सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, १२ मे, २०२२

महाराष्ट्र कृषी दिन

 


कृषि दिन

 हा १ जूलै रोजी हरितक्रांतीचेे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त

 साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केेले असून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. याबरोबरच या दिवशी 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते.


कृषी दिन : कार्यालय ते थेट बांधावर

भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या सुविख्यात कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी व शेतीवर निस्सीम भक्ती असणारे वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे कि, "मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर जरी बसून असलो तरीदेखील माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो." हा 'वसंतविचार' लक्षात घेता शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व शेतकऱ्याना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत एकनाथ पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली.  कृृषीप्रधान देेशात पहिल्यांदाच 'थेट बांधावर' वसंतराव नाईक यांचे कृषीमंत्र , शेतकरी कृतज्ञतेचा संदेश व आत्मबळ देणारी ही अभिनव मोहीम नावारूपास आली. आज कृषी दिन हा कार्यालयाबरोबरच थेट बांधापर्यंत सर्वत्र साजरा होतो. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होतांना दिसून येते.


शेती व शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून ''थेट शेतकऱ्यांच्या बांधावर'मोहीमेचे प्रवर्तक एकनाथ पवार यांनी सन २०११ पासून कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव मोहीम सर्वप्रथम सुरू केली. आज ही संकल्पना एक प्रथा म्हणून नावारूपाला आली. थेट बांधावर शेतकरी सन्मान, समुपदेशन , फळझाडांची लागवड व वसंंतराव नाईकांना आदरांजली अशा विविध स्वरूपात 'चांदा ते बांदा' साजरा होणारा हा पर्व. थेट बांधावर शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी, शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून आत्मबळ मिळावे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा; या उद्देशाने प्रसिद्ध विचारवंत एकनाथ पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहीमेची पुढे 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने दखल घेतली गेली.  शिवाय पुढे सन २०१९ मध्ये शासनस्तरावर दखल घेण्यात आली. शासकीय कार्यालयात कृषी दिन साजरा करण्याची सुरुवात मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली तर थेट बांधावर कृषी दिन साजरा करण्याची सुरुवात साहित्यिक व विचारवंत एकनाथ पवार यांनी सुरू केली.  कृषी दिन 'शासकीय स्तरावर ते थेट बांधावर ' साजरा करण्याच्या या प्रवासात मात्र 'पवार' हा एक दुर्मिळ संयोग जुळून आल्याचे म्हणता येईल. 

वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. १९७२ सारख्या भिषण दुष्काळातही वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी 'शेतकरी आत्महत्या' हा शब्द देखील गवसला नव्हता.शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. "शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अन् शेतकऱ्यांचे मुलं कलेक्टर झाली पाहिजे." हे वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषीतंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती , शेतकऱ्याप्रति जिव्हाळा निर्माण केल्यास नाईकसाहेबांचे स्वप्ने पुर्णत्वास येऊ शकते.

स्त्रोत : विकिपीडिया 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा