चांद्रयान-3 मोहिम ऑगस्ट महिन्यात
2022 मध्ये इस्रो तब्बल 19 मोहिमा हाती घेत आहे.
विशेष म्हणजे बहुचर्चित चांद्रयान-३ ( Chandrayaan-3)मोहिम ही याच वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
2019 च्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चांद्रयान-2 मोहिम पार पडली होती. याचबरोबर वर्षभरात इस्रोच्या तब्बल 19 मोहिमा पार पाडल्या जाणार असून यामध्ये 8 उपग्रह प्रक्षेपण मोहिमा, 7 विविध प्रकारच्या अवकाश यानाबाबत मोहिमा आणि 4 तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक संदर्भात मोहिमा असणार आहेत. तर या मोहिमांमध्ये RISAT-1A या उपग्रहाचे पुढील काही दिवसात PSLV या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा