  कोणचाही आदर्श ठेवताना तो आदर्श आहे की नाही हे पडताळून पाहा.

976  सूर्याकडे पाहा ज्याप्रमाणे तो निर्मल व तेजस्वी असतो. त्याचप्रमाणे सज्जन माणूस अंर्तबाह्य असतो.

977  तुम्हाला राग आला तर दहा अंक मोजा.

978  राक्षसासारखी ताकद कधीही चांगलीच पण राक्षसी लालसा असू नये.

979  माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो.

980  स्त्रिची अब्रू ही काचेच्या भांड्यासारखे असते.

981  मनुष्याला जीवनात जर पुढे यायचे असेल तर आत्मविश्वास, इच्छाशक्ती, दृढ निर्णय या तीन गोष्टी असायलाच हव्यात.

982  काही गोष्टी काहीजणांना निसर्गदत्त देणगीने प्राप्त असतात तर याच गोष्टीच्या प्राप्तीसाठी इतरांना परिश्रम करावे लागतात.

983  प्रगतीसाठी कुटुंबातून चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते.

984  मानसिक स्वास्थ्य हा मानवी जीवनातील सुखाचा फार मोठा महत्त्वाचा भाग आहे.

985  कलात्मक सौंदर्य निर्मितीचा आनंद हा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात भरभरून घ्यावयास हवा.

986  ज्या गोष्टी तुम्ही मुलांना शिकविणार आहात त्याचे प्रथम आचरण तुमच्याकडून व्हावयास हवे.

987  माणसाने जीवन म्हणजे एक घड्याळच आहे फक्त त्याची किल्ली परमेश्वराच्या हातात आहे.

988  डॉक्टर तुम्हाला एखाद्या रोगातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो पण तो आयुष्य वाढविणारा धन्वंतरी नव्हे.

989  मंगळसूत्राच्या चार काळ्या मण्यांनी स्त्रिच्या गळ्याला जी शोभा येते ती इतर कोणत्याही गळेसरीने येत नाही.

990  राजा हा प्रजेचा पालनकर्ता आहे त्याला स्वतःचे अस्तित्व नसतेच.

991  घरच्या गोष्टीचे ज्याला योग्य निर्णय घेता येत नाहीत तो इतरांना काय सल्ला देणार.

992  लग्न हा सुख दुःखाचा डोह आहे, केवळ कामपिपासूपणा नाही.

993  ज्याला चार भिंतीचा आसरा असतो, तो मनुष्य आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो.

994  जेथे सुख, समाधान, हास्य आणि मनमिळावूपणा असतो त्याला घर म्हणतात नाहीतर चार भिंती आणि वरती छप्पर असलेले घर हे कोंडवाडा होऊ शकते.

995  एखाद्या निर्णयाप्रत पोचायचे असेल तर प्रत्येक गोष्टीचा परामर्श घेतला पाहिजे.

996  माणसाने नेहमी विरुद्ध बाजूसुद्धा धरून चालावी म्हणजे अपयश आले तरी सहन करण्याची ताकद येते.

997  तुम्ही केलेले सुकर्म हे तुमच्या पुढील अन्यायासाठी उपयोगी पडते आणि गेल्या जन्मी केलेल्या पाप-पुण्याची फेड करण्यासाठी मानव जन्म मिळत असतो.

998  चौदा लक्ष योनीतून फिरून मानव जन्म येत असतो. तेव्हा हे जिवा सत्कर्म कर, मोहमायेच्या पाठी लागून आयुष्याचे नुकसान करू नको.

999  काळ हा नाशिवंत आहे. आपले आयुष्यसुद्धा उगवणाऱ्या दिवसानुसार कमी होत असते. तेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना सारासार विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते.

1000  विद्यार्थी दशेतील काळ विद्यार्जनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो.

भाग ४                                                      भाग ६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा