अभियंता दिन
आज भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न पुरस्कार विजेते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस आपण इंजिनियर्स डे म्हणून साजरा करत असतो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे महान अभियंतापैकी एक होते. आज त्यांची 160 वी जयंती आहे. 1968 मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस ‘अभियंता दिन’ म्हणून घोषित केला. तेव्हा पासून दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. भारतात बांधलेले पूल, धरणे बांधण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यामुळेच आपल्याला आज पण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत नाही.
15 सप्टेंबर 1860 रोजी कर्नाटक येथील कोलार या जिल्ह्यात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला होता.अभियंता म्हणून त्यांनी म्हैसूरमधील कृष्णराज सागर धरण, पुण्यात खडकवासला जलाशय आणि ग्वाल्हेर मधील तिग्रा धरण एवढंच नाही तर हैदराबाद शहर बसवण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते. एवढंच नाही तर कारखाने, शैक्षणिक संस्था, म्हैसूर साबण कारखाना, म्हैसूर लोह आणि स्टील कारखाना, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, म्हैसूर चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालय हे सर्व म्हैसूर सरकारच्या मदतीने त्यांनी स्थापन केले.
जसं डॉक्टरांचा आदर करण्यासाठी डॉक्टर्स डे साजरा केला जातो, शिक्षकांच्या आदरार्थी शिक्षक दिन तसेच इंजिनिअर यांच्या कामांसाठी आणि आदरार्थी इंजिनियर्स डे साजरा केला जातो. इंजिनीअर्स डे हा फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. परंतु हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. इंजिनियर्स म्हणजे फक्त रस्ते बांधकाम इमारत बांधकाम, धरणे, पूल, एवढेच नाही तर, स्मार्ट मोबाईल फोन रिपेरिंग करणारे, स्मार्ट फोन असेल किंवा कार यांच्यात नवीन टेक्नोलॉजी डेव्हलप करणारे तांत्रिकी लोक यांनाही इंजिनिअरची पदवी दिली जाते.
स्त्रोत : https://visheshmarathi.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा