राज्यात सार्वजनिक सुट्टी ; बँका, केंद्र सरकारी कार्यालये, शाळा बंद
भारतरत्न लता मंगेशकर यांचे दु:खद निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ही सुट्टी राज्य सरकारला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार परक्राम्य संलेख अधिनियमानुसार जाहीर करण्यात आलेली असल्याने सर्व सरकारी कार्यालये, शाळा, केंद्र सरकारची राज्यातील कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बंद राहतील.
केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असल्याने या काळात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत.राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?
राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असतं. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो.त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहेभारतातील ‘राष्ट्रीय दुखवटा’ हा संपूर्ण राष्ट्राचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक मार्ग आहे. हा ‘राष्ट्रीय दुखवटा’ एखाद्या ‘व्यक्तीच्या’ निधनानंतर किंवा पुण्यतिथीला पाळला जातो. भारताच्या ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय दुखवट्याच्या वेळी, संपूर्ण भारतात आणि परदेशातील भारतीय संस्थांमध्ये (जसे की दूतावास इ.) राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केले जात नाही आणि कोणतेही अधिकृत काम केले जात नाही. मेळावे आणि अधिकृत मनोरंजनावर देखील बंदी असते. निधन झालेल्या व्यक्तीवर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात.राजकीय, साहित्य, कायदा, विज्ञान आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रातील मृत्यू झालेल्या व्यक्तीला राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतात. निर्णय झाल्यानंतर तो उपायुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळवला जातो. जेणेकरून शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करता येईल.
शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करताना मृतदेह तिरंग्यात गुंडाळला जातो. निधन झालेल्या व्यक्तीला संपूर्ण लष्करी सन्मान दिला जातो. यानंतर लष्करी बँडद्वारे आणि बंदुकीद्वारे सलामी दिली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा