महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे : लोणार सरोवर
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे तिसरा सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.आणखीन मंदिरे आहे.
सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.
अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था(U.S.A), युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी ,इंडिया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ,खारगपूर (इंडिया )यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.
निर्मिती
पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखी प्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे मानले जात होते. पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तिथे आदळल्याने ते निर्माण झाले असे सिद्ध झाले. तिथे प्लँगिओक्लेज नावाचे खनिज सापडले आहे. हे खनिज एकतर मास्केलिनाइट मध्ये रूपांतरित झाले आहे किंवा त्याच्यामध्ये प्लेनर डिफॉर्मेशन वैशिष्ट्ये आहेत. असे फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते. त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. उल्का पूर्वेकडून ३५ ते ४० अंशांच्या कोनाने आली आणि आदळली.
सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे ५२,००० वर्ष आहे. अलीकडील अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय ५,४७,००० आहे. वयाचा नावीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झिजेशी सुसंगत आहे.
इतिहास
पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार हे नाव मिळाले. ब्रिटिश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.
एकाच विहरीतील पाण्याची चव गोड व खारी
सासु-सूनेच्या या विहिरीतल देवीच्यामंदिराकडील पाणी हे गोड आहे तर ताच्या विरुद्ध बाजूचे पाणी हे खारे आहे.त्यामुळे तिला सासु-सूनेच्या विहिर असे संबोधले आहे . भारतातील परंपरेत जलतीर्थ ,स्थालतीर्थ,कामतीर्थ,मोक्षतीर्थ असे तीर्थचे विविध प्रकार सांगितले आहे . जलतीर्थमुळे शारीरिक शुद्धी होते व मन प्रसन्न होते ,अशी धरणार आहे . जलतीर्थ व मोक्षतीर्थ असे दुहेरी सासू -सुनेचे विहिरीचे पौराणिक महत्त्व सांगितल्या जाते .त्यामुळे ही विहीर पार्यटाकांसाठी आकर्षण केंद्र बिंदू आहे
सरोवर परिसर
लोणार सारोवर जवळ ७०० मि. अंतरावर छोटासा खळगी पडलेली आहे जेथे हनुमान मंदिर आहे.
धोका
लोणार सरोवराच्या आसपास वाढत्या लोकवस्तीमुळे तेथे सध्या अनेक धोके निर्माण झाले आहेत.
आजूबाजूच्या वस्त्यांमधील सांडपाणी अणि दूषित पाणी लोणार सरोवरामध्ये सोडले जाते. त्यामुळे सरोवराचे पाणी प्रदूषित होत आहे . त्यामुळे तिथली दुर्मीळ जैवविविधता धोक्यात आली आहे.
अलीकडे लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेही सरोवराला धोका निर्माण झाला आहे.
स्त्रोत : विकिपीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा