सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, १० एप्रिल, २०२२

भारतीय खेळ : आंधळी कोशिंबीर




 आंधळी कोशिंबीर 

 एका खेळाडूने डोळे बांधून इतरांना शिवण्याचा लपंडावासारखा खेळ. वि. का. राजवाडे यांच्या मते कौशाम्बी नगरीतील ‘अंधाकौशिंबी’ या प्राचीन खेळावरून हे नाव आले. हा खेळ घरात वा बाहेर, मर्यादित चौरस वा गोलाकार बागेत खेळतात. खेळाडूंची संख्या नियमित नसते. डोळे बांधलेल्या खेळाडूची दिशाभूल करण्यासाठी प्रथम त्यास गरागरा फिरवितात. नंतर त्याने इतरांपैकी कोणासही शिवणे, चाचपून ओळखणे किंवा आवाजावरून ओळखणे, असे या खेळाचे काही प्रकारभेद आहेत. यांपैकी कोणत्याही प्रकाराने शिवलेला वा ओळखलेला खेळाडू बाद होतो त्याच्यावर राज्य येते व खेळ पुन्हा चालतो. ‘लंगडी (आंधळी) कोशिंबीर’ या प्रकारात आंधळ्याखेरीज बाकीचे लंगडीने वावरतात. भारताप्रमाणेच चीन, जपान, कोरिया तसेच पाश्चात्त्य देशांतही वेगवेगळ्या नामरूपांनी हा खेळ रूढ आहे. एक प्रासंगिक खेळ म्हणून प्रौढही तो खेळतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा