दिनविशेष २१ एप्रिल
२१ एप्रिल :
महत्त्वाच्या घटना:
७५३: रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)
१५२६: मुघल साम्राज्याचे शासक सम्राट अकबर व सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतचे पहिले युद्ध होऊन त्यांत सुलतान इब्राहिम लोदी यांच्या पराभवानंतर दिल्ली येथील सुलतान शाहीचा अंत झाला.
१६६९: छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची भेट घेतली.
१७२०: पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी बनले
१९३२: नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
१९४१: दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ग्रीस देश जर्मनी देशाला शरण गेला.
१९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.
१९७२: ’अपोलो १६’ या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
१९९६: भारतीय वायू सेनेचे अधिकारी संजय थापर पॅराशूट च्या साह्याने उत्तर ध्रुवावर उतरले.
१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय ७८ वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली. गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनी ८१ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली होती.
२०००: आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.
२००७: वेस्ट इंडीज देशातील क्रिकेट संघाचे महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी एकदिवसीय क्रिकेट खेळातून निवृत्ती घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा