भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन
वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.लता मंगेशकर यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले होते. इतिहासात सर्वाधिक रेकॉर्ड केलेल्या गाण्यांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
१९७४ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या एडिशनमध्ये लता मंगेशकर यांना सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून घोषित केले.
लता मंगेशकर यांचा हा विश्वविक्रम त्यांची धाकटी बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मोडला. २०११ मध्ये, सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आणि त्यांनी पेक्षा जास्त भाषांमध्ये ११,००० सोलो, युगल आणि कोरस गाणी गायली असल्याचे अधिकृतपणे नोंदवले गेले आहे. मात्र, आता हे शीर्षक दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील गायिका पुलपाका सुशीला यांच्या नावावर नोंदवण्यात आले आहे.लता मंगेशकर यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि लीजन ऑफ ऑनर यासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले.
भारत सरकारचे पुरस्कार
१९६९ – पद्मभूषण
१९८९ – दादासाहेब फाळके पुरस्कार
१९९९ – पद्मविभूषण
2001 – भारतरत्न
2008 – भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त “वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट”
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
1997 – महाराष्ट्र भूषण पुरस्कार
2001 – महाराष्ट्र रत्न (प्रथम प्राप्तकर्ता)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा