सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

Perfect Tense (पूर्ण काळ)

 



Perfect Tense (पूर्ण काळ)

१) Present Perfect Tense (पूर्ण वर्तमान काळ)

रचना:

Have चा साहयकारी रूपे:- have, has, had

(To be चा भविष्यकाळी रूपे:- shall, will + be)

S + have/has + V3 + + O = S

Person  Singular (एकवचन)  Plural (अनेकवचन)

First (प्र.पु)  

I have gone (मी गेलेलो आहे) 

 We have gone (आम्ही गेलेलो आहोत)

Second (दि.पु)  

You have gone (तू गेलेला आहेस)  

You have gone (तुम्ही गेलेला आहात)

Third (तृ.पु)  

He has gone (तो गेलेला आहे)

She has gone (ती गेलेली आहे)

It has gone (ते गेलेले आहेत)  

They have gone (ते, त्या, ती, इ. सर्वजण गेलेले आहेत)

Rules/ नियम:

पूर्ण वर्तमान काळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून साहयकारी क्रियापदे ( have, has,) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला तिसरे रूप (V3) वापरावे अशा प्रकारे पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळचा उपयोग केला जातो.

*********************

२) Past Perfect Tense (पूर्ण भूतकाळ)

रचना:

Have चे भूतकाळ रूपे:- had वापरतात

S + had + V3 + + O = S

Person  Singular (एकवचन)  Plural (अनेकवचन)

First (प्र.पु)  

I had gone (मी गेलेलो होतो) 

 We had gone (आम्ही गेलेलो होतो)

Second (दि.पु)  

You had gone (तू गेलेला होता) 

 You had gone (तुम्ही गेलेले होते)

Third (तृ.पु) 

 He had gone (तो गेलेला होता)

She had gone ती गेलेली होती)

It had gone (ते गेलेले होते)  

They had gone (ते, त्या, तो, इ. सर्वजण गेले होते)

Rules/ नियम:

पूर्ण भूतकाळ बनविताना सर्व कर्त्यांपुढे (have) चे भूतकाळी रूप (had) ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (P.P) (V3) वापरतात अशा प्रकार पूर्ण भूतकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती हे दर्शविण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.

&&&&&&&&&&&&&&&&&

३) Future Perfect Tense (पूर्ण भविष्यकाळ)

रचना:

साहयकारी क्रियापद have, (To be) ची भविष्यकाळी रूप shall, will

S + shall/will + have V3 + O = S

Person  Singular (एकवचन)  Plural (अनेकवचन)

First (प्र.पु)  

I shall have gone (मी गेलेलो असेन) 

 We shall have gone (आम्ही गेलेलो असू)

Second (दि.पु)  

You will have gone (तू गेलेला असेन)  

You will have gone (तुम्ही गेलेले असाल)

Third (तृ.पु)  

He will have gone (तो गेलेला असेल)

She will have gone (ती गेलेली असेल)

It will have gone (ते गेलेले असेल)  

They will have gone (ते, त्या, ती, इ. सर्वजण गेलेले असतील)

Rules/ नियम:

पूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वाचनाला अनुसरून (To be ची भविष्यकाळी रूपे (Shall, will) योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी (Shall, will) पुढे (have) वापरून मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (P.P) (V3) वापरतात अशा प्रकारे पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

हा काळ कधी वापरातात:- जेव्हा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा