महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : पुणे
क्षेत्रफळ
• उंची ७०० चौ. किमी
• ५६० मी
जिल्हा पुणे
लोकसंख्या
• घनता ५०,४९,९६८ (२००८)
• ७,२१४/किमी२
कोड
• पिन कोड
• दूरध्वनी
• +०२०
• आरटीओ कोड
• ४११००१
• MH-१२ (पुणे)
MH-१४ (पिंपरी चिंचवड)
MH-५३ (दक्षिण पुणे)
MH-५४ (उत्तर पुणे) (प्रस्तावित)
संकेतस्थळ: पुणे महानगरपालिका संकेतस्थळ
पुणे (अक्षांश/रेखांश : १९उ/७४पू) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते.पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात. तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.या शहराचे जुने नाव पुनवडी ऊर्फ पूर्वणी असे होते.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी भाषा ही शहरातील एकमेव मुख्य भाषा आहे. सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे विद्येचे माहेरघर म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे
ऐतिहासिक स्थाने :- लाल महाल, तुळशीबाग, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा, चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.
नद्या
पुणे शहर आणि परिसरात सात नद्या आहेत. त्या अश्या :- मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना, राम नदी, देव नदी, नाग नदी. पैकी मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी याच फक्त वाहत्या नद्या आहेत.
नाव
पुणे हे नाव इ.स.८व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जाऊ लागले.मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’, आणि बोलीभाषेत ‘पुणं’ असे वापरले जात होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ‘पुणं’-चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला ‘पूना’ असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केले. तरीही पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.
काहीजण पुण्याला पुण्यनगरी असे म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून किंवा महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते किंवा ओळखले जाते.
पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवारवाड्याला भेट द्यायला येतात.
इतिहास
आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे/होते. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स.७५८चा आहे. त्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी असून. पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली होती. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली होती. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महाल, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ठिकाणे मानली आहेत. लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबागवाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते.
मध्ययुगीन काळ
इ.स. ८५८ आणि ८६८. मधील तांबे प्लेट्स दर्शवितात की ९ व्या शतकात पुन्नका नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याच्या ठिकाणी अस्तित्वात होती. या प्रदेशांवर राष्टकुट घराण्याचे शासन होते असे या पाट्या सूचित करतात. याच काळात पाषाणातुन कोरलेले पातालेश्वर मंदिर बांधले गेले. ९ व्या शतकापासून ते १७२७ या काळात पुणे हे देवगिरीच्या सौना यादव यांनी राज्य केले होते.
भोसले जहागीर आणि मराठा साम्राज्य
पुनवडी
शिवपूर्वकाळात कासारी, कुंभारी आणि पुनवडी या वस्त्यांतून कसबे पुणे आकाराला आले. मुळा-मुठा नदीकाठी झांबरे पाटील यांचे वाडे होते आणि पाटलांच्या चावडीवर गावचे न्यायनिवाडे होत असत. गावगाड्याची ही प्रथा अनेक वर्षे रूढ होती. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे. स्वराज्याचे संकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीचे पुणे हे गाव होय.
१५९९ मध्ये निजामशाही (अहमदनगर सल्तनत)[२] यांच्या सेवेसाठी मालोजी भोसले यांना देण्यात आलेल्या जहागिरीचा एक भाग होता.. १७ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात येईपर्यंत पुण्यावर अहमदनगरच्या सुलतानाचे राज्य होते. मालोजी भोसले यांचे नातू, शिवाजी[३], मराठा साम्राज्याचे संस्थापक, यां जन्म पुण्यापासून फार दूर नसलेल्या शिवनेरी येथे झाला. १६८० ते १७०५ या काळात मुघल आणि मराठे यांच्यात बरेच वेळा राजवट बदल झाला.
१६३०मध्ये आदिलशाही राजवंशांनी छापे टाकून शहराचा नाश केल्यावर आणि १६३६ ते १६४७ च्या दरम्यान पुन्हा धडाफळेचा(???) उत्तराधिकारी दादोजी कोंडदेव याने शहराच्या पुनर्रचना घडवून आणली. हाच शिवाजीचा आद्य गुरू समजला जातो. त्याने पुणे आणि शेजारच्या मावळ क्षेत्राच्या भागातील महसूल संकलन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली. त्याने जमिनीसंबंधीचे आणि अन्या वाद यांवर निर्णय देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पद्धती देखील विकसित केल्या. लालमहालाचे बांधकाम १६३१ मध्ये सुरू करण्यात आले आणि १६४० साली पूर्ण झाले. शिवाजी महाराजांनी आपली तरुण वर्षे लालमहाल येथे घालविली. त्याची आई, जिजाबाई हिने कसबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात अभिषेक केलेली गणेशमूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता (ग्रामदेवता) म्हणून आजही गणली जाते.
१७०३ ते १७०५पर्यंत, २७-वर्षांच्या मुघल-मराठा युद्धाच्या शेवटी, या शहरावर औरंगजेबचा ताबा होता आणि त्याचे नाव बदलून मुहियाबाद करण्यात आले. दोन वर्षांनंतर मराठ्यांनी सिंहगड किल्ला आणि नंतर पुणे पुन्हा मोगलांपासून ताब्यात घेतले.
भूगोल
जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९" पूर्व असे आहेत. पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे.
पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
नद्या
पुणे शहराच्या हद्दीतून इंद्रायणी, मुळा, मुठा,पवना, राम व देव या नद्या वाहतात. एकेकाळची नाग नदी ही आता नागझरी झाली आहे.
पुणे शहराचा विस्तार
औंध कॅन्टाॅन्मेन्ट परिसर
निगडी (हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर).
पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण (PENDANT-पिंपरी चिंचवड न्यू टाऊनशिप डेव्हलपमेन्ट ॲथाॅरिटी. हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर आहे).
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये येणारा परिसर
पुणे छावणी हा पुणे कॅन्टाॅन्मेन्टच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
खडकी छावणी हा खडकी कॅन्टाॅन्मेन्टच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
हिजवडी हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
डोंगर आणि टेकड्या
पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत, त्यांपैकी काही टेकड्या :-
अराई टेकडी
वेताळ टेकडी
कात्रजची टेकडी
कोथरूडची टेकडी
गुलटेकडी
चतुःशृंगी
तळजाई
तारकेश्वर टेकडी (येरवडा)
तुकाई टेकडी (बाणेर)
तुकाई टेकडी (हडपसर)
दुर्गा टेकडी (निगडी)
पर्वती
पाचगाव
पाषाण टेकडी
फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
बकरी हिल
बाणेर टेकडी
बावधनची टेकडी
बोपदेव घाट-टेकडी
भंडारा डोंगर (देहू)
भांबुर्डा टेकडी (वेताळ टेकडी) (भांबुर्डा वनविहार टेकडी)
महंमदवाडी टेकडी (हडपसर)
म्हातोबा टेकडी (हिंजवडी)
येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
रामकृष्ण परमहंस नगर टेकडी, पौड रोड
राम टेकडी
राम टेकडी (हडपसर)
रेंज हिल्स
वनदेवी टेकडी (कर्वे रोड)
वाघजई
विधि महाविद्यालयाची टेकडी (एस्एन्डीटीची टेकडी)
वेताळ टेकडी
सिंहगड
सुतारवाडी टेकडी (पाषाण-सूस रोड)
सूसची टेकडी
हनुमान टेकडी
पाताळेश्वर मंदिरातील त्रिपुरी पौर्णिमा
पुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे
अरण्येश्वर मंदिर
थेऊरचा चिंतामणी मंदिर
संत तुकाराम महाराज संस्थान,मंदिर (देहू गांव)
पद्मावती मंदिर (सातारा रस्ता)
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,मंदिर (आळंदी)
मठ
अक्कलकोट स्वामी महाराज मठ
ओशो आश्रम(आचार्य रजनीश आश्रम)
गगनगिरी महाराज अवतार मठ (धनकवडी)
गजानन महाराज मठ
गुळवणी महाराज मठ
बिडकर महाराज मठ
रजनीश (ओशो) आश्रम
राघवेंद्र स्वामी मठ (चिंचवड)
रामकृष्ण मठ
वरदेंद्र राघवेंद्र स्वामी मठ (लक्ष्मी रोड)
शंकर महाराज मठ
शंकराचार्यांचा मठ (नारायण पेठेतील मुंजाबाच्या बोळात)
श्रीशृंगेरी शारदा मठ (कोथरूड)
सारदा मठ (राजाराम पूल)
पुण्यातील असलेले नसलेले हौद
एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते/. या हौदांत एकतर पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे.अजूनही काही हौद शिल्लक त.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :
काळा हौद
खाजगीवाले बागेतील हौद
गणेशपेठ हौद
ढमढेरे बोळातील हौद (अजून आहे?)
तांबट हौद
तुळशीबाग हौद
नाना हौद (नाना वाड्यासमोरच्या या हौदाला कात्रजहून आलेल्या नळातून पाण्याचा पुरवठा होत असे.)
पंचहौद
फडके हौद (हा अस्तित्वात नाही).
फरासखाना हौद
बदामी हौद
बाहुलीचा हौद (दगडूशेठ दत्त मंदिराजवळच्या आता अस्तित्वात नसलेल्या या हौदावर एक बाहुली होती. डॉ. विश्राम घोले यांच्या ७व्या वर्षी निधन झालेल्या कन्येचे हे स्मारक होते.)
बुधवार वाड्यातील हौद
बोहरी जमातखान्यातील हौद
भाऊ दातार हौद
भाऊ महाराज हौद
भुतकर हौद
रामेश्वराच्या देवळाजवळचा हौद
लकडखान्यातील हौद
पुणे विद्यापीठातील पुष्करणी
शनिवारवाड्यातील दोन हौद. (पुष्करणी आणि हजारी कारंजे)
सदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन हौद होते)
साततोटी हौद
बगीचे
पुणे शहरात ८९ बगीचे/उद्याने आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
आघाडा उद्यान (राम नदीजवळ, पाषाण)
आघारकर संशोधन संस्थेचे उद्यान
आयुर्वेद महाविद्यालयाचे उद्यान
इंद्रप्रस्थ उद्यान, येरवडा
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन, पुणे कॅंप (स्थापना इ.स. १८३०)
एरंडवणा उद्यान
ओकायामा मैत्री उद्यान (पु.ल. देशपांडे उद्यान), सिंहगड रोड
कमला नेहरू पार्क, डेक्कन जिमखाना
कात्रज सर्पोद्यान (राजीव गांधी प्राणी संग्रहालय), कात्रज
खडकी बोटॅनिकल गार्डन
गजानन महाराज उद्यान, गोखलेनगर
गलांडे उद्यान, कल्याणीनगर
घोरपडे उद्यान, घोरपडे पेठ
जयंतराव टिळक गुलाबपुष्प उद्यान, सहकारनगर
जवाहरलाल नेहरू औषधी वनस्पती केंद्र,
जिजामाता उद्यान, कसबा पेठ,पुणे
प्रदीप ताथवडे उद्यान, कर्वेनगर
तुकाराम उद्यान, निगडी
तात्यासाहेब थोरात उद्यान
दापोडी-खडकी गार्डन (आता अस्तित्वात नाही; त्या जागी फलसंशोधन केंद्र आहे)
धोंडीबा सुतार बालोद्यान, कोथरूड
नवसह्याद्री उद्यान
पर्वती पाचगाव वनविहार
पानकुंवरजी फिरोदिया उद्यान
पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील उद्यान
पु.ल. देशपांडे उद्यान (ओकायामा मैत्री उद्यान), सिंहगड रोड
पेशवे पार्क, पर्वतीजवळ
प्रताप उद्यान, वानवडी बाजार
फर्ग्युसन कॉलेजातील बोटॅनिकल उद्यान
फुलपाखरू उद्यान
बंड गार्डन (महात्मा गांधी उद्यान)
बोटॅनिकल गार्डन (खडकी)
भांबुर्डा वनविहार
पंडित भीमसेन जोशी उद्यान
वसंतराव बागुल उद्यान, सहकारनगर
मुघल गार्डन
मॉडेल कॉलनी तळे उद्यान, मॉडेल कॉलनी
यशवंतराव चव्हाण उद्यान, सहकारनगर
रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान, वाडिया कॉलेजवळ
राजा मंत्री उद्यान, एरंडवणा
राजीव गांधी प्राणी संग्रहालय (कात्रज सर्पोद्यान), कात्रज
वर्तक बाग (शनिवार पेठ)
विठाबाई पुजारी उद्यान, महर्षीनगर
विद्या विकास जलतरण तलाव
शाहू उद्यान, सोमवार पेठ
शेतकी कॉलेजातील उद्यान,
श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, कोथरूड
संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता
सारस बाग
सोमेश्वर उद्यान, निगडी
हजरत सिद्दिकी शाहबाबा उद्यान
ज्ञानेश्वर उद्यान, निगडी
पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’
एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज पोलीस चौक्या आहेत.
कोंढवा गेट
क्वार्टर गेट
जाईचे गेट (हे सदाशिव पेठेत होते, आता अस्तित्वात नाही)
पूल गेट
पेरू गेट
फड गेट
मरीआई गेट
म्हसोबा गेट
रामोशी गेट
स्वारगेट
बॉडी गेट (औंध )
पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा पुढीलप्रमाणे
आदमबाग
आनंद गार्डन (रेस्टॉरन्ट)
ओशो झेन बाग
कबीर बाग
कौसरबाग (कोंढवा)
चिमण बाग
ठुबे पार्क (शिवाजीनगर)
ढमढेरे बाग
तुळशीबाग
त्रिकोणी बाग (माडीवाले कॉलनी)
नातूबाग
निर्मल पार्क (पद्मावती)
पटवर्धन बाग (या बागेच्या परिसरात श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे एक उद्यान झाले आहे.)
पुरंदरे बाग (आता अस्तित्वात नाही)
पेरूचा बाग
पेशवे बाग
फाटकबाग (म्हात्रे पुलाजवळ)
बेलबाग
भिडेबाग
भुजबळ बाग (बिल्डर्स)
माणिकबाग
मिलन गार्डन (हे धनकवडीमधील एक उपाहारगृह आहे.)
मीनल गार्डन (ही दीनानाथ हॉस्पिटलजवळची एक वसाहत आहे.)
मोतीबाग
योगी गार्डन (हॉटेल)
रमणबाग
राम बाग
वर्तक बाग (एरंडवणे)
वसंतबाग
सॅलिसबरी पार्क
सारस बाग
सिताफळ बाग
सुपारीबाग
सोपानबाग
हिराबाग
खिंडी
अप्पर खिंड
डुक्कर खिंड
बावधन खिंड
गणेश खिंड (औंध परिसर)
पुण्यातले एकेकाळचे नाले, तलाव, हौद वगैरे
पेशव्यांच्या काळात पुण्यात ८५ हौद होते.या सर्व हौदांत कात्रजच्या तलावातून खापराच्या नळांतून पाणी पुरवठा होत होता. कमी उंचीवरून जास्त उंचीवर पाणी चढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उसासे बांधले होते. रस्तारुंदीमध्ये सिंहगड रस्त्यावरील सर्व उसासे रातोरात काढून टाकण्यात आले.
पुणे शहरात सध्या १५८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून, पावसाळी गटारांची लांबी १७८ किलोमीटर आहे, तर कल्व्हर्ट्सची संख्या ४२९ आहे.
पुण्यातले अस्तित्वात असलेले नद्या, तलाव, हौद आणि नाले
अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील जलतरण तलाव (नेहरूनगर-निगडी)
आंबील ओढा
बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल व जलतरण तलाव, पद्मावती
ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड
इंद्रायणी
एबीएस फिटनेस ॲकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
एलारस पूल्स, पूर्व चिंचवड
एस पी कॉलेजचा तरण तलाव
औंध तरण तलाव, औंध गांव
करपे तरण तलाव (हा काँग्रेस हाऊससमोर होता)
कात्रजचा तलाव
कामगार कल्याण जलतरण तलाव
काळा हौद
कै काळूराम मारुती जगताप तरण तलाव (पिंपळे गुरव)
किरकिटवाडी ओढा
कोंढवे-धावडे येथील कुंजाईचा ओढा
कोंढव्याचे तळे
क्लब ॲक्वाया, कोरेगांव पार्क
गणपती विसर्जन तलाव (निगडी-सेक्टर २६)
न.वि. गाडगीळ जलतरण तलाव (गाडगीळ प्रशाला)
गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव
कैखिंवसरा पाटील तलाव (थेरगाव)
घोरपडी गाव तरण तलाव
चॉईस स्विमिंग पूल, कोथरूड
विष्णू अप्पा जगताप जलतरण तलाव, धनकवडी
जेएस स्पोर्ट्स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर
टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला
डेक्कन जिमखाना या संस्थेचा तरण तलाव
केशवराव ढेरे तरण तलाव, येरवडा
तळजाई तलाव
देव नदी
धनकवडी तरण तलाव
नाग नदी
नागझरी
नांदे जलतरण तलाव, बालगंधर्व नाट्यगृह (जंगली महाराज रोड)
नाना हौद
नांदोशीचा ओढा
निळू फुले तरण तलाव, स्वार गेटजवळ
न्यू जॉय्ज स्पोर्ट्स क्लब तरण तलाव, पाषाण
पंचहौद
पद्मावती तळे
नानासाहेब परुळेकर विद्यालयाच्या आवारातील जल तरण तलाव, विश्रांतवाडी
पवना नदी
पाषाण तलाव
पूना क्लबचा तरण तलाव
पूना स्पोर्ट्स ॲकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर
पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक
पेशवेकालीन कात्रजचा पाट
फडके हौद
डॉ बाबासाहेब आंबेडकर तरण तलाव (कासारवाडी)
कैवस्ताद बाळासाहेब गावडे तरण तलाव (चिंचवड)
भामा नदी
भोसरी जलतरण तलाव (भोसरी)
महाराष्ट्रीय मंडळाचा तरण तलाव
मानस सरोवर
मावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा
मिनाताई ठाकरे जलतरण तलाव (यमुनानगर)
वस्ताद बलभीम मोकाटे जल तरण तलाव, गुजरात कॉलनी (कोथरूड)
मस्तानी तलाव दिवे घाट
मोबियस फिटनेस सेंटरचा तरण तलाव, बाणेर रोड
नथूजी दगडू भेगडे जलतरण तलाव, कर्वेनगर
भैरोबा नाला
राज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे (खडकवासला)
योगगुरू रामदेव महाराज क्रीडा संकुल व जलतरण तलाव, तळजाई टेकडी
लेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड
वंडर पूल्स, तळेगाव दाभाडे
वारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढे
शाहू कॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ
शाहू तरणतलाव, सोमवार पेठ
शिवणे ओढा
शिवाजी तलाव (हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
श्री छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव, आकुर्डी
शेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी
श्री जिमचा तरण तलाव, विमाननगर
सदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन होते)
सप कॉलेजचा तरण तलाव, एसपी कॉलेजच्या मागे
साततोटी हौद
वीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द
संजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव
सारसबाग तळे
सिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण
सिंबायोसिस कॉलेजचा तरण तलाव
सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड
सोलॅरिस तरण तलाव
हार्मनी ॲक्वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड
पूल
पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून-करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले जुळली आहेत. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत. उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरांच्या पुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्कजवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या, शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत. पिरंगुटला अन् मुळशी तालुक्याला जोडणारा तारेचा पूल, आजमितीला अस्तित्वात नाही
मुठा नदीवरील पूल एकूण १६ -
एस.एम.जोशी पूल .
ओंकारेश्वर पूल .(नवीन नाव विठ्ठल रामजी शिंदे पूल)
न.वि. गाडगीळ पूल
जयंतराव टिळक पूल .(पुणे महापालिका भवनाजवळील पूल)
काकासाहेब गाडगीळ पूल -झेड पूल .(Z-Bridge) : फक्त दुचाकीसाठी
दगडी पूल .(=डेंगळे पूल)
नवा पूल .(=शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
(बाबा) भिडे पूल .
म्हात्रे पूल .
यशवंतराव चव्हाण पूल .
छत्रपती राजाराम महाराज पूल .
लकडी पूल .(=संभाजी पूल)
या पुलावर दररोज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुचाकी वाहनास प्रवेशबंदी असते.
वडगाव पूल .
वारजे पूल .(देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
संगम पूल .(रेल्वेचा आणि वाहनांचा) - वेलस्ली पूल
आणि शिवाय फक्त दुचाकीसाठी असलेले दोन पूल आणि काही साकव आहेत.
मुळा नदीवरचे एकूण पूल १० आहेत, त्यांबद्दल माहिती पुढीलप्रमाणे :
औंधचा पूल .(जुना)
औंधचा पूल .(नवा - याला राजीव गांधी पूल असे नाव दिले .) (औंधगाव ते डांगे चौक मार्ग)
जुनी सांगवी पूल .(स्पायसर महाविद्यालय ते जुनी सांगवी/ नवी सांगवी मार्ग, औंध) (महादजी शिंदे पूल)
जुना होळकर पूल .(खडकीबाजार ते साप्रस मार्ग)
दापोडी कॅन्टॉन्मेन्टमधील होळकर पूल .
दापोडीचा हॅरिस ब्रिज .(रस्ता व रेल्वे)
दापोडी-बोपोडी येथील भाऊ पाटील पूल .(भाऊ पाटील रस्ता ते दापोडीगाव मार्ग)
वाकड पूल .
मुळा-मुठा नदीवरचे पूल -
कल्याणी नगर पूल
बंडगार्डन पूल .
बाबासाहेब आंबेडकर पूल .
मुंढवा पूल .
संगम पूल .
ओढ्या-नाल्यांवरील पूल -
उजव्या कालव्यांवरचा शाहू महाराज पूल .
उजव्या-डाव्या कालव्यांवरचे काही निनावी पूल आहेत.
घसेटी पूल .
दांडेकर पूल .
दांडेकर पूल हा पुण्यामधील आंबील ओढ्यावारील एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे 'नरवीर तानाजी मालुसरे सिंहगड रस्ता' आणि 'लाल बहादूर शास्त्री रस्ता' हे दोन रस्ते जोडले गेले असल्याने यावर नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते.
(नागझरीवरचा) दारूवाला पूल
भैरोबा नाला पूल .
घोरपडीतील अनंत थिएटर परिसरातील भैरोबा नाल्यावरील पूल
सोनार पूल .(फुरसुंगी येथील कालव्यावरील पूल)
शनिवारवाडा
शनिवारवाड्याकडे तोंड करून उभे राहिल्यावर नव्या पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे आहेत. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याही होते.आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता. (बारामतीकर जोश्यांनी बाजीराव पेशव्यांना लुटीत मिळालेला एक हत्ती परवानगी न घेता आपल्या वाड्यात नेऊन ठेवला होता. चिमाजी अप्पांनी लिहून ठेवलेल्या हिशोबात बाजीरावांना ही गोष्ट सापडली. बाजीरावांनी बारामतीकर जोश्यांना तो हत्ती परत करायला भाग पाडले आणि त्यांच्या वाड्यावर चौक्या बसवल्या. बारामतीकरांवर चौक्या बसवण्याची ही पहिली, पण शेवटची नसलेली वेळ!)
या वाड्यांपासून थोडे पुढे गेल्यावर रस्ता वळतो तेथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार सरदार ओंकारांचा वाडा आहे. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.
मेहुणपुरा
ही शनिवारवाड्याच्या मागची व पश्चिमेची बाजू. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात. थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता. मेहुणपुऱ्यात सकाळ कार्यालगतच्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता, आणि जिथे सकाळची कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणाऱ्या सरदार विसाजीपंत बिनीवाल्यांचा वाडा होता. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिद्ध सरदार हसबनीस यांचा वाडा होता.
सरदार किबे, मोरोबादादा, खासगीवाले यांचे वाडे
आता जिथे प्रभात चित्रपटगृह (किबे नाट्य-चित्र मंदिर) आहे तिथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार किबे राहात. इंदूरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नूतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौक असलेला मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा होता.
आनंदाश्रमाच्या शेजारीच नूतन मराठी विद्यालय आहे. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे, त्यावेळी येथे न्यू पूना कॉलेज होते, आणि त्याही आधी खाजगीवाल्यांचा वाडा होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमविची इमारत उभी आहे.
हवामान
पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.
जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरीमुळे पुणे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.
मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°सेच्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.
स्त्रोत : विकिपीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा