Asia’s Richest Person: गौतम अदानी ठरले जागतील सर्वात वेगाने संपत्ती वाढणारे कोट्याधीश
अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील चुरस दिसून येत आहे.
बंदरे, विमानतळं, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी ८८.५ बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटलंय. याचवेळी अंबानींची एकून संपत्ती ही ८७.९ बिलीयन डॉलर्स इतकी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा