दिनविशेष १६ ऑगस्ट
१८९६ - अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
१९६४ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुआँग व्हान मिन्हला पदच्युत केले.
१९८७ - नॉर्थवेस्ट एरलाईन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
२००५ - वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.
जन्म:
१९१३ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
१९५० - जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
१७०५ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
१८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९७७ - एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.
२००३ - इदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा