एकमेकांची सोबत घेऊ
एका गावात दोन भावंड आपल्या माता पित्यांसोबत एकत्र रहात असत. भावंड तशी समजुतदार होती, पण कधी कधी त्यांचे भांडण होत असे आणि परिस्थिति मारामारी पर्यन्त पोहचे. त्यांच्या आई वडिलांना खुप काळजी वाटे, पण करणार काय? समजवून सांगत त्यांना.
काही काळ शहाण्यासारखे वागत पण नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
काही वर्षांनी वृद्ध माता पिता मृत्युमुखी पडले. आता दोघे भाऊ पोरके झाले. त्यांना आता समजावायला कोणी नव्हते. थोड़े दिवस शांततेत गेले पण आता घराची-संपत्तिची वाटणी करायची वेळ आली. वाद सुरु झाला. दूसरा कसा आधाशी , स्वार्थी असे आरोप होउ लागले. गुंता काही सुटेना. ते गावातल्या एका आजोबांकडे गेले. त्यांनी आजोबांना सगळी हकीकत सांगितली. आजोबा अनुभवी होते, त्यांनी परिस्थिति लगेच ओळखली.
त्यांनी दोघा भावांपैकी एका भावाला विचारले "तुझा दुसर्या भावावर विश्वास आहे?" तो भाऊ म्हणाला "बिलकुल नाही"
"बर मग तुला तुझ्यावर विश्वास आहे?" आजोबांनी विचारले. "अर्थात हो" त्याने उत्तर दिले.
आजोबांनी हे दोनही प्रश्न दुसर्या भावाला विचारले. त्यानेही हेच उत्तर दिले.
आजोबांनी दोघांना उद्देशून म्हणले "तुम्हाला दोघांनाही स्वतःवर विश्वास आहे, पण दुसर्यावर नाही, हे दुर्दैवी आहे. पण हा गुंता सोडवायचा असेल तर मी सांगतो ते करा. तुमच्यापैकी एकाने त्याच्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करून संपत्तीचे दोन समान भाग करा आणि दुसर्याने त्यातला एक भाग निवडा. तुमच्या कोड्याचे हेच एकमेव उत्तर आहे."
दोघा भावांना ही युक्ति पटली. आणि त्यांनी तसेच केले. प्रश्न सुटला. भविष्यात जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा तेव्हा त्यांनी याच प्रकारे ती परिस्थिती हाताळली. पुढे त्यांची भांडणे कमी होऊ लागली. दोघेही एकमेकांचा विचार करून वागू लागले आणि आनंदाने
राहू लागले.
Source - Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा