सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

उंटांची गोष्ट

 उंटांची गोष्ट

उंटांची गोष्ट


एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली. व मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.ज्यामध्ये असे लिहिले होते की........

 माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.

 अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला.

 १९ उंटापैंकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल. त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहीले.त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात!! मग?

 सगळेच खूप गोंधळले होते.तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.मग म्हणाला ठिक आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.

 प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.तो म्हणतो की, त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही. असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.

 आता एकूण उंट १९+१=२० झाले.

 २० उंटापैकी अर्धे मुलाला दिले. उरले १० उंट.

 २० उंटापैकी ४ हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले. 

 २० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.

असे एकूण १०+५+४=१९ होतात.त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता.तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.

 अशा प्रकारे १ उंट मिसळल्यानंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले. 

 त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.

 ५-ज्ञानेंद्रिये........

 (डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)

 ५ -कर्मेद्रिंये.........

 (हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुद्द्वार)

 ५ -पंचप्राण........

(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )

 आणि....

४-अंतःकरण चतुष्टय....

 (मन, बुद्धी, चित्त, अहंकार)

 असे एकूण १९ उंट आहेत.माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो. आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात  "मित्र" रुपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा "मित्र" रूपी उंट सोबत ठेवा. जोपर्यंत मित्र रुपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही.तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाही.


English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा