सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, १५ मे, २०२२

पाणचक्की


पाणचक्की

पाणचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील ऊर्जा वापरून चालणारे यंत्र आहे. पूर्वी या यंत्रावर पीठ दळण्यात येई त्यामुळे याला चक्की हे नामाभिधान प्राप्त झाले.


हे यंत्र आता फारसे उपयोगात नाही. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात एक पाणचक्की आहे. ही पाणचक्की जगप्रसिद्ध असून अनेक देशांतून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. एक मुस्लिम फकीर पाण्याच्या साहाय्याने चालणाऱ्या या चक्कीवर दळण दळून देत असे.

जलप्रपातातून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा योग्य वापर करून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या आधारे प्रचंड दगडी जाते फिरते ठेवणे आणि त्यावर धान्य दळून सैन्याची रसद भागवणे, ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अमलात आणण्याचा प्रयोग औरंगाबादमध्ये झाला. त्यावेळचे शास्ते अभियांत्रिकीत कसे जाणकारहोते याचाच हा पुरावा..पृथ्वीच्या जन्मापासून तिच्या अफाट पसाऱ्यातील निसर्गरहस्य समजावून घ्यायला मानवाचा लाखो वर्षांचा काळ गेला. भूमातेच्या गर्भातील प्रचंड ऊर्जा, वादळ, पाऊस, वारा, धरणीकंप आणि महापुरांनी भयभीत झालेल्या मनुष्यप्राण्याला दैनंदिन मूलभूत गरजा भागवण्यासाठी प्रवासाबरोबर अग्नी व पाण्याची निकड होतीच. ‘गरज ही शोधाची जननी आहे,’ या सूत्राची अनुभूती ज्या काळात मानव प्राथमिक अवस्थेत वावरत होता तेव्हापासूनच प्रत्ययाला आली. उपलब्ध नैसर्गिक साधनांच्या आधाराने त्याने गरजा भागविण्यासाठी बुद्धीची जोड द्यायला सुरुवात केली. गती साधण्यासाठी उत्क्रांतीच्या अवस्थेत त्याला चाकाची कल्पना सूर्यनारायणाच्या दर्शनाने सुचली, तर जलप्रवासाला लाकडी नाव सुलभ आहे त्या नावेची कल्पना माशाच्या आकारावरून सुचल्याचे बोलले जाते.गरजेतून नवनिर्मिती आणि कालांतराने त्यात सुधारणा हा तंत्रज्ञानातील होणारा बदल त्याकाळीही धीम्यागतीने चालला होता. झंझावती वाऱ्यामध्ये एक बेमालूम ऊर्जा आहे याची कल्पना आल्यावर इ.स. पूर्व काळापासून जलप्रवासाच्या नावेसाठी शिडाच्या होडीच्या साह्याने त्याऊर्जेचा वापर करण्याचा परिपाठ सुरू झाला. याच ऊर्जेचा वापर करून जीवनावश्यक पाण्याची गरज भागविण्यासाठी पवनचक्कीचा शोध लागण्यासाठी मात्र त्यानंतर हजारो वर्षांचा काळ गेला. भरभरून देणाऱ्या निसर्गराजाच्या औदार्याने त्याच्या पवनशक्तीचा वापर करून पाणी उपसा आणि विजनिर्मितीसाठी आजही जगातल्या प्रगत राष्ट्रांत पवनचक्कीची चक्र गतिमान होताना दिसताहेत.आपल्या देशात वसाहतवादातून आक्रमक झालेल्यांनी, साम्राज्य विस्तार करणाऱ्यांनाही पाणी आणि दैनंदिन रसद याची गरज भागवण्यासाठी पाणचक्कीच्या निर्मितीतून जल अभियंत्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा प्रयोग मराठवाडा भूमीत औरंगाबाद येथे झाला. ती म्हणजे पर्यटक तसेच अभ्यासकांना अवाहने करणारी बाराशे वर्षांची पुरातन पाणचक्की.. औरंगाबाद शहर दर्शनामध्ये या पानचक्कीला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जलप्रपातातून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा योग्य वापर करून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या आधारावरती दगडी जाते फिरते ठेवणे आणि त्यावर दळण दळून सैन्याची रसद भागवणे ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अमलात आणण्याचा प्रयोग औरंगाबाद नगरीत झाला. त्यावेळचे आमचे शास्ते अभियांत्रिकीत कसे जाणकार होते याचाच हा पुरावा आहे.‘खाम’ नदीच्या काठावरचे पाणचक्की या ठिकाणी पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा हे दोन्हीही उद्देश साधले आहेत.मोघल सरदार मलिक अंबर यांनी आपल्या अधिपत्याखालील औरंगाबाद शहराला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘सायफन’ पद्धतीचा वापर करून ‘नहर-ए-अंबरी’ नावाची पाणीपुरवठा योजना आखली होती. जेथेपाणचक्की आहे त्याच्या प्रांगणातसुफीसंत बाबा शहा मुसाफिर हे अवतारी पुरुष राहात असत. तेव्हा या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यांचे शिष्य बाबा शहा महदूम यांनी पाणचक्कीचे बांधकाम पूर्णत्वास नेले. याव्यतिरिक्त दरगा, खामनदीवरील वेस व वाहतुकीसाठी पूल ही बांधकामेदेखील त्यांच्याच कल्पकतेने पूर्ण झाली.कोणत्याही अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाची जोड नसताना मनुष्यबळाच्या साह्याने खामनदीच्या उगमस्थानी प्रथम पाणीअडविण्यासाठी तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जी िभत उभारली आहे त्यासाठी विटा आणिचुन्याचा वापर केला गेला. तलावातील साठवलेले पाणी सुमारे चारमैल अंतरावरील ऐतिहासिक मकबरा वास्तूपर्यंत आणण्यासाठी ‘नहरी’ म्हणजेच कालव्याचा मार्ग खोदून ते पाणचक्कीपर्यंत आणले गेले. या पाणीपुरवठा योजनेसाठी त्या काळी चार लाख रुपये खर्च झाल्याची नोंदआहे.औरंगाबादच्या उत्तरेकडे ५ कि.मी. अंतरावर भरपूर पाणी साठय़ाचे ‘जटवडय़ा’चे पहाड आहेत. येथील पाणीसाठा एकत्रित करून कालव्यांनी बीबीच्या मकबऱ्यापर्यंत आणण्यात यशस्वी झाल्यावर त्या पाणी प्रवाहाला बंदिस्त करून भूमिगत मातीच्या नळांनी हे पाणी पाणचक्की प्रांगणात आणले गेले. हा जलप्रवाहनळाच्या साह्याने उंच िभतीवर चढवून एका मोठय़ा हौदात सोडला गेलाय. येथे एक ध्यानी घेतले पाहिजे की, पाणचक्कीच्या पातळीपेक्षा पाण्याच्या उगमस्थानाची पातळी उंचावर असल्याने कोसळणाऱ्या पाण्याच्या दाबाद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करण्यात अभियंते यशस्वी झालेत.सायफन पद्धतीचा वापर करून जे पाणीभिंतीवर नेण्यात आले तेथून ते ज्या हौदामध्ये पडते तो हौद सुमारे १६२ फूट लांब, ३१ फूट रुंद वचार फूट खोल आहे. तसेच त्यामध्ये १ लाख २८ हजार गॅलन पाणी साठवण्याचीत्याची क्षमता आहे.

स्त्रोत : इंटरनेट 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा