सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

बोधकथा - कांचनमृग

 बोधकथा - कांचनमृग 

पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून चौदा वर्षांच्या वनवासासाठी निघालेले राम, लक्ष्मण आणि सीता हे पंचवटीच्या रम्य परिसरात आले. नाना वृक्ष, लता ह्यांनी नटलेला… विविध पक्ष्यांच्या कूजनाने मन मोहून घेणारा… वनश्री, जल, पुष्पे, फळे ह्यांनी परिपूर्ण असणारा तो रम्य परिसर पाहून श्रीरामांनी त्याच परिसरात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लक्ष्मणाला तेथे एक सुंदर पर्णकुटी बांधण्याची आज्ञा केली. लक्ष्मणाने लवकरच तिथे एक छान पर्णकुटी उभारली अन् ते तिघे जण तेथे राहू लागले. त्या पंचवटीतल्या ऋषी-मुनींना त्यांच्या यज्ञ-याग, होम-हवन ह्या कार्यात शूर्पणखा नावाची एक राक्षसीण फार त्रास देत होती. शूर्पणखा ही लंकाधिपती रावण ह्याची बहीण.


एकदा ह्या राक्षशिणीने राम-लक्ष्मण आणि त्यांच्याबरोबर सुंदर सीतेला पाहिले. ती त्यांच्या दिशेनं पुढे येऊ लागली. तिचे अक्राळ-विक्राळ रूप पाहून सीता घाबरली व रामामागे लपून उभी राहिली. श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मणाने त्या दुष्ट राक्षशिणीचे नाक अन् कान कापले. तिला विद्रूप केले. तेव्हा ती राक्षशीण ह्या कृत्याचा बदला घ्यायचा, असे मनाशी ठरवून लंकेत आपला भाऊ रावणाकडे गेली. रावणाने आपल्या बहिणीला त्या विद्रुप रूपात पाहिले मात्र… त्याने विचारले, “हे भगिनी! तुझी ही अशी अवस्था कोणी केली?” तेव्हा शूर्पणखेनं पंचवटीत झालेली ती राम-लक्ष्मण भेट, त्यांच्याबरोबर असणारी ती संदर, सुशील राम भार्यासीता हिचे यथार्थ वर्णन केले.ती आपल्या भावाला म्हणाली, “सीता लंकेत अधिक शोभून दिसेल.” आपल्या भगिनीकडून सीतेचे नाव, तिच्या रूपाचे वर्णन ऐकले मात्र… रावणाला त्या सीतास्वयंवराच्या वेळेची आठवण झाली. त्याला त्या वेळी आपली जी फजिती याली, ती आठवली. त्याच्या मनातला लोभ, लालसा, क्रोध उफाळून वर आला. रावणाने मारिच नावाच्या एका मायावी राक्षसाला बोलावून घेतले.


त्याच्याबरोबर संगनमत करून रावणाने एक कुटिल डाव रचला. एक दिवस सीता आपल्या पर्णकुटीबाहेरच्या बागेत फुलं वेचत असताना, तिने समोरून एक नाचत-बागडत, इकडून-तिकडे धावणारा, पळणारा एक कांचनमृग पाहिला. त्या हरणाचं सोनेरी अंग, रत्नांची शिंगे, सुवर्णकांती, डोळे दिपविणारी चंचल गती हे सर्व पाहिलं अन् सीता त्या कांचनमृगाच्या मोहात पडली. तिने श्रीरामांकडे त्याच कांचनमृगाची मागणी केली. श्रीरामांनी तिला त्या कांचनमृगाचा मोह आवरण्याची विनंती केली.पण नाही! ‘स्वामी, काय हवे ते करा, पण मला तो मृग आणून द्याच,’ असा सीतेने श्रीरामांकडे हट्ट धरला. अखेर सीतेला लक्ष्मणाच्या भरवशावर सोडून हाती धनुष्यबाण घेऊन स्वत: श्रीराम हे तो मृग पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. तो मृग अधिक वेगाने पळू लागला. श्रीरामांना हुलकावण्या देत-देत त्या मृगाने बरेच लांब नेले. शेवटी श्रीरामांनी एक बाण सोडला. तो बाण त्या हरणाला जाऊन लागला.


मात्र, धरणीवर पडता-पडता श्रीरामांसारखा आवाज काढून तो मृग ओरडला, “लक्ष्मणा…. धाव…. धाव…. मला वाचव….” ते शब्द, तो धावा सीतेने ऐकला मात्र तिने लक्ष्मणाला ‘श्रीरामाच्या मदतीसाठी धावत जा,’ म्हणून आज्ञा केली. खरंतर, त्या वनात सीतेला एकटे सोडून जायचं, हे लक्ष्मणाला मनोमन पटत नव्हतं. त्याला रामापेक्षा सीतामाईचीच जास्त चिंता वाटत होती. अखेर त्याचा नाइलाज झाला. तरीही सीतामाईच्या संरक्षणासाठी लक्ष्मणाने आपल्या बाणाने एक रेषा काढली अन् “वहिनी, काही झाले तरी तू ही लक्ष्मणरेषा पार करून बाहेर पाऊल टाकू नकोस. नाही तर घात होईल.”असे बजावून हाती धनुष्यबाण घेऊन लक्ष्मण रामाच्या मदतीसाठी धावून गेला. पूर्वनियोजित कटाप्रमाणे लंकापती रावणाने डाव साधला. त्याने सीता ही एकटीच आहे, हे पाहिलं मात्र…..थोड्याच वेळात एक साधू बैरागी पर्णकुटीच्या दारी आला आणि “माई, भिक्षा वाढ’ असे म्हणू लागला. साधूचे ते शब्द ऐकले. सीतेला अतिथी धर्म आठवला आणि ती त्याला भिक्षा घालण्यासाठी अंगणात आली.


आपण दारी आलेल्या साधूला भिक्षा देण्याचे सत्कृत्य करीत आहोत, ह्या विचारात तिला लक्ष्मणाने काढलेल्या लक्ष्मणरेषेचेही भान राहिले नाही. सीता भिक्षा वाढायला पुढे आली, तर साधू रूपातला दुष्ट कपटी रावण हा मागे सरकला. अनवधानाने सीतेने ती रेषा ओलांडली मात्र….दुसऱ्याच क्षणी रावणाने सीतेचे हरण केले व पुढे रामायण घडले.


तात्पर्य : मर्यादा सोडू नका, मोहाला बळी पडू नका.

स्त्रोत : Google 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा