सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष ३० एप्रिल

 

दिनविशेष ३० एप्रिल  

दिनविशेष ३० एप्रिल

३० एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१४९२: स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.

१६५७: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करुन ते लुटले.

१६६७: मुघलकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर स्वारी करून भरमसाठ लुट केली.

१७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.

१९७७: ९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.

१९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.

१९९५: ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.

२००९: ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना: १९२५)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७७७: कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)

१८७०: दादासाहेब फाळके.

१८७०: धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)

१८९६: आध्यात्मिक गुरु मां आनंदमयी यांचा जन्मदिन.

१९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ (मृत्यू: ११ आक्टोबर १९६८)

१९१०: श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९८३)

१९२१: जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)

१९२६: श्रीनिवास खळे – संगीतकार (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)

१९२७: भारतीय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला व पहिल्या मुस्लीम न्यायाधीश एम. फतिमा बीवी यांचा जन्मदिन.

१९४९: पोर्तुगीज देशाचे माजी पंतप्रधान व राजकारणी आणि मुत्सद्दी तसचं, संयुक्त राष्ट्राचे माजी (९ वे) महासचिव अँटोनियो मॅन्युएल डी ऑलिव्हिएरा गुटेरेस यांचा जन्मदिन.

१९८७: रोहित शर्मा – क्रिकेटपटू

२०१३: नेदरलँड देशाच्या महाराणी बीट्रिक्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विल्यम अलेक्झांडर हे नेदरलँड्स देशाचे नवीन राजा बनले.

२०१७: नेपाल देशातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्याविरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा