सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

सत्कर्म

सत्कर्म  


जे काही सत्कर्म करायचं ते “दीर्घकाळा”साठी करा.


आजची कथा थोडी वेगळी, पण छोट्याश्या प्रसंगातून मोठा अर्थ सांगून जाणारी आहे. 


संघ स्वयंसेवक असल्याकारणाने अनेक वेळा महत्वाच्या बैठकीत सहभागी होण्याचा योग येतो. त्यात काही वेळा केंद्रीय कार्यकर्ते आणि अनुभवी प्रचारकांच्या टिपण्णीतून खूप काही शिकायला मिळाले. अशाच एका बैठकीत, संघाच्या शाखा मुख्य शिक्षकांच्या समस्या, कार्यप्रणाली वगैरे बद्धल चर्चा चालू होती. एका व्यक्तीने, “आम्ही शाखेत जे कार्यकर्ते तयार करतो, किंवा आमच्या प्रयत्नाने कोणी एखादा तरुण जेव्हा “तयार” होतो तेव्हा त्याला वरचे अधिकारी दुसर्या शाखेत किंवा वेळ प्रसंगी दुसर्या शहरात संघ कामासाठी पाठवतात. त्यामुळे आमच्या कामाच्या गतीला खीळ बसते, वगैरे वगैरे ...” अशा प्रकारची तक्रार वजा खंत त्याच्या बोलण्यात आली. आश्चर्य म्हणजे अनेक कार्यकर्त्यांनी त्याच्या या म्हणण्याला दुजोरा दिला. वास्तविक माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही त्याच्या म्हणण्यात तथ्य वाटले.


बराच वेळ चर्चा चालू राहिली, आणि चर्चेचे समाधान कारक उत्तर कोणालाच सापडत नव्हते. हे पाहून एक जेष्ठ प्रचारक उभे राहिले आणि त्यांनी, त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला. जो अत्यंत बोलका आणि बोधपर आहे.


ते म्हणाले , (मुद्दाम त्या प्रचाराकांचे नाव लिहित नाही)


“एकदा गुजरात प्रांतात प्रवास करीत असताना, पायातील चप्पल तुटली. खूपच जीर्ण झाली होती, म्हणून सोबत असलेल्या कार्यकर्त्या बरोबर नवीन चप्पल आणावी या उद्देशाने एका दुकानात गेलो. सोबतचा कार्यकर्ता बर्यापैकी श्रीमंत होता. त्यामुळे, त्याच्या अतिआग्रहा खातर त्याच्या बरोबर एका चांगल्या दुकानात गेलो. दुकानदाराने चप्पला दाखवायला सुरुवात केली. माझ्या मापाच्या चपला बघताना हळूच मी त्यावरच्या किमती बघतो होतो. किमती बघून मला धडकी भरली. पाचशे रुपयाखाली चप्पला नाहीत. खूपच अस्वस्थ होऊन त्या कार्यकर्त्याला घेऊन बाहेर पडलो. त्याला म्हणल एखाद्या चांगल्या चांभाराकडे घेऊन चल बाबा. त्याच्या कडून बनविलेली चप्पल घेऊ. त्याने त्याच्या घराजवळच्या चांभाराकडे नेले. चांभाराने दोन तीन प्रकारच्या चपला समोर ठेवल्या. त्याने त्या स्वतःच्या हाताने बनविल्या आहेत. कशा दणकट आहेत वगैरे वर्णन केले. मी किंमत विचारली. त्याने अगदी बिनधास “आठशे  रुपये, पण तुमच्यासाठी म्हणून ७००” असे संगितले. मी उडालोच. एकंदरीत माझ्या लक्षात आल, माझ्या बरोबरचा कार्यकर्ता बर्यापैकी सधन असल्याचे त्या गावात सर्वांना माहित होते, त्यामुळे चांभारानेही त्याच्या कडे बघून किंमत सांगितली असावी. त्याला म्हणलो, “अहो दादा, एवढ्या महागड्या चप्पल घ्यायची सवय नाही मला, आणि त्याहून मुख्य म्हणजे एवढे पैसे चपलेला द्यायचे जीवावर येते. आज काल काही सांगता येत का. उद्या एखाद्या मंदिरात गेलो, आणि कोणी चप्पल चोरली तर कितीला पडायचा हा खर्च.....”


अशा प्रकरचा माझा युक्तिवाद झाल्या नंतर मला वाटल चांभाराला माझे म्हणणे पटले असेल. पण त्यावर चाम्भाराने दिलेले उत्तर मला आजच्या प्रसंगी अत्यंत महत्वाचे वाटते. चांभार म्हणाला “अहो दादा, मी सांगितलेली किंमत ही माझ्या कष्टाने बनविलेल्या चपलेची आहे. एवढी दणकट, मजबूत, टिकाऊ चप्पल आहे. तुम्ही म्हणता देवळात कोणी चोरली तर काय?...... अहो जो चोरेल ना त्याला सुद्धा निदान वर्ष दोन वर्ष चिंता नाही चप्पल विकत घ्यायची. कोणी चोरली नाही तर तुम्ही वापरालच की. माझ काम मी चोख बजावलं आहे. मी बनविलेल्या चपलेची हीच किंमत आहे. आता तुम्ही ठरवा घ्यायची की नाही ते. नशीब असेल तर तुम्हाला निदान दीड वर्ष चिंता नाही, चोराने चोरलीच तर त्यालाही दीड वर्ष चिंता नाही याची ग्यारेंटी मी देतो”


प्रसंग सांगून झाल्यावर जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना समाधानकारक उत्तर मिळाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर कळत होते. आपण कुठलेही काम करत असताना, आपल्या नंतरही ते कसे उपयोगाचे राहील याचा विचार व्हायला हवा. आपले काम १००% चोख बजावणे महत्वाचे. विशेषतः आपण जेव्हा एखाद्या समाजकार्यासाठी खपत असतो, तेव्हा समाजकार्य करताना आपल्या सारखे कार्यकर्ते निर्माण करून त्यांना स्वतंत्रपणे कार्यकरण्यास प्रवृत्त करणे हे ही आपले मुख्य कर्तव्य आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.


English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा