सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

सामान्य ज्ञान प्रश्नावली

सामान्य ज्ञान प्रश्नावली
चला गुणवंत होऊ

रविवार, ६ मार्च, २०२२

चंद्रासंबंधीची माहिती

 


चंद्रासंबंधीची माहिती


चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे. 

चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो. चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा