Active Voice (कर्तरी प्रयोग) Passive Voice (कर्मणी प्रयोग)
खालील वाक्ये अभ्यासा -
1. Rama helps Hari.
2. Hari is helped by Rama.
असे दिसून येईल की, ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे.
परंतु पहिल्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरुन कळते की कर्त्यांने दर्शविलेली व्यक्ती काहीतरी क्रिया करते.
Rama (कर्त्याने दर्शविलेली व्यक्ती) साठी काहीतरी केले जात आहे. येथे Is Helped हे क्रियापद कर्मणी प्रयोगात (Passive Voice) आहे असे म्हणतात.
व्याख्या – जर एखाद्या क्रियापदाच्या रूपावरून कर्त्यांने दर्शविलेली (सूचित केलेली) व्यक्ती किंवा वस्तू काही कार्य करीत आहे असे दिसते किंवा वेगळ्या शब्दात, केल्या गेलेल्या कार्याचा कर्ता आहे, असे दिसते. (जसे पहिल्या वाक्यात आहे.) तेव्हा ते क्रियापद कर्तरी प्रयोगात (Active Voice) असते.
Active Voice (कर्तरी प्रयोग) म्हणायचे कारण म्हणजे येथे कर्त्याने दर्शविलेली व्यक्ती कार्य करते. (acts)
व्याख्या – जर एखाद्या क्रियापदाच्या रूपावरुन कर्त्याने दर्शविलेली व्यक्ती किंवा वस्तू यांच्यावर (यांच्यासाठी) काही क्रिया झाली आहे हे दिसते तेव्हा ते क्रियापद कर्मणी प्रयोगात (Passive Voice) असते.
Passive Voice (कर्मणी प्रयोग) म्हणण्याचे कारण म्हणजे येथे कर्त्याने दर्शविलेली व्यक्ती किंवा वस्तू प्रत्यक्ष काही कार्य करीत नाही. म्हणजेच अक्रियाशील असते आणि तिच्यावर तिच्यासाठी कार्य होते. (Passive म्हणजे अक्रियाशील)
व्याख्या – व्यक्ती किंवा वस्तू काही क्रिया करत आहे वा तिच्यावर काह क्रिया घडत आहे हे (त्या वाक्यातील) क्रियापदाच्या रूपावरुन कळते तेव्हा त्याला ‘प्रयोग’ (voice) असे म्हणतात.
खालील वाक्यांमध्ये कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगात झालेले रूपांतर अभ्यासा.
कर्तरी प्रयोग (Active Voice) कर्मणी प्रयोग (Passive Voice)
1. Sita loves Savitri. 1. Savitri is loved by Sita.
2. The mason is building the wall. 2. The wall is being built by the mason.
3. The peon opened the gate. 3. The gate was opened by the peon.
4. Some boys were helping the wounded man. 4. The wounded man was being helped by some boys.
5. He will finish the work in a fortnight. 5. The work will be finished by him in a fortnight.
6. Who did this? 6. By whom was this done?
7. Why did your brother write such a letter? 7. Why was such a letter written by your brother?
असे लक्षात येईल की, जेव्हा क्रियापद कर्तरी प्रयोगातून कर्मणी प्रयोगात बदलते जाते तेव्हा कर्तरी प्रयोगातील सकर्मक क्रियापदाचे कर्म (Subject) कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे कर्ता (object) बनते. (अशाप्रकारे पहिल्या वाक्यात, कर्तरी प्रयोगातील loves चे कर्म ‘Savitri’ हे कर्मणी प्रयोगातील Loved चे कर्ता बनते.)
कर्तरी प्रयोगातील क्रियापदाचे कर्म हे कर्मणी प्रयोगातील क्रियापदाचे कर्ता बनते. त्यामुळे हे ओघानेच आले की फक्त सकर्मक क्रियापदेच कर्मणी प्रयोगात वापरता येतात. कारण अकर्मक क्रियापदाला कर्मच नसते.
योग्य काळातील to be या क्रियापदाचे रूप वापरुन व त्यापुढे भूतकालवाचक धातुसाधित लावून (Past participle) कर्मणी प्रयोग (Passive Voice) तयार होतो.
हा तक्ता अभ्यासा.
काळ (Tense) कर्तरी प्रयोग(Active Voice) कर्मणी प्रयोग (Passive Voice)
take am taken
Simple present takes is taken
are taken
am taking am being taken
Present continous is taking is being taken
are taking are being taken
Present perfect has taken has been taken
have taken have been taken
Simple past took was taken
were taken
Past continuous was taking was being taken
were taking were being taken
Past perfect had taken had been taken
Simple future will take will be taken
shall take shall be taken
can/may/ can take can be taken
must,. etc. +base must take must be taken
कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगात व कर्मणीचे कर्तरीत रूपांतर करता येणे पुरेसे नसून केव्हा कर्तरी (Active) वापरावे व केव्हा कर्मणी (Passive) वापरावे हे विधार्थ्यांना समजले पाहिजे.
जेव्हा कर्त्याला (agent) (जो क्रिया करीत आहे) महत्व (प्राप्त करून) धावयाचे असेल तेव्हा कर्तरी प्रयोग वापरावा. जेव्हा ज्या व्यक्ती किंवा वस्तूवर क्रिया झाली आहे तिला (कर्माला) महत्व धावयाचे असेल तर कर्मणी प्रयोग वापरावा. म्हणूनच जेव्हा कर्तरी प्रयोगात एखादे अनिश्चित किंवा संदिग्ध (vague) सर्वनाम किंवा नाम (somebody, they, people, we इ.) कर्ता म्हणून वापरलेले असते, म्हणजेच जेव्हा आपल्याला कर्ता (agent) माहीत नसतो किंवा कर्ता कोण आहे हे स्पष्टपणे कळत नाही तेव्हा साधारणत: कर्मणी प्रयोगाला प्राधान्य देतात.
My pen has been stolen. (Somebody has stolen my pen.)
I was asked my name. (They asked me my name.)
English is spoken all over the world. (People speak English all over the world.)
I have been invited to the party. (Someone has invited me to the party.)
We will execute all orders promptly. (All orders will be executed promptly.)
अशावेळी by ने वापरलेला कर्ता वगळतात. तरीदेखील जसे आधीच्या उदाहरणात दिले आहे त्याप्रमाणे जेथे कर्त्याला काही महत्व असते आणि अर्थपूर्तीसाठी त्याची (कर्त्याची) गरज असते तेथे by वाक्यांश (Pharase) वगळता येत नाही.
जेव्हा कर्तरी प्रयोगातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही कर्मे असलेले क्रियापद कर्मणी प्रयोगात रूपांतरित होते तेव्हा दोहोंतील एक कर्म कर्मणी प्रयोगतील क्रियापदाचे कर्ता बनते तर दुसरे तसेच राहते.
(Acitve) कर्तरी (Passive) कर्मणी
The guard refused him admittance. {Admittance was refused to him by the guard.
{He was refused admittance by guard.
Mr. Krishaji teaches us grammar. {Grammar is tught to us by Mr. Krishanaji.
{We are taught grammar by Mr. Mr. Krishnaaji.
The manager will give you a ticket . {A tick willl be given to byou the manager.
{You will be given a ticket by the manger.
{By whom was Frech taught to way?/ who
{By whom was French taught yo you?/Who
Who taught you French? {were yo taught French by?
by whom were you taught French?
He handed hder a chair. {A chair was handed to her.
{She was handed a chair.
लक्षात घ्या की कर्त्याने वापलेल्या साधनांविषयी बोलताना आपण by चा नव्हे तर with चा वापर करतो.
1. The window is broken.
2. He is gone.(=He has gone).
तरी is gone क्रियापद कर्मणी प्रयोगतील आहेत, असे समजण्याची चुक न करावी. go क्रिया अकर्मक (Intransitive) आहे आणि फक्त सकर्मक (Transitive) क्रियापद सुद्धा कर्मणी प्रयोगासारखे वापरले जाऊ शकते.
याच कारणास्तव खालील वाक्यांमधील क्रियांचे कर्तरी प्रयोगातील आहेत.
He is come.
He is arrived (सद्यस्थितीतील इंग्रजीत हे प्रयोग दुर्लभ आहेत.)
काही सकर्मक क्रियापदे कर्तरी प्रयोगातही कर्मणीच्या अर्थाने वापरली जातात.
उदा.
These mangoes taste sour(i.e., are sour when they are tasted).
The rose smells sweet (i.e., is sweet when it is smelt).
The cakes eat short and crisp (i.e., are short and crisp when they are eaten).
At least the play reads well (i.e., affects the reader well has it read).
कर्तरी व कर्मणी प्रयोगाच्या आसपातील बदलाची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.
Active. – All his friends laughed at him.
Passive. – He was laughed at by all his friends.
Active. – They made him king.
Passive. – He was made king.
Active. – They use video for teaching the students.
Passive. – Video is used for teaching the students.
Active. – One should keep one’s promise.
Passive – Promises should be kept.
Active. – When will you return the book?
Passive. – When will the book be returned?
Active – Someone has picked my pocket.
Passive – My pocket has been picked.
Active – Circumstances will oblige me to go.
Passive – I shall be obliged to go.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा