महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : आंबोली
आंबोली हे महाराष्ट्रातील अत्यंतिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वर्षभरात सरासरी ७५० सेंटिमीटर पाऊस पडतो.
आंबोली हे अत्यंत सुंदर व निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची ५६.१९ चौ. किमी
• ७०१.६४१ मी
जवळचे शहर सावंतवाडी
विभाग कोकण
जिल्हा सिंधुदुर्ग
तालुका सावंतवाडी
लोकसंख्या
• घनता
भाषा मराठी
संपर्क व दळणवळण
गावात पोस्ट ऑफिस आहे. गावाचा पिन कोड ४१६५३२ आहे. गावात दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहेत. गावात ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, मात्र बिनतारी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. सर्वात जवळील ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही. सर्वात जवळील खाजगी कुरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहेत. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.
पर्यटन
हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदऱ्या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून या ठिकाणाला ओळखतात.
आंबोलीच्या नजीकच्या परिसरात सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा व देवीचे मंदिर आहे. येथील हिरण्यकेशी नदी मंदिरातून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. नदीवर १० कि.मी. अंतरावर नागरतास धबधबा आहे. महादेवगड, मनोहरगड आदि जुने किल्लेही नजीकच्या अंतरावर आहेत.
आंबोलीचे जंगल दाट असल्याने सभोवतालच्या परिसरात अनेकदा रानडुकरे, ससे, गवे, बिबटे, चितळ आदी वन्य प्राणी आढळतात. सहसा न दिसणाऱ्या पक्ष्यांचेही येथे दर्शन होते.
आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील ५६१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८२२ कुटुंबे व एकूण ४००४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सावंतवाडी ३० किलोमीटर अंतरावर आहे.
स्त्रोत : विकिपीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा