छत्रपती संभाजी महाराज
१४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर.. धडाडल्या तोफा… वाजती चौघडे…. निनादे तुतारीचा गजर.. सह्याद्रीच्या कुशीत जन्मला शिव रुद्राचा अवतार आणि थोरल्या बंधूस स्मरुनी.. नाव ठेविले संभाजी. “छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले” यांचा जन्म : १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ला येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संभाजी महाराज थोरले चिरंजीव होते. संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे महान छत्रपती होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या अदम्य साहस, वीरता, समर्पण आणि बलिदानाकरता आज संपूर्ण विश्व त्यांना ओळखतो. शिवाजी महाराज जर महाराष्ट्राचा वाघ असतील तर संभाजी महाराज छावा आहेत. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले.
छत्रपती संभाजी राजेंनी त्यांच्या कार्यकिर्तीत एकूण जवळपास १२० युद्धे लढली आणि त्यात त्यांना एकाही लढाईत अपयश आले नाही. असा दिग्गज पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. त्याकाळात संभाजी राजांचा सामना करणारा, त्यांना मात देणारा योद्धा संपूर्ण हिंदुस्थानात नव्हता.
‘श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ’, अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची राजमुद्रा होती
छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण
छत्रपती संभाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पहिले पुत्र होते. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा १४ हे १६५७ रोजी पुणे जिल्यातील, पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ अडीच वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्या आई म्हणजेच “सईबाईं” यांचे आजारपणामुळे निधन झाले असे म्हणतात. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ या गावची धाराऊ पाटील ही स्त्री संभाजी महाराजांची दूधआई बनली. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनीदेखील त्यांना आईची खूप माया आणि प्रेम दिल. राजमाता जिजाबाई म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्जी त्यांनी त्यांचा विकास करण्याची जबाइच्छाशक्ती बदारी घेतली आणि त्यांना संस्कृत भाषा शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून नियुक्त केले. छत्रपती संभाजीराजे अत्यंत शूर होते. त्यांना लहानपणापाऊसूनच राजकरणाचे धडे सुद्धा दिले गेले. छत्रपती संभाजी महाराज हे अगदी लहान असल्यापासूनच अत्यंत धाडसीप्रवृत्तीचे , कुशल बुद्धिमान आणि शूरवीर होते. ते राजमाता जिजाबाई याच्या छत्रछायेखालीं लहानाचे मोठे झाले व त्यांना बालपणीपासूनच त्यांना शिवाचा “छावा असे म्हटले जायचे.
१६६५ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बालविवाह हा राजकारणातील पिलाजीराव शिर्के यांच्या कन्येशी म्हणजेच येसूबाई यांच्याशी विवाह झाला. लहान वयातच त्यांना मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण कळले, यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे फक्त ९ वर्षाचे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे संभाजीराजांसह आग्रा येथील नजर कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी महाराजांनी सोसू नये म्हणून त्यांना काही काळ सुरक्षित ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या घरी मथुरेला ठेवले. आणि परत स्वराज्यात जाऊन संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने मोरोपंत पेशवे यांनी संभाजी महाराजांना सुखरूपपणे स्वराज्यात आणून पोहोचवले.
छत्रपती संभाजी महाराजांचे शिक्षण :
छत्रपती संभाजी महाराज हे बालपणापासून प्रचंड हुशार होते.आणि प्रचंड बुद्धिमान होते.त्यांना संस्कृत भाषे व्यतिरिक्त अनेक परदेशी भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान अवगत होते. इतकेच नव्हे तर संभाजी महाराज हे तलवार व अनेक शस्त्रे चालवण्यात पारंगत होते आणि त्यांचा आवडता छंद हा घोडेस्वारी करणे संभाजी राजांच्या बालसंस्कारामुळे महिलांचा सन्मान, मोठ्यांचा आदर यासारखे अनेक गुण त्यांच्या आचरणातून नेहमी दिसत. दरबारात कसे बोलायचे, लोकांना न्याय कसा द्यायचा, हे देखील त्यांना राजमाता जिजाबाईंकडून ते शिकले होते. संभाजीराजे इतके हुशार होते की संस्कृत भाषेमध्ये प्रभुत्व मिळवले होते. व ते एक उत्तम साहित्यिक होते.
छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी “बुधभूषण” राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. बुधभूषण या ग्रंथात संभाजी राजेंनी अतिशय सुंदर व सरळ भाषेत आपले वडील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे.
कलिकालंभुजंग मावलीढ निखिल धर्मवेश्य विक्लवय: |
जगत: पतिरंगशतोवतापो: ( तीर्ण ) स शिवछत्रपती जयत्यजेय:
औरंगजेबाची दख्खन मोहीम
सन १६८२ मध्ये औरंगजेबाने मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सगळ्याच बाबतीत छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा जास्त होते. औरंगजेबाजचे सैन्य मराठ्यांच्या सैन्या पेक्षा ५ पटीने अधिक होते. औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश हा सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये होता. तरीही मराठ्यांनी हिमतीने हा लढा छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली दिला.
छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज,जंजिर्याचा सिद्दी या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजां विरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. त्यापैकी कोणीही उलटू शकला नाही छत्रपती संभाजी यांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
मराठ्यांच्या पराक्रमाचे उदाहरण सांगायचे झाले तर “रामशेज किल्ल्याचा लढा”. हा किल्ला नाशिकच्या जवळ आहे. त्यावेळेस औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की रामशेज किल्ला काही अवधीतच शरणागती पत्करेल पण तसे न होता त्या लढ्यात मराठ्यांनी असा लढा दिला कि तो किल्ला मुगलांना जिंकण्यासाठी त्यांना जवळपास तब्बल साडेसहा वर्षे लढा द्यावा लागला.
छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू
स.न. १६८९ मध्ये औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला होता त्यावेळेस मराठ्यांत आणि मोघलांत जोरदार चकमक झाली. त्यावेस मराठ्यांचे संख्याबळ अतिशय कमी होते पण प्रयत्नांची शर्थ करून, शेवटपर्यंत लढा देऊन मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नव्हते. त्यावेळेस मुगलांना संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात यश आले. छत्रपती संभाजीराजे आणि त्याचे जिवलग मित्र कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेण्यात आले औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना त्यांनी धर्मांतर केले तर जीवदान देऊ अशी अट घातली. मात्र,त्यावेस छत्रपती शंभूराजांनी त्याला न डगमगता नकार दिला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजेंवर खुप अत्याचार केला व अन्नामुष छळ केला व तो असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी म्हणजेच फाल्गुन अमावास्या ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराजानी अखेरचा श्वास घेऊन त्यांची अखेर प्राणज्योत मालवली. औरंगजेबाच्या केलेल्या अन्नमूष अत्याचार, यातना सहन करून छत्रपती संभाजीराजांनी त्यांची स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा अखेरपर्यंत सोडली नाही. म्हणूनच त्यांना या अखंड भारतवर्षाने त्यांना “धर्मवीर” हे पदवी बहाल केली . छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे झाला.
स्त्रोत : https://tarangmarathi.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा