अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होतो.त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणतात .
अशा अनेक समूहांची यादी खाली दिली आहे .
कोणाचाही आधार नाही असा = अनाथ
ज्याची किंमत होऊ
शकणार नाही असे = अनमोल
मागाहून जन्मलेला
(धाकटा भाऊ) = अनुज
पूर्वी कधीही न
घडलेले = अभूतपूर्व
जे टाळले जाऊ शकत
नाही असे = अपरिहार्य
एखाद्या गोष्टीची
उणीव असणारी स्थिती = अभाव
ज्याला कधीही मृत्यू नाही असा = अमर
ज्याला कोणतीही उपमा
देता येत नाही असे = अनुपम, अनुपमेय
ज्याचा कधीही वीट येत
नाही असे = अवीट
मोफत अन्न मिळण्याचे
ठिकाण = अन्नछत्र
एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा = अष्टावधानी
पायांत पादत्राणे न
घालता = अनवाणी
पूर्वी कधीही न
ऐकलेले = अश्रुतपूर्व
पूर्वी कधीही न
पाहिलेले = अदृष्टपूर्व
कोणाच्याही पक्षात
सामील न होणारा = अपक्ष
जे साध्य होत नाही ते
= असाध्य
देवलोकातील स्त्रिया = अप्सरा
नेत्याचे अनुकरण करणारे व त्याच्या मागून जाणारे = अनुयायी
ढगांनी झाकलेले = अभ्राच्छादित
कधीही विसरता न
येणारे = अविस्मरणीय
वर्णन करता येणार
नाही असा = अवर्णनीय
कधीही नाश पावणार
नाही असा = अविनाशी
ज्याला कोणी जिंकू
शकत नाही असा = अजिंक्य, अजेय
सूचना न देता येणारा
पाहुणा = आगंतुक
तुलना करता येणार
नाही असे = अतुलनीय
निराश्रित मुलांचा
सांभाळ करणारी संस्था = अनाथाश्रम
पडदा दूर करणे = अनावरण
थोडक्यात समाधान
मानणारा = अल्पसंतुष्ट
कमी आयुष्य असलेला = अल्पायुषी, अल्पायू
एकाला उद्देशून
दुसऱ्यास बोलणे = अन्योक्ती
मोजता येणार नाही
इतके = असंख्य, अगणित
अग्नीची पूजा करणारा = अग्निपूजक
ज्याच्यासारखा दुसरा
कोणीही नाही असा = अद्वितीय, अजोड
ज्याला एकही शत्रू नाही असा = अजातशत्रू
विविध बाबींत प्रवीण
असलेला = अष्टपैलू
ज्याने लग्न केले
नाही असा = अविवाहित (ब्रह्मचारी)
ज्याचा थांग (खोली)
लागत नाही असे = अथांग
घरी पाहुणा म्हणून
आलेला = अतिथी
अनुभव नसलेला = अननुभवी
अन्न देणारा = अन्नदाता
आवरता येणार नाही असे
= अनावर
विशिष्ट मर्यादा
ओलांडून जाण्याचे कृत्य = अतिक्रमण
आकाशातील ताऱ्यांचा
पट्टा = आकाशगंगा
जिवंत असेपर्यंत = आजन्म
थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा = आशीर्वाद
मनाला आल्हाद देणारा = आल्हाददायक
ज्याचे हात
गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा = अजानुबाहू
लग्नात द्यावयाची भेट
= आहेर
हिमालयापासून
कन्याकुमारीपर्यंत = आसेतुहिमाचल
नसलेली गोष्ट आहे असे
वाटणे = आभास
संपूर्ण शरीरभर किंवा
पायापासून डोक्यापर्यंत = आपादमस्तक
देव आहे असे मानणारा = आस्तिक
स्वत:च लिहिलेले
स्वत:चे चरित्र = आत्मवृत्त, आत्मचरित्र
बालकांपासून
वृद्धांपर्यंत सर्वजण = आबालवृद्ध
अगदी पूर्वीपासून
राहणारे मूळ रहिवासी = आदिवासी
वाटेल तसा पैसा खर्च
करणे = उधळपट्टी
सतत पैसा खर्च करणारा
= उधळ्या
ज्याच्यावर उपकार
झाले आहेत असा = उपकृत
उदयाला येत असलेला = उदयोन्मुख
शिल्लक राहिलेले = उर्वरित
जमिनीवर आणि पाण्यात
दोन्हीही ठिकाणी राह शकणारा = उभयचर
घरदार नसलेला = उपऱ्या, बेघर
सूर्याचे उत्तरेकडे
जाणे = उत्तरायण
शापापासून सुटका = उ:शाप
सतत उद्योगात मग्न
असणारा = उद्यमशील
हळूहळू घडून येणारा
बदल = उत्क्रांती
सतत एकटे राहण्याची
आवड असलेला = एकलकोंडा
श्रम न करता खाणारा = ऐतखाऊ
लहान मुलाला
झोपविण्यासाठी म्हटलेले गीत = अंगाईगीत
अंग राखून काम करणारा = अंगचोर
दुसऱ्याच्या ताब्यात
असलेला = अंकित
निरनिराळ्या
राष्ट्रांतील = आंतरराष्ट्रीय
आपले कर्तव्य पार
पाडण्यात तत्पर असा = कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष
कर्तव्याकडे पाठ
फिरविणारा = कर्तव्यपराङ्मुख
जिचे डोळे
कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी = कमलाक्षी
अंगी एखादी कला
असणारा कलावान = कलाकार, कलावंत
दुसऱ्याचे दुःख पाहून
कळवळणारा = कनवाळू
कष्टाने मिळणारी = कष्टसाध्य
कानास गोड लागणारे = कर्णमधुर
कामाची टाळाटाळ करणारा
= कामचुकार
भाकरी करण्याची लाकडी
परात = काथवट
सर्व इच्छा पूर्ण
करणारी (पुराणात कल्पिलेली) गाय = कामधेनू
कार्य करण्यास सक्षम
असलेला = कार्यक्षम
अंधाऱ्या रात्रीचा
पंधरवडा = कृष्णपक्ष
केलेले उपकार
विसरणारा = कृतघ्न
धान्य वा तत्सम वस्तू
साठविण्याची जागा = कोठार
ज्याच्याकडे अनेक
कोटी रुपये आहेत असा = कोट्ट्याधीश
कुंजात विहार करणारा = कुंजविहारी
मडकी बनविणारा = कुंभार
शीघ्रतेने किंवा
अकस्मात घडून आलेला बदल = क्रांती
सतत पैसे खर्च करणारा
= खर्चिक
आपल्याबरोबर खेळात
भाग घेणारा मित्र = खेळगडी
जन्मत:च श्रीमंत
असलेला = गर्भश्रीमंत
जिची चाल हत्तीच्या
चालीप्रमाणे डौलदार आहे अशी = गजगामिनी
सापांचा खेळ करणारा = गारुडी
गडाचा वा किल्ल्याचा
प्रमुख अधिकारी = गडकरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा