स्वच्छता
एक राजा होता. प्रजेचा लाडका. प्रजेच्या हितासाठी झटणारा. प्रजा राजाला मानत असे, परंतु त्यांच्यात एकी नव्हती. राज्यात नियमांचे पालन करीत नसे, बरीच ठिकाणे अस्वच्छ असत. राजा बिचारा प्रजेला सांगून थकला. मग शेवटी, खूप घाण झाली की दरबारातल्या सेवकांकडून स्वतः साफ करून घ्यायचा. प्रजेतील लोक सुद्धा विचार करत, आपण कशाला साफसफाई करा, करेल कोणी तरी, नाही तर राजा आहेच. प्रजेच्या या वागणुकीला राजा वैतागला होता. पण काय करणार, सांभाळून घ्यायचा.
एकदा त्या राज्यात साथीचा महाभयंकर रोग पसरला. अनेकांना त्या रोगाची लागण व्हायला सुरुवात झाली. त्या रोगाचे कारण काय हे राज्यातल्या वैद्यांना समजले नाही. पण काही तरी वेगळा आजार आहे, आणि घाण पसरल्याने हा आजार अधिक बळावतो हे त्यांच्या लक्षात आले. रोज तीन चार जण मरण पावत होते. पण प्रजा मात्र ढिम्म. दुसरा कोणी तरी साफसफाई करेल, या विचाराने निर्धास्त. स्वताची घरे साफ पण परिसर, सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ.
दुःखी कष्टी राजा देवाची प्रार्थना करू लागला. कोणीतरी सुचवले, यज्ञ करा. त्याने राज्यात दवंडी पिटवली. “उद्या राजाने यज्ञ करण्याचे ठरवले आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, जेणे करून आपल्या राज्यावरील संकट दूर होण्यास मदत होईल”. यज्ञ जिथे ठरवला होता, तिथे सार्वजण जमले. अतिशय मनोभावे सर्व जण देवाची प्रार्थना करत होते. इतक्यात आकाशवाणी झाली. ढगातून आवाज आला. “जर तुम्हाला या महारोगातून मुक्त व्हायचे असेल तर, उद्या , आम्वास्येच्या रात्री सर्व नागरिकांनी, गावाजवळच्या कोरड्या विहिरीत एक एक बादली दुध ओतावे. तरच फायदा होईल”
लोक घाबरले. काय करायचे असा विचार करू लागले. प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी हि बातमी कळवली, आणि उद्याची तयारी केली. राज्यातल्या एका माणसाने विचार केला, नाही तरी सगळे बादली-बादली दुध टाकणार आहेतच, आपण एक बदली पाणी टाकू. अमावस्येच्या रात्री कुठे कोणाला काय कळणार आहे? आणि एवढ्या दुधात एक बादली पाणी कोणाला कळणारही नाही. त्याने तेच केले, घरातून गुपचूप एक बादली पाणी नेले आणि विहिरीत ओतून आला.
दुसऱ्या दिवशी राजा लवकर उठला, गावाची पाहणी केली, आणि बघितले, तर सकाळी सकाळी दोघे जण अत्यवस्थ होते. याचा अर्थ आकाशवाणी खोटी होती की काय? पण असे कसे होईल? काही तरी चुकते आहे. त्याने काहीतरी विचार केल आणि तो त्या विहिरी जवळ गेला. विहिरीत डोकाऊन पाहतो तर काय, विहीर पाण्याने भरलेली. त्याला अपेक्षित तेच झाले होते. त्याने सर्व नागरिकांना विहिरीपाशी एकत्र बोलाविले आणि पाण्याने भरलेली विहीर दाखवली. बघा, तुम्ही सर्वांनी “दुसरा कोणीतरी विहिरीत दुध टाकेल, आपण कशाला उगाच त्रास घ्या, असा विचार केला आणि काय झाले ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे” असेच स्वच्छतेच्या बाबतीत आहे. ते सर्वांचे कर्तव्य आहे.
समाजात नेहमी असेच होते का? एखादे सामुहिक काम करायचे असते तेव्हा बरेच जण असा विचार करतात का? “आपण कशाला, दुसरा कोणी तरी करेल” अशी समजूत लोकांची झाली आहे का? आपले दुर्दैव म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा, बर्याच वेळा असा विचार करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळेच असे होते.
आपल्या नशिबाने आज आपल्या देशाला असे नेतृत्व मिळाले आहे ज्याने या बाबतीत त्याच्या प्रजेकडे एक मागणे मागितले आहे. चला, आपण सर्वांनी आपले कर्तव्य बाजावूया. राजकारण बाजूला ठेवा समाजकारण करा.
Source - Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा