सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, ५ मे, २०२२

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे : कास पुष्प पठार सातारा

 महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे : कास पुष्प पठार सातारा 


कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे.

कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.

इतर पर्यटनस्थळे
भांबवली पुष्प पठार- जगातले जर्वात मोठे पुष्प पठार. हे पठार कास पठारपासून फक्त ३ किमीवर असून ते ३ तालुक्यांमध्ये येते, सातारा, जावळी व पाटण. रंगी-बेरंगी फुलांनी बहरलेले हे पुष्प पठार मात्र पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिले आहे, दुर्लक्षित आहे.

साताऱ्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. कास-भांबवली-तापोळा- महाबळेश्वर- पाटण हा परिसर सदाहरित जंगलाने व्यापलेला आहे. याच पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात कोयनेचा शिवसागर जलाशय, भांबवली, वजराई धबधबा, युनेस्को पुरस्कृत कास पुष्प पठार, तसेच प्रतापगडसारखे गड/किल्ले आहेत. या सदाहरित जंगलामध्ये पर्यटक अस्सल जैवविविधतेचा अनुभव घेतात. कासचे पुष्प पठार, चाळकेवाडी पवनचक्कीचे पठार, पाचगणीचे टेबललॅड या पठारांना "सडा" असे संबोधितात.


पावसाळयात या सडयावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात.रस्ता नाही, गाडया नाहीत, पर्यटक नाहीत, त्यामुळे प्रदूषण नाही. येथे आजूबाजूच्या गावांतील पाळीव जनावरे मनसोक्तपणे गवत खातात. त्याचप्रमाणे कुंपण नसल्याने वन्यजीव मनसोक्त विहार करतात. मानवाचा अडथळा नाही, त्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र अव्याहतपणे चालू आहे. गवताला व फुलांना शेणखत व मूत्रखत मिळते. त्यामुळे येथील गवत व फुले जोमाने वाढतात. निसर्गाचा हा विविधरंगी सोहळा जुलैमध्ये चालू होतो, तो सप्टेंबरपर्यंत पहावयास मिळतो. सप्टेंबरमध्ये भांबवलीचे संपूर्ण पठार विविध रंगांनी फुललेले दिसते. जणू काही निसर्ग देवतेचे मंदिर रंगांची उधळण करत आहे.

भांबवलीचे पुष्प पठार उन्हाळ्यात ठणठणीत कोरडे असते. काळाकुट्ट जांभ्या दगडाच्या पठारावर पावसाळयात फुलांचा बहर हे एक मोठ आश्चर्य आहे. दगडावर विविधरंगी फुले हा निसर्गाचा चमत्कार आहे. विशेष म्हणजे फक्त दसऱ्याच्या दिवशी या पठारावर विविधरंगी खेकडे फिरताना दिसतात. या पठारावर विजनवासातील "पांडवांच्या" पायाचे ठसे पहावयास मिळतात (असे सांगितले जाते.).

साताऱ्याहून कासला जाता येते. कास मंदिराच्या पुढे धावली फाटा आहे, तिथून ३ किमीवर पुनर्वसित तांबी वस्तीला आहे. तांबीपासून ५०० मीटरची चढण चढल्यावर भांबवलीच्या सड्यावर जाता येते. या पठारावर आल्यावर आपण या भागातील सर्वोच्च ठिकाणी आल्यासारखे वाटते. या पठारावर नीरव शांतता असते. बारमाही गार वारा असतो. येथे जणू काही वाऱ्याचीच सत्ता. सुळसुळ वाहणारा वारा, त्याचाच सूर आणि त्याचेच गाणे. थंडीमुळे स्वेटर असणे आवश्यक आहे. भांबवली पठाराच्या पूर्वेकडे सज्जनगड, उरमोडी जलाशय दिसतो तर पश्चिमेकडे कोयनेचा शिवसागर जलाशय, वासोटा किल्याचा गर्द झाडीतील डोंगर; कोयना, सोळशी व कांदाटी नद्यांचा त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. उत्तरेकडे कास पुष्प पठार तर दक्षिणेकडे चाळकेवाडीचे पवनचक्कीचे पठार. हे सर्व भांबवलीच्या एकाच पुष्प पठारावरून.पहावयास मिळते, अनुभवता येते.,

या पठारावर निसर्गाच्या सहवासाबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन देखील होते. भेकरे, ससे दूरवर पळताना दिसतात. बिबट्या, अस्वलासारखे हिंस्त्र प्राणी देखील पठारावर येतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पठारावर खूप ठिकाणी निसरडे झालेले असते. त्यामुळे घसरण्याची शक्यता असते. पठारावर दाट धुक्याची चादर पांघरलेली असते आणि पठाराच्या दोन्ही बाजूला सरळसोट कडे आहेत. दाट धुक्यामुळे आपण कड्यापर्यंत आलो आहोत हे कळत नाही, त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगावी.
चालता चालता कधी लाल-पिवळया गौरीहाराचे दर्शन तर कधी लाल तेरडयाचे, पिवळया सोनकीच्या फुलांचा बहर तर सर्वत्रच, पण मध्येच रानतुळशीच्या निळया-जांभळया मंजिऱ्या लक्ष वेधून घेतात. कारवी तर सात वर्षांनी फुलते. जेव्हा ती फुलते तेव्हा सर्वत्र तिचेच साम्राज्य जाणवते. सहा वर्षे ती हिरवीगार असते. २०१६मध्ये कारवी फुलली होती. आता ती २०२३मध्ये फुलेल. लाल-जांभळा रानपावटा किंवा हत्तीची सोंड मनाला आकर्षून घेते.

कास पठारावर विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, सोनकी, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदाणी, गुलाब बाभूळ, केरळ, मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी अतिबाला, जवस, रान-काळे तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णू क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलझाडे आहेत.

पावसाळयात भांबवली पुष्प पठारावर, रंगांचा सोहळाच असतो. शासनाचा हस्तक्षेप नाही की पर्यटकांचा अडथळा नाही. पठारापासून अवकाशापर्यंत सर्वत्र नाना रंगांच्या छटा विसावलेल्या दिसतात.

कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते सज्जनगड आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. तलावाच्या जवळच भांबवली वजराई धबधबा आहे.कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे.


धबधबा

सज्जनगडापासून १३ किमी अंतरावर ठोसेघरचा धबधबा आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे २०० मीटर आहे.

महाराष्ट्राचे आश्चर्य
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे.[३] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय व्हीटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

Kaaspathar
जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र कार्यक्रमाद्वारे सात आश्चर्य निवडली, यांत कास पठार आहे. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींनी निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली.
स्त्रोत : विकिपीडिया 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा