सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २१ मार्च, २०२३

हनुमान जयंती

 हनुमान जयंती

हनुमान जयंती

हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजिनेरी येथे झाला.


जन्मकथा

वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे. हनुमान हा श्रीरामांचा निससीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्ती ही सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे.


पूजा पद्धती

महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे. उत्तर भारतात सुद्धा हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे. तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे.


समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात १७ व्या शतकात स्वराज्य स्थापनेसाठी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचविली. त्यासाठी ११ विविध ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि बलाच्या उपासनेचे महत्व प्रस्थापित केले. रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते.

सौजन्य : विकिपीडिया 

भारतीय सण माहिती पहा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा