भारतीय सागरी बेटात एकूण ५९९ बेटे आहेत, यापैकी अंदमान आणि निकोबार
बेटसमूहात ५७२ बेटे आहेत तर लक्षद्वीप बेटसमूहात २७ बेटे आहेत. -देशाच्या मुख्य
भूमीपासून ही बेटे वेगळी असली तरी ती देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे.
समुद्रातील स्थानानुसार भारतीय बेटांची विभागणी अरबी समुद्रातील बेटे व बंगालच्या
उपसागरातील बेटे अशी केली जाते.
***************************************
१)
अरबी समुद्रातील बेटे – लक्षद्वीप बेट समूह
– अरबी समुद्रातील ज्वालामुखी पर्वताच्या
शिखराभोवती प्रवाळ कीटकांचे संचयन होऊन या बेटाची निर्मिती झाली .म्हणून याना
प्रवाळ बेटे असे म्हणतात .
– लक्षद्वीप बेटसमूहात फक्त २७ बेटे आहेत.
त्यापैकी फक्त ११ बेटांवर मनुष्य वस्ती आहे.
– बेटांचा क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.कि.मी. आहे. केरळ
मधिल कालिकत पासून लक्षद्वीप बेट फक्त १०९ कि.मी.अंतरावर आहे.
– या बेटसमूहात उत्तरेस अमिनदीत
बेट, मध्यभागी लखदीव बेट तर दक्षिणेस मिनीकॉय ही बेटे आहेत.
१९७३ साली लखदीव, अमिनदीव, मिनीकॉय
बेटसमूहाचे नाव लक्षद्वीप असे
ठेवण्यात आले.
– ११” उत्तर अक्षवृतताच्या
उत्तरेकडे अमिनदिवी बेटे, या अक्षवृतताच्या दक्षिणेकडे
कन्नोर बेटे, तर अति दक्षिणेकडे मिनिकॉय बेटे आहेत.
– लक्षद्वीप बेटे खाडीमुळे मालदीव बेटापासून अलग झालेली आहे.
– लक्षद्वीप या प्रवाळ बेटात =
१२ प्रवाळभित्ती,३ अनुतट प्रवाली निम्मजन वाळू किनारे
– लक्षद्वीप बेटात मिनिकॉय बेट
सर्वात मोठे असून त्याचे क्षेत्रफळ ४.५३ चौ.कि.मी. आहे. तर सर्वात छोटे बित्रा बेट
आहे.
– लक्षद्वीप बेटांची उंची समुद्रसपाटीपासून ५
मीटरपेक्षा कमी आहे. या बेटावर पर्वतश्रेणी किंवा नदी नाही. पृथ्वीचे तापमान सतत
वाढत असल्यामुळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील
सुमारे ५० ते १०० वर्षाच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील असा अंदाज
राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे.
– प्रणालभित्ती
/ वलयाकार प्रवाळ खडक: समुद्राच्या तळभागावर
समुद्रातील प्रवाळ कीटकांच्या अवशिष्ट भागापासून वलायाकार प्रवाळ खडकांची निर्मित
होते. यांचा आकार पसरट बशीसारखा असतो.
##########################
२) बंगालच्या उपसागरातील बेटे (अंदमान व निकोबार बेटे)
– ही बेटे प्राकृतिक रचनेच्या
दृष्टीने अराकन योमा/राखीन योमा या समुद्रात बुडालेल्या पर्वतरांगांची पाण्यावर
दिसणारी शिखरे आहेत, या बेट समुहांचे दोन गट रिची द्वीपसमूह आणि
लॅबिरिंथ बेटे
– याचा अक्षांश विसतार ६ ४५’
उत्तर अक्षवृत्त ते १३.४५’ उत्तर अक्षवृत्त आणि रेखांश विस्तार ९२ १० पूर्व
रेखावृत्त ते ९४१५’ पूर्व रेखावृत्त आहे.
– अंदमान आणि निकोबार बेट समूह
ऐकमेकापासून १० खाडी पासून अलग झालेले आहेत.
– एकूण क्षेत्रफळ ८२४९ ची.कि.मी.
आहे, एकूण बेटांची संख्या ५७२ आहे; फक्त
३८ बेटावर मानवी वस्ती आहे. भारताच्या मुख्यभूमीषासून अंतर, कोलकत्यापासून
१२५५, कि.मी. तर चेन्नाईपासून ११९० कि.मी. आहे.
– अंदमान बेटसमूह :
याचे क्षेत्रफळ सुमारे ६५९६ चौ.कि.मी. अंदमान बेटसमूहाची पुढील गटात
विभागणी केली जाते.
१) मोठे अंदमान
२) छोटे अंदमान
– मोठे अंदमान समुहात – उत्तर अंदमान, मध्य अंदमान,
दक्षिण अंदमान बाराटांग, रटलॅंड हे बेटे आहेत.
उत्तर अंदमान बेटेत अंदमान निकोबार बेट समूहातील सर्वात उंच शिखर सँडल शिखर आहे.
– पोर्ट ब्लेअर राजधानी दक्षिण
अंदमान वर आहे.
– मोठे अंदमान आणि छोटे अंदमान दरम्यान डकन मार्ग आहे. अंदमानापासून पूर्वेकडे ८० कि.मी. अंतरात बरेन आणि
नार्कीडम ही दोन ज्वालामुखी बेटे आहे.या बेट समूहामध्ये प्रमुख बाळूचा खडक,
चुनखडी आणि शेल आहे.
– निकोबार बेटसमूह : एकूण
क्षेत्रफळ १६५३ चौ.कि.मी.
– निकोबार बेटे प्रामुख्याने
प्रवाळ खडकापासून बनलेले आहे.
– निकोबार बेटात कार निकोबार,
छोटे निकोबार, मोठे निकोबार, नानकवरी, कोमोती, काचाल इ.
बेटे आहे.
– मोठे निकोबार हे सर्वात मोठे
असून ते सर्वात दक्षिणेला आहे, भारताचे सर्वात दक्षिण टोक
इंदिरा पाईंट (पिगमॅलिय पाईंट) या बेटावर आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@
३) अपतट बेटे
– भारतात अनेक अपतट बेटे आहेत.
पश्चिम किनारपट्टी लगत :
१) कच्छ-वैदा, नोरा, प्रितन २)
काठेवाड-पिरम ३) नर्मदा-तापी मुख – अलिया बेट ४) महाराष्ट्र-करंजा, घारापुरी, कासा ५) मंगळूर-सेंटमेरी, भटकळ, पीजनलॉक ६) गोवा अंजीदीव
पूर्व किनारपट्टी लगत :
१) मन्नारचे अखात-पांबन, क्रोकोडाइल २) आंध्र प्रदेश – श्रीहरिकोटा ३)
महानदी मुख-व्हीलर, शॉर्ट ४) गंगा त्रिभूज प्रदेश – न्यू मूर,
गंगासागर, सागर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा