सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

वस्तू तीच पण किंमत मात्र माणसाबरोबर बदलते

 वस्तू तीच पण किंमत मात्र माणसाबरोबर बदलते 


माणूस कोण आहे, त्यावरून एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन  होते. आपल्याकडे असलेली खाडी वस्तू किती मौल्यवान आहे हे कधी कधी आपल्याला माहित नसत, आणि आपण त्याची किंमत करत नाही. यावर आधारितच ही कथा. 


एका गावात एक जोडपे राहत असे. त्यांना एक मुलगा होता. अगदी हुशार नाही, पण सर्वसाधारण मुलगा. सदसद्विवेकबुद्धी असलेला. प्रमाणिक, पण थोडा फार बिनधास्त असा. एकुलता एक असल्याने बर्यापैकी लाड व्हायचे. जस जसा मोठा होत गेला तस तसा त्याचा बिनधास्तपणा, अविवेकी आणि उडाणटप्पू व्हायला लागला. त्याला कुठल्याही गोष्टीची किंमत नसे. नवीन गोष्ट घ्यायची सोय नाही. एखाद्या गोष्टीची किंमत ही आपण त्याचा वापर कसा करतो यावर ठरते हे त्याला अनेकवेळा समजावून झाले, तरी काही उपयोग नाही

.

एकदा, त्याला एखाद्या गोष्टीची किंमत “माणसाच्या स्वभावावर आणि कुवतीवर ठरते” हे दाखवून द्यायला त्याच्या वडिलांनी एक युक्ती केली. त्यांनी त्याला दोन दगड दिले. आणि सांगितल, तू हे दगड मी सांगतो त्या ४ जणांना दाखव आणि ते त्याचे किती मोल देतात हे बघ. आणि विकायच्या आधी मला येऊन सांग आणि मग ठरव काय करायचं ते. पण त्या आधी तू मला या दोन दगडांची तुझ्या दृष्टीने किंमत सांग.


त्यावर तो म्हणाला “किती ओबड धोबड आहेत हे. याचा मला काय उपयोग. फेकून द्या ते.” अर्थात अपेक्षित उत्तर मिळाले होते. पण तरीही वडिलांनी त्याला चार जणांचे पत्ते दिले आणि जायला सांगितले. 


पहिल्यांदा तो गेला, घराजवळच्या भाजीवाल्याकडे. त्याने भाजीवाल्याला ते दोन दगड दिले. त्याने निरखून बघितले, आणि जवळच्या वाण्याच्या दुकानातून त्याचे वजन करून आणले. दोनपैकी एक दगड पाव किलो भरला आणि एक १०० ग्राम. त्याने सांगितले, भाऊ तस बघितल तर मला हे दगड नाही दिलेस तरी चालतील, पण अगदी खपवायचेच असतील तर मी घेतो पाहिजे तर , त्या बदल्यात ही दोन गाजर घेऊन जा. मला वजन करायला वापरता येतील हे दगड. मुलगा ठिक आहे म्हणाला आणि दगड घेऊन दुसर्या माणसाकडे निघाला. 


दुसरा मनुष्य होता जुन्या वस्तूंचा संग्रह करणारा. त्याने हे दगड बघून त्या मुलाला सांगितले, अरे हे तर दुर्मिळ दगडांपैकी आहेत. मी या मोठ्या दगडाचे ५०० आणि लहान दगडाचे ३०० देतो. बघ चालतंय का.


मुलगा ठिक आहे म्हणाला आणि पुढे निघाला. रस्त्याने चालताना त्याला त्याने बाबांना सांगितलेले दगडाबद्धलचे आपले मत अठवले, आणि स्वतःशीच पुटपुटला, खरच आपण मूर्ख आहोत. तो तिसऱ्या व्यक्तीकडे गेला. तिसरा व्यक्ती मूर्तिकार होता. त्याने ते दगड बघून पाहिलांदा दगडाला नमस्कार केला. मुलाला जरा विचित्र वाटले. त्याने मुलाच्या चेहेर्यावरचे भाव पाहून म्हणले “राजा, तू नीट बघितल का या दोन्ही दगडांना, जरा निट आकार दिला आणि पॉलिश केल तर सुंदर गणपतीची छोटी मूर्ती होईल. शिवाय लाल रंगाचे आहेत आणि चकाकत आहेत, मूर्तीला  काचेच्या भांड्यात ठेऊन थोडे सजवले म्हणजे  ७००-८०० रुपयाला सहज घेईल कोणीतरी.


मुलगा स्वतःची खूपच झगडत होता. त्याला तिन्ही वेळी आपण स्वतः किती मूर्ख आहोत याचा प्रत्यय आला. पहिल्या भाजीवाल्याने काही नाही, तरी त्याचा कसा वापर करायचे ते बघितले. दुसर्या आणि तिसर्याने तर अक्षरशः शेकडोने पैसे द्यायचे कबूल केले. असो, बघू चौथा काय म्हणतो.


चौथा मनुष्य त्या मोहोल्ल्यात अतिशय गर्विष्ठ, आगाऊ आणि सर्वांकडून दुर्लक्षिलेला असा होता. लोक नेहमी तोंडदेखल चांगल बोलायचे पण त्याच्या मागे त्याला शिव्या घालायचे. पैसा होता, पण माजही होता. त्या मुलाने बिचकतच त्याला हे दोन दगड दाखविले आणि सांगितले, याचे किती पैसे द्याल तुम्ही. त्याने दगड हातात घेऊन त्याला सांगितल, खड्यात फेकून दे हे दगड, काहीही उपयोग नाही. 


बस, त्याला समजल बाबांनी त्याला हे सगळ का करायला सांगितल. आपण असेलच वागत राहिलो तर, या माणसासारखे होऊ. तो तडक बाबांकडे गेला आणि या पुढे नेहमी विचारीपणाने वागेन, अविचार कधीही करणार नाही हे प्रांजळपणे कबूल केले.


English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा