सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, ९ जानेवारी, २०२२

विरामचिन्हे

 online टेस्ट सोडवा 👇जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्येच थांबतो , या थांबण्याला विराम असे म्हणतात . लेखनामध्ये हा विराम ज्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो , त्या चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात .अ.क्र.

चिन्हाचे नाव

चिन्ह

केव्हा वापरतात

1

पूर्णविराम

.

वाक्य पूर्ण झाल्यावर

शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे

उदा.

1.    माझे जेवण झाले.

2.  मा.क.(मोहनदास करमचंद)

2

अर्धविराम

;

दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना

उदा.

1.    विजय हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.

3

स्वल्पविराम

,

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास

संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.

उदा.

1.    माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत.

2.  राम, इकडे ये.

4

अपूर्णविराम
(उपपुर्णविराम)

,

वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास.

उदा.

1.    पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले: 5,7,9,12,15,18

5

प्रश्नचिन्ह

?

प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.

उदा.

1.    तुझे नाव काय?

2.  तू कोठून आलास?

6

उद्गारवाचक

!

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्‍या शब्दाच्या शेवटी.

उदा.

1.    बापरे! केवडा मोठा साप!

2.  आहाहा! किती सुरेख देखावा.

7

अवतरणचिन्ह

 “ ’’

दुहेरी अवतरणचिन्ह बोलणार्‍याला तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता.

एकेरी अवतरणचिन्ह एखाधा शब्दावर जोर लावायचा असल्यास.

दुसर्‍याचे मत अप्रत्येक्षपणे सांगतांना.

उदा.

1.    तो म्हणाला, “मी घरी येईन.”

2.  मराठी भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे.

8.

संयोगचिन्ह

दोन शब्द जोडतांना.

ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास,

उदा.

1.    प्रेम-विवाह

2.  क्रिडा-संकुल

9

अपसरण चिन्ह
(डॅश)
(स्पष्टीकरण चिन्ह)

बोलतांना विचारमाला तुटल्यास.

स्पष्टीकरण लावयाचे असल्यास.

10

विकल्प चिन्ह

/

एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे चिन्ह वापरतात.

उदा.

1.    मी रेल्वेने/बसने जाईन.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा