PM POSHAN Scheme 'पीएम- पोषण' योजना - शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण होणार 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' (पीएमपोषण)
केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' (पी एम-पोषण) असे केल्यामुळे आता राज्यातही शालेय पोषण आहार ही योजना आता (पी एम-पोषण) नवीन नावानेच ओळखली जाणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय डाउनलोड करा
शासन निर्णय पहा 👇👇👇👇👇👇
प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने,तसेच प्राथमि क शाळांतील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना १५ ऑगस्ट १९९५ पासून राज्यात सुरू केली आहे. केंद्राने या योजनेचे नामकरण आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पी एम पोषण) असे केले आहे. या योजनेच्या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिल्याचे ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचनांद्वारे कळविले आहे. त्यानुसार या योजनेच्या नावात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, केंद्र सरकारने प्रस्तुत योजनेकरिता दिलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर बाबी केंद्र शासनाच्या पत्राप्रमाणे करण्यात येतील, असे शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव झ. मु.मुकाझी यांनी स्पष्ट केले आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202211041524173121 असा आहे. हा आदेश डीजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
वाचा :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा