बेडूक व उंदीर
बेडूक व उंदीर दोघे मित्र होते. बेडूक तलावाकडे राहत होता. तर, उंदीर तलावाशेजारी बिळात राहत होता. एकदा उंदराने बेडकाला आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले.
उंदीर व बेडकाने येथेच्छ जेवण केले. बेडूक खूष झाला. त्यानेही उंदराला जेवणाचे निमंत्रण दिले. उंदीर जेवणासाठी बेडकाकडे निघाला, परंतु बेडकाचे घर पाण्यात असल्यामुळे उंदराला जाता येत नव्हते. इकडे बेडूक चिंतेत पडला.
उंदीर का आला नाही याला विचार करू लागला. पाण्याबाहेर येऊन बघतो तर उंदीर काठाजवळ बसला होता. बेडकाला मित्राची अडचण समजली. त्याला एक युक्ती सुचली.
बेडकाने आपल्या पायाला उंदराची शेपटी बांधली आणि निघाला. काय गंमत! उंदराच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले व बिचारा उंदीर मरण पावला. बेडकाला खूप वाईट वाटले. बेडकाच्या पायाला उंदराची शेपटी बांधून असल्यामुळे बेडूक पाण्यात व पाण्यात व उंदीर तलावात तरंगू लागले.
आकाशामध्ये घार उडत होती तिचे लक्ष पाण्यात तरंगणाऱ्या उंदराकडे गेले. घारीने उंदराला चोचीत पकडले व उडून दूर निघून गेली. उंदीर बेडकाच्या पायाला असल्यामुळे बेडूकही लटकून होता. घारीने उंदीर व बेडकाला फस्त केले. बेडकालाही आपले जीव गमवावे लागले.
तात्पर्य : मित्र निवडताना योग्य अशाच मित्राची निवड करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा