महाराणा प्रताप
हे सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर-पश्चिम भारतातील मेवाडचे तेरावे सर्वात महान राजा होते. मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते प्रसिद्ध होते.हिंदुस्थानातील संपूर्ण मुघल साम्राज्य गुढग्यावर आणून देशाचे प्रथम स्वातंत्र्यता सेनानी म्हणून ओळखले जाणारे हेच ते महापराक्रमी वीर हिंदसूर्य महाराणा प्रताप
जन्म आणि बालपण
महाराणा प्रताप यांच्या जन्मस्थळाच्या प्रश्नावर दोन गृहीतके आहेत. पहिले गृहीतक हे, महाराणा प्रताप कुंभलगड किल्ल्यात जन्माला आले असे आहे. कारण महाराणा उदाईसिंग आणि जयवंताबाई यांनी कुंभलगड राजवाड्यात लग्न केले होते. दुसरा विश्वास असा आहे की, त्यांचा जन्म मारवाड मधील पालीच्या वाड्यांमध्ये झाला. महाराणा प्रतापच्या आईचे नाव जयवंत बाई असून त्या पालीच्या सोनगरा अखैराजची मुलगी होत्या.
महाराणा प्रताप यांचे बालपण भिल्ल समुदायाबरोबर गेले होते. त्यांनी भिल्लांकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले होते. भिल्ल आपल्या मुलाला किक असे संबोधतात. म्हणून भिल्ल महाराणाला किक नावाने हाक मारत असत. लेखक विजय नहार यांच्या 'हिंदुसूर्य महाराणा प्रताप' या पुस्तकानुसार, उदयसिंग प्रतापचा जन्म झाला तेव्हा युद्ध आणि असुरक्षिततेने घेरले होते. कुंभलगड कोणत्याही प्रकारे सुरक्षित नव्हता. त्या काळात जोधपूरचा राजा मालदेव सर्वात शक्तिशाली होता. जयवंतबाई यांचे वडील आणि सोनी यांचा मुलगा सोनागरा अखेरज मालदेव एक समर्थ राजे होते.
या कारणास्तव पाली आणि मारवाड सर्वच प्रकारे सुरक्षित होते. म्हणून जयवंताबाईंना पाली येथे पाठविण्यात आले. शुक्ल तृतीया शके १५९७ रोजी महाराणा प्रताप यांचा जन्म पाली मारवाड येथे झाला. प्रताप यांच्या जन्माची खबर मिळताच उदयसिंगाच्या सैन्याने मोर्चाला सुरुवात केली आणि मावलीच्या युद्धात बनवीरविरुद्ध विजय मिळवला आणि चित्तोडच्या गादीचा ताबा घेतला. महाराणा प्रताप यांचे मुख्य साहाय्यक, भारतीय प्रशासकीय सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी देवेंद्रसिंग शक्तिवत यांच्या पुस्तकानुसार, महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान जुना कचरी पाळीचे अवशेष असलेल्या जुन्ना किल्ल्यात होते. हा किल्ला हे त्यांच्या आईचे घर होते. परंपरेनुसार मुलीचा पहिला मुलगा तिच्या माहेरी जन्मतो. "महाराणा प्रताप के विषय में भारतीय इतिहास में लिखी भ्रांतियों को दूर करती विजय नाहर की पुस्तक 'हिंदुवा सूर्य महाराणा प्रताप' की समीक्षा · इथे सोनगरचे कुलदेवी नागनाची मंदिर अजूनही सुरक्षित आहे.
जीवन
राज्याभिषेक
इ.स. १५६८ मध्ये, उदयसिंह रणवीर आनोसे दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर चाल करून आला. या हल्ल्यात राजे उदयसिंह आणि मेवाडचे राजघराणे किल्ल्यावर शत्रूला ताबा मिळण्याआधी निसटले. उदयसिंह यांनी १५५९ मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली. महाराज उदयसिंह आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदयसिंह यांची इच्छा होती, पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्य कारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. प्रताप यांच्या राज्याभिषेकाआधी मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यानी जगमलला राजवाड्याबाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणून घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यानी जगमल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवून दिले. राजपथावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला. एक कुशल योद्धा संघटक व राजकारणनिपुण असा राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपला लौकिक निर्माण केला.
हळदीघाटीची लढाई
मधल्या काळात चित्तोडगडच्या रक्तरंजित लढाईमुळे मेवाडचा सुपीक पूर्व पट्टा मोगलांच्या हाती लागला. तथापि, अरवल्ली परिसरामधील उरलेले जंगली व डोंगराळ राज्य अजूनही प्रताप सिंगच्या ताब्यात होते. मोगल बादशाह अकबर हा मेवाडमार्गे गुजरातला स्थिर मार्ग मिळवण्याच्या उद्देशाने होता. इस १५७२ मध्ये जेव्हा प्रताप सिंगचा राजा (महाराणा) म्हणून राज्य करण्यात आले तेव्हा अकबरने अनेक राजदूतांना पाठवून या भागातील इतर राजपूत नेत्यांप्रमाणे अंकित बनण्यास उद्युक्त केले. जेव्हा महाराणाने अकबरला वैयक्तिकरित्या अधीन होण्यास नकार दिला, तेव्हा युद्ध अपरिहार्य बनले.
१ जून १५७६ रोजी हळदीघाटीची लढाई आमेरच्या मानसिंग (अकबराचा सेनापती) याच्या नेतृत्वात महाराणा प्रतापसिंह आणि अकबरच्या सैन्यामध्ये झाली. लढाईचे ठिकाण राजस्थानमधील आधुनिक काळातील राजसमंद गोगुंडाजवळील हळदीघाटीजवळ एक अरुंद डोंगराळ खिंड होती. प्रतापसिंग यांनी सुमारे ३००० घोडदळ आणि ४०० भिल्ल तिरंदाजीची फौज तयार केली. मोगलांचे नेतृत्व अंबर येथील मानसिंग करीत होते आणि त्याने सैन्यात सुमारे 85,0000 पायदळ,घोडदळ,बंदुकी तोफा होत्या.या हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रतापांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले.मेवाडच्या मुठ्ठीभर सेनेपुढे अकबरची लाखाची सैन्यतुकडी हार मानू लागली होती. महाराणा प्रताप यांनी 2 अकबराच्या सेनापतीला संपवून क्षत्रियांचा कलंक मानसिंगच्या दिशेने आपला मोर्चा वळवला इकडे महाराणा मानसिंग सोबत लढायला गेले. मानसिग हा हत्तीवर बसून युद्ध करत होता तर महाराणा आपल्या प्रिय घोडा चेतक वर बसून हातात 80 किलोचा भाला घेऊन युद्ध करत होते. मानसिंगला बघून चेतक ने आपले दोन्ही पाय हत्तीच्या मस्तकावर ठेवले एवढ्यात महाराणा आपला भाला फेकायला तेवढयात हत्तीच्या सोंडेला लागलेली तलवारमुळे चेतकचा एक पाय कापला गेला मानसिंग त्या रुद्र अवतार महाराणा प्रतापांच रूप बघून घाबरला आणि आपल्या महावताच्या मागे लपून बसला. चेतकचा एक पाय कापल्या मुळे महाराणा प्रतापांचा भाला मानसिंग न लागता चुकून त्याच्या महावताला लागला हे दृश्य बघून मानसिंग ने मागच्या बाजूला उडी मारून सेनेत लपून बसला पण काही वेळात युद्ध सोडून पळून गेला. ते बघताच काही मुघल सैन्य ही युद्ध सोडून पळून गेल. तेवढ्यात गद्दार मुघलांनी लपून महाराणा प्रतापांच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या एकाने लपून महाराणांच्या पाठीवर बाण मारला. पण त्यांना बाण लागला आहे हे पण जाणवलं नाही. दोन गोळ्या पायाला लागल्या मुळे महाराणा आणि चेतक प्रचंड घायाळ झाले होते युद्ध करण्याच्या स्थितीत न्हवते. त्यामुळे त्यांच्या सरदारांनी या हिंदुस्थानाचा स्वामी जिवंत राहावा ,भविष्यात जर महाराणा जिवंत राहिले तरच हे अत्याचारी मुघल आपल्या भूमीत पाय रोवू शकत नाही हे त्यांना माहिती होते म्हणून जबरदस्तीने महाराणा प्रतापांना हात जोडून सर्व सरदार म्हणले राणा जी आज जर तुम्ही या युद्धातून गेले नाही तर आम्ही न लढताच आमचा शिरच्छेद करून घेईल तुमचं जगणं या मेवाड साठीच न्हवे तर संपूर्ण हिंदुस्थानासाठी आवश्यक आहे तर कृपा जरून युद्धभूमीतून आपण निघावं आम्ही आहोत न अस म्हणून महाराणा प्रताप यांचं मेवाडमुकुट त्यांच्या एक सरदाराने घेतलं महाराणा प्रतापांच दुसरं प्रतिबंध आपण म्हणून शकतो त्यांचं नाव झाला मानसिंग (दिसण्यात दुसरे महाराणा) त्यांनी महाराणा प्रतापांच मेवाडमुकुट स्वतः परिधान करून म्हणले आज तरी एकदिवस महाराणा मला बनू द्या राणाजी महाराणा म्हणून जन्मलो नसेल तर आज महाराणा म्हणून मरेल याहून मोठी गोष्ट तुमच्या या सेवकाची अजुन काय असेल असे म्हणून सर्व सरदारांनी महाराणा प्रतापणा युद्ध भूमीतून पाठवून दिले. इथे वाढती मुघल सेनेला वाटलं झाला मानसिंगच महाराणा आहे तर या वीर योध्याने महाराणा प्रतापांसाठी लढता लढता वीरमरण प्राप्त केले. आणि तिथे चेतक महाराणा प्रतापांना घेऊन जात असताना एक मोठी दरी त्याच्या समोर आली तो डगमगला नाही 28 फूट दरीच्या उंचीवरून चेतक ने मोठी उडी घेतली आणि पलीकडच्या बाजूला घेऊन महाराणा प्रतापांना सुखरूप पोहचवले व ताण बसल्यामुळे वीर चेतक स्वामी भक्त चेतकचा ही मृत्यू झाला. महाराणा आयुष्यात कधी रडले होते तर चेतकच्या मृत्यूलाच. तिथे युद्ध संपूर्ण संपलं मानसिंग पळून काशीला 1 महिना लपून बसला की आता जर दिल्लीच्या दरबारात गेलो आणि सांगितलं अकबरला की महाराणाला हरवू नाही तर पकडू ही शकलो नाही तर मृत्यूदंड देईल ही खबर जेव्हा अकबरला कळते की हल्दीघाटी तुन मानसिंग पळून आला आणि महाराणा प्रताप यांना ही कोणी पकडले नाही तेव्हा अकबर मानसिंगचा दरबार प्रवेश काही महिने निषेध केला. आणि बाकी सेनापतीच्या जहागिऱ्या काढून घेतल्या.
मेवाडचा विजय
बंगाल आणि बिहारमधील बंडखोरी आणि मिर्झा हकीम यांनी पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर १५७९नंतर मेवाडवरील मोगलांवरील दबाव कमी झाला. १५८२मध्ये, महाराणा प्रतापने देवर (किंवा ड्रॉवर) येथे मुघल चौकीवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली. यामुळे मेवाडमधील मोगल सैन्याच्या सर्व ३६ चौक्या ताब्यात आल्या. या पराभवानंतर अकबरने मेवाडविरुद्धची सैन्य मोहीम थांबवली. देवरचा विजय हा प्रतापसाठी एक मुख्य अभिमानाचा विषय होता. इतिहासकार जेम्स टॉडने "मेवाडचे मॅरेथॉन" असे वर्णन केले आहे. १५८७मध्ये अकबर लाहोरला गेला आणि वायव्येकडील परिस्थिती बघून पुढील बारा वर्षे तिथेच राहिले. या काळात कोणतीही मोठी मोगल मोहीम मेवाडला पाठविली गेली नव्हती. परिस्थितीचा फायदा घेत प्रताप यांनी कुंभलगड, उदयपूर आणि गोगुंडासह पश्चिम मेवाड ताब्यात घेतले. या काळात त्यांनी आधुनिक डुंगरपूरजवळ चवंद ही नवीन राजधानीदेखील बांधली.
स्त्रोत : विकिपीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा