सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, १५ मे, २०२२

खुलताबाद/खुलदाबाद

 


खुलताबाद/खुलदाबाद

खुलताबाद/खुलदाबाद (मूळ नाव भद्रावती नगरी) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्र मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावाला 'रत्‍नापूर'नावाने देखील ओळखले जाते.खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो. खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.भद्रा मारूती

 हनुमान मंदिरे

खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील विशेष परिचित आहे.भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात.


इतिहास भद्रसेन

इस्लामी आक्रमणाच्या आधी हे स्थळ भद्रावती नगरी म्हणून प्रसिद्ध होते. येथील राजा भद्रसेन होता. हा राजा रामभक्त होता. त्याच्या राम भक्तीमुळे येथे भद्र मारुती आला आणि राहिला अशी कथा आहे. त्यानंतर मुस्लिम आक्रमणात हे गाव उध्वस्त केले गेले. मंदिरांचा विनाश झाला आणि हिंदूंचा छळ केला गेला. तरी भद्र मारुती आणि त्याची भक्त मंडळी यांनी शूर प्रतिकार केला आणि आक्रमकांना परतवले.


सूफी संत

ह्या गावाचे नाव रौझा असेही होते; त्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो . तसेच ह्या गावास संतांची दरी/भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे. ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सूफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले.


खुलताबाद येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू


मुघल सम्राट औरंगजेबची कबर

निज़ाम-उल-मुल्क आसफजाह Iची कबर

खुलताबादमध्ये दफन करण्या आलेले सूफी संत आणि मोगल राजे

मोगल सम्राट औरंगजेबची कबर

आझम शाह आणि त्याच्या पत्‍नीची कबर

झैन उद दिनचा दर्गा

बुरहान उद दिनची मशीद

निझाम-उल-मुल्क असफ जाहची कबर

बानू बेगमचा मकबरा

खान जहानची लाल बाग

मलिक अंबरची कबर

झर झरी झर बक्ष आणि गंज रवन गंज बक्ष दर्गे

स्त्रोत : विकिपीडिया 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा