सारीपाट
पौराणिक महत्व
सारीपाट हा खेळ शिव पार्वती खेळत असत. महाभारतातील द्यूत हा एक सारीपाटच आहे. तसेच देव खंडोबा आणि देवी म्हाळसा हे देखील सारीपाट खेळत असत. हा खेळ सोंगट्यांचा खेळ म्हणूनही ओळखला जातो.
खेळायची पद्धत
या खेळात अधिक ( + ) या आकाराचा एक पट असतो व सहा कवड्या असतात. हा खेळ एकावेळी कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त समसंख्यात्मक कितीही माणसे खेळू शकतात. या खेळात दहा, दोन, तीन, चार, पंचवीस, सहा आणि बारा अशी दाने असतात. दहा किव्वा पंचवीस दान पडल्याशिवाय खेळाला सुरुवात होत नाही. दहा किंवा पंचवीस दान पडल्यावर सोंगट्या पटावर येतात. पण हे दान तीन वेळा पडल्यास त्या खेळाडूचे आधीचे दान वाया जाते.
सारीपाटात दोन संघ असतात आणि एका संघाच्या ८, अश्या दोन संघांच्या मिळून एकूण १६ सोंगट्या असतात.
या खेळात ज्या संघाच्या सर्व सोंगट्या म्हणजे ८ सोंगट्या पटामध्ये येतात, व त्यानंतरच्या पुढच्या फेऱ्यांमधे त्या संघामधील कोणत्याही एका खेळाडूला १० किव्वा २५ असे दान पडल्यास त्या संघाला पुढील फेरीमध्ये संघातील सोंगटी मारण्याचा अधिकार मिळतो त्या अधिकारास त्या संघाचा फर्जित जाणे असे म्हणतात.
सारीपाटावर ( × ) आकाराची चौकट असते तिला चिरा असे म्हणतात. त्यावर ज्या संघाची जी सोंगटी असतेे ती सुरक्षित असते. त्या सोंगटीस मारता येत नाही.
सोंगटी मारण्याचा अधिकार मिळाल्यावर विशिष्ट पद्धतीने ती सोंगटी १० किंवा २५ या दानाने १ किंवा २ पगडे या पद्धतीने पकडून पुन्हा एकदा १० किंवा २५ हे दान पडून ती सोंगटी मारली जाते व सोंंगटी मारणारा संंघ विजयी होतो, आणि सारीपाट हा खेेळ पूर्ण होतो...
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा