सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, ७ मार्च, २०२३

दिनविशेष ७ एप्रिल

 

दिनविशेष ७ एप्रिल  

दिनविशेष ७ एप्रिल

७ एप्रिल :


महत्त्वाच्या घटना:

१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.

१८२७: जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.

१९०६: माऊंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन नेपल्स शहर बेचिराख झाले.

१९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.

१९४०: पोस्टाचे तिकीट निघणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.


१९४८: जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस ’जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.

१९६२: इंटरनेट प्रणाली सक्रीय करण्यात आली.

१९६४: आय.बी.एम. तर्फे सिस्टम/३६० (System/360) ची घोषणा.

१९८९: लठ्ठा नावाची विषारी दारू प्यायल्याने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला. विषारी दारुच्या बळींची ही मोठी दुर्घटना होती.

१९९६: सिंगर करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज सनत जयसूर्या याने केवळ १७ चेंडुत अर्धशतक झळकावण्याचावि विश्व विक्रम केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५०६: सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे. (मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ – साओ जोआओ, चीन)

१७७०: विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (मृत्यू: २३ एप्रिल १८५०)

१८६०: विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (मृत्यू: ६ आक्टोबर १९५१)

१८९१: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ – लंडन, इंग्लंड)

१९१९: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय कवी, कादंबरीकार, नाटककार आणि उर्दू साहित्याचे लघुकथा लेखक कश्मीरी लाल जाकिर यांचा जन्मदिन.

१९२०: पंडित रविशंकर, भारताचे प्रसिध्द सतारवादक.

१९२५: चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: २ जुलै २०११)

१९३८: काशीराम राणा – भाजपाचे लोकसभा सदस्य (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२)

१९४२: जितेंद्र – चित्रपट अभिनेता

१९५४: हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.

१९८२: सोंजय दत्त, भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१४९८: चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ३० जून १४७०)

१९३५: डॉ. शंकर आबाजी भिसे – भारताचे ‘एडिसन’ (जन्म: २९ एप्रिल १८६७)

१९४७: हेन्‍री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ३० जुलै १८६३)

१९७७: राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार (जन्म: १ फेब्रुवारी १९१२)

२००१: गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist). वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले. (जन्म: ८ आक्टोबर १९२२ – एर्नाकुलम, केरळ)

२००४: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (जन्म: ८ जानेवारी १९२६)

२०१२: हिंदी भाषिक कवी, लेखक व समीक्षक आचार्य जानकी वल्लभ शास्त्री यांचे निधन.

२०१४: भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध छायाचित्रकार वेंकटाराम पंडित कृष्णमूर्ती उर्फ व्ही. के. मूर्ती यांचे निधन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा