सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

अलंकारिक शब्द , शिष्यवृत्ती सराव

 अष्टपैलू

अनेक चांगले गुण असणारा

अकलेचा खंदक

अत्यंत मूर्ख माणूस

अकरावा रुद्र

अतिशय तापट माणूस

अक्षरशत्रू

निरक्षर माणूस, अडाणी

अकलेचा कांदा

मूर्ख मनुष्य

अकबरी प्रथा

चांगली प्रथा

अळवावरचे पाणी

फार काळ न टिकणारे

अठरा विश्वे दारिद्र्य

अत्यंत दारिद्र्य

अरुण्यरूदन

ज्याचा उपयोग नाही असे कृत्य

अडेलतट्टू

आपलाच हेका चालविणारा

आग्यावेताळ

अत्यंत रागीट मनुष्य

ओनामा

सुरुवात, प्रारंभ

अंगठा बहाद्दूर

अशिक्षित

उंबराचे फूल

अगदी दुर्मिळ वस्तू

उंटावरचा शहाणा

मूर्खपणाचा सल्ला देणारा

एरंडाचे गुऱ्हाळ

कंटाळवाणे होणारे व्यक्त्यव्य

कळीचा नारद

कळीचा नारद

कर्णाचा अवतार

उदार मनुष्य

कळसूत्री बाहुले

दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

काडिपहिलवान

हडकुळा

काळ्या दगडावरची रेघ

निश्चित व न बदलणारी बाब

कुबेर

श्रीमंत मनुष्य

कुंभकर्ण

अतिशय झोपाळू

कुंभकर्णी झोप

विलक्षण गाढ झोप

कूपमंडूक

संकुचित वृत्तीचा

कोडगे

लोचट

कोल्हेकुई

क्षुद्र लोकांची बडबड

खडाष्टक

जोरदार भांडण

खडाजंगी

मोठे भांडण

खुशालचेंडू

अतिशय चैन करणारा

खेटराची पूजा

अपशब्दाने खरडपट्टी काढणे

खोगीर भरती

निरुपयोगी लोकांचा भरणा

गळ्यातला ताईत

अतिशय प्रिय

गर्भशूर

जन्मजात पंडित, गर्भपण्डित

गर्भश्रीमंत

जन्मापासून श्रीमंत

गजान्तलक्ष्मी

विशेष श्रीमंत

गाजरपारखी

मूर्ख,कसलीही पारख नसलेला

गंडांतर

भीतीदायक संकट

गंगा-यमुना

अश्रुधारा

गुळाचा गणपती

मंद बुद्धीचा

गुरुकिल्ली

रहस्य, मर्म

गोगलगाय

गरीब स्वभावाचा निरुपद्रवी मनुष्य

गौडबंगाल

दुसऱ्यांना आकलन न देणारे, चमत्कारिक व गूढ

घरकोंबडा

घराबाहेर न पडणारा

घटोत्कच

कपटी मनुष्य

घाशीराम कोतवाल

अन्यायी माणूस

घोरपड

चिकाटी धरणाराकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा