सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, १५ मे, २०२२

मुंबई

 


मुंबई

मुंबई  ही भारतातील महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. मुंबई हे भारताच्या व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभलेले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने ५०% मालवाहतूक होते.मुंबई हा एक जिल्हा सुद्धा आहे. मात्र तिथे जिल्हापरिषद नाही. मुंबई शहर हे त्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. वडापाव हा मुंबईचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे .


१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले. १९९५ मध्ये शिवसेनेची-भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.


मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईमध्ये गरीब ते श्रीमंत या मधील सर्व वर्ग दिसून येतात. सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबईची स्थापना करणाऱ्या मूळ कोळ जमातीच्या लोकांचे येथे वास्तव्य होते. आजही मुंबई शहरात कोळी जमातीच्या लोकांचे वास्तव्य दिसून येते. मुंबई बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यापूर्वी १६६१ मध्ये इंग्लंडच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिचा हुंडा म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे दिली. १८ व्या शतकाच्या मध्यभागी हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले. शेवटी समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुनःप्राप्ती झाली व मुंबई हे एकच बेट झाले. माहीम काॅजवेमुळे वरळी वांद्रेला जोडले गेले, कुलाबा काॅजवेमुळे कुलाबा व छोटा कुलाबा मुख्य भूमीशी संलग्न झाले, हाॅर्नबी व्हेलार्डमुळे वरळी मलबार हिलशी जोडले गेले.


रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी सिनेउद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.


नाव

मुंबादेवीचे देऊळ.

मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे.  पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.

इतिहास

गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.

मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्या अगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची आहे असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.


जसे माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ.


आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.


मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००).१६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.


१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.


पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.


हुतात्मा चौक

१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.


१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.


दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना इ.स. १९३३ मध्ये वलमजी रतनजी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटरोड, गिरगाव व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत.


भूगोल


मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साल्सेट बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.

मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.


मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.


प्रेक्षणीय स्थळे

फोर्ट परिसर -

गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हर्निमन सर्कल गार्डन


नरिमन पॉइंट परिसर -


वरळी - नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी


गिरगाव - तारापोरवाला मत्स्यालय


दादर - शिवाजी पार्क


प्रभादेवी - सिद्धीविनायक मंदिर


महालक्ष्मी - महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा


भुलेश्वर - मुंबादेवी मंदिर, चोरबाजार


भायखळा - जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय


ताडदेव - अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन


मलबार हिल - वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन)


पवई तलाव - पवई अंधेरी पूर्व


जुहू - जुहू, विले पार्ले पूर्व


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा