सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

चंचल मन

 चंचल मन

चंचल मन

एकदा एका गावत एक व्यापारी रहात असे. गावातले लोक त्याला जाम शिव्या घालत. अतिशय श्रीमंत पण अतिशय कंजूस असा हा व्यापारी घरातही जाम कंजूसपणा करित असे. “मी आणि माझ” अशा संकुचित मनोवृत्तीचा असा हा व्यापारी. पण त्याची बायको मात्र एकदम चांगली, सर्वांच्या मदतीला धावून जाणारी आणि सर्वांमधे मिसळणारी अशी होती. देवाच वगैरे करायची, दान धर्म करायची. एकदम गरीब गाय. एकदा तिने खुप आग्रह करून तिच्या नवर्याला पुजेला बसवल. नवरा का कु करत का होइन पण बसला पुजेला.

पूजा झाली, जेवण झाली, सगळी, आवारा आवर झाली. गोडाधोडाच जेवण केल्याने दुपारची छान झोप लागली व्यापर्याला. इतकी गाढ की झोपेत स्वप्न सुद्धा पडल. त्याच्या स्वप्नात देव आले. स्वप्नात अगदी देवाने छान गप्पा मारल्या व्यापर्याशी. देवाने त्याला समजावल, "बाबा कंजूसपणा करत जाऊ नकोस. जेवढ कमावतोस त्याचा काही भाग तरी दान करत जा." सगळ्या गप्पा झाल्या, मग देवाने त्याला सांगितले, "चल तुला मी तिन वर देतो. तुला जे काही मागायचे असेल ते तू मागु शकतोस. पण लक्षात ठेव तीनच वर देणार. चल आता मी निघतो." आणि असे म्हणत देव नाहीसा झाला आणि व्यापरिही जागा झाला.

व्यापार्याला क्षणभर काही समजल नाही, स्वप्नात देवाने जे काही सांगीतल ते खर असेल का? खरच मला देव तिन वर देणार का?” असे प्रश्न त्याला पडू लागले. त्याने सर्व प्रकार आपल्या पत्नीला सांगीतला. पत्नी भाविक असल्याने त्याला म्हणाली, “अहो, तुम्ही खूप भाग्यवान आहात. असच होइल. पण वर मागताना स्वतःपुरता विचार करू नका, सर्वांचा विचार करा.” व्यापारी तिच्या या सल्ल्याकड़े दुर्लक्ष करतो आणि घरा जवळ असलेल्या एक झाड़ा खाली बसतो. आणि काय वर मागावे असा विचार करू लागतो. “हे खर आहे की नाही हे कसे समजेल? खरच किती मजा येईल.” असा विचार करत असताना त्या झाडावरचा एक कावळा जोर जोरात, कर्कश्श आवाजात ओरडत होता. व्यापर्याला त्याचा भयंकर राग आला. पुढचा मागचा विचार न करता तो म्हणला "देवा या कावळ्याला मारून टाक बाबा, जाम त्रास होतोय याचा" आणि काय आश्चर्य दुसर्या क्षणी तो कावळा मरण पावला आणि झाडाखाली पडला.

व्यापारी एकदम आश्चर्य चकित झाला. पण थोड्याच वेळात उदास होऊन म्हणाला "अरे देवा ; या कावळ्या मूळे एक वर फुकट गेला. उगाच मारल या कावळ्याला. आपल्यामुळे उगाच याचा जीव गेला. जीवंत करता आल तर बर होइल बाबा नाहीतर उगाच हत्येच पाप लागायच आपल्याला" आणि अस म्हणल्या म्हणल्या तो कावळा पुन्हा जीवंत होउन तिथून उडुन गेला.

हे पाहून तो अधिकच दुःखी झाला आणि त्याला स्वतःचा रागही आला. “या कावळ्यामुळे माझे दोन वर फुकट गेले. अरे काय हे आपले नशीब. श्या, आपण कुठे दुसर्या ठिकाणी जाऊ आणि निट विचार करून मग तीसरा वर मागु.” असा विचार करून तो आपल्या घरी एकदम एकांतात बसला आणि विचार करू लागला. पण त्याच्या मनात “आपले दोन वर फुकट गेले” हाच विचार सारखा घोळत होता. त्यामुळे तो खुपच दुःखी आणि अस्वस्थ झाला होता. खुप खुप विचार केल्यावर तो स्वतःशीच पुटपुटला " शा, काहीच सुचत नाहिये, त्या कावळ्याने फुकट नुकसान केले. आता एका वराने काय मिळणार? आत्ता देव पुन्हा आपल्या समोर आले तर बर हॊइल, मी त्यांच्या कड़े आणखी तिन वर मागेन" आणि असे म्हणल्या म्हणल्या देव त्याच्या समोर प्रकट होतात.


देव म्हणतात "बोल, काय झाल? माझी आठवण कशी झाली तुला?" व्यापर्याने घडलेला प्रकार देवाला सांगितला आणि आणि देवाकड़े “पुन्हा तिन वर दे” असे म्हणाला. देव म्हणाला "हे बघ, मी तुला तिन वर दिले होते ते तू वाया घालवलेस, आता काही मी तुला वर देऊ शकत नाही. पण तू एक गोष्ट नक्की ध्यानात ठेव, मन हे फार चंचल असत. मनावर ताबा मिळव म्हणजे सगळ मिळेल. तू मिळवलेली संपत्ति तुझ मन पोखरते आहे. तुला चंचल बनवते आहे.तू कंजूसपणा करतोस, दुसर्याचा विचार करत नाहीस, दुसर्यासाठी काही मागण तर शक्यच नाही, त्यामुळेच तू सुखी नाहीस. आज तुझ्या या वृत्तिनेच तुझा घात केला आहे. आता निट वाग आणि दान धर्म करून पूण्य कमव"

English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा