Teacher Transfar 2022
विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावे ?
उपलब्ध माहितीनुसार सविस्तर मार्गदर्शन
संवर्ग 2 बदली फॉर्म सविस्तर माहिती
विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी बदली पोर्टल वरून शाळा प्राधान्यक्रम कसा भरावा
संवर्ग 2 बदली फॉर्म भरणे सुरु दि.30/12/2022 ते 4/1/2023 (6 दिवस)
१)बदली पोर्टल लिंक -
२)वरील लिंक वर क्लीक करावे क्लीक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅपचा टाकून पोर्टल लॉगिन करावे.
३)डाव्या मेनूतील Intra District वर क्लीक करावे
४)त्यातील Application Form वर क्लीक करावे
५)त्यानंतर तुम्हांला स्क्रीनवर Application Form वर क्लीक करावे
६)त्यानंतर तुम्हांला स्क्रीनवर Application Type व Action असे दोन ऑपशन दिसतील
७)Cadre 2 च्या समोर View Application चा Tab दिसेल Application Tab वर क्लीक केले की,
८)Cadre 2 Application Form वर बदली अर्ज भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती स्क्रिनवर दिसेल त्यावर
शिक्षकाचे नाव
आडनाव
शाळेचा यु डायस नंबर
शिक्षकाचा शालार्थ आयडी
ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही
९)त्याखाली आपणास आपल्या जोडीदाराच्या व आपल्या शाळेतील अथवा कार्यालयातील अंतर दिसेल ते अंतर निश्चितच ३०किमी.च्या वर असेल
१०)त्याखाली आपणास आपला व्याख्येतील प्राधान्यक्रमानुसार प्रकार दिसेल
११)त्यानंतर आपणास आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा आपल्या जोडीदाराचा मोबाइलला क्रमांक दिसेल
१२)आपल्या जोडीदाराचे नाव दिसेल
१३)त्यानंतर आपला जोडीदार ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल
१४)वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टल वर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत Read Only Mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही
१५)त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल
१६) पर्याय निवडण्यासाठी Add Preferences या टॅब वर क्लीक केल्यानंतर खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व ज्यास्तीत ज्यास्त ३० शाळा प्राधान्यक्रम निवडण्या संदर्भात सूचना दिसेल
१७)प्राधान्यक्रम भरताना त्याखालील Drop Down मेनू मधून तालुका निवडावा व Drop Down मेनू मधून शाळा निवडावी
१८)शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील किती मंजूर पदे
किती कार्यरत पदे
शाळेतील रिक्त पदे
समानीकरण अंतर्गत ठेवलेली पदे बदली पात्र शिक्षकांची पदे
ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील
१९)Add Tab वर क्लीक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल २०)आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना Add केलेली शाळा Save करणे अनिवार्य आहे
२०) या ठिकाणी संवर्ग भाग २ च्या शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या जागा संभाव्य रिक्त जागा म्हणून दाखवल्या जातील व त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास वरील प्रकारच्या पोर्टल वर दाखविल्या जाणाऱ्या शाळाच प्राधान्यक्रमा मध्ये भरणे आवश्यक आहे
२१)Add केलेली प्रत्येक शाळा Save या टॅब वर क्लीक करून Save करावी
२२)आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लीक करून Do you want to remove selected School हा Pop Up दिसेल त्याखाली Yes वर क्लीक केले की निवडलेली शाळा पर्यायातून डिलीट केली जाईल
२२)अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना Add Preferences वर क्लीक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर Save करावी
२३)अश्या पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रम भरल्यानंतर
आपल्याला आपला Application Form हा Submit करणे आवश्यक आहे.त्याकरिता खालील Submit टॅब वर क्लीक करून आपला बदली फॉर्म Submit करावा .आपण फॉर्म Submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही
२४)या नंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाइल नंबर वर पुन्हा एक OTP येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची पूर्ण होईल
२५)आपला संपूर्ण बदली अर्ज फॉर्म भरून सबमीट केल्यानंतर व मोबाईल वर ओटीपी आल्यानंतर आपला बदली अर्ज फॉर्म आपल्या रजिस्टर इमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल
२६)वरील माहितीतील प्रत्येक मुद्यांशी आपण सहमत असालच असे नाही.त्याकरिता प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा योग्य अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
****महत्वपूर्ण ****
💢 संवर्ग दोन ला भरण्यासाठी नवीन बदली पात्र शिक्षकांची यादी.
💢 ज्या शिक्षकाच्या नावापुढे eligible असा उल्लेख आहे तीच शाळा भरण्यासाठी उपलब्ध राहिलेली आहे ज्या शिक्षकांच्या व शाळेच्या नावापुढे Tagged असा उल्लेख आहे ती शाळा संवर्ग एक नी घेतलेली आहे असे समजावे.
💢 संवर्ग दोन मधील शिक्षकांना रिक्त पद असलेल्या शाळा सुद्धा भरता येतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा