सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

बोधकथा , सुखी माणसाचा शोध



सुखी माणसाचा शोध 


             आंबेगावात कुंवरसिंह नावाचा एक राजा राहत होता . त्याला कोणत्याही वस्तूची कमतरता नव्हती . पण तरीही त्याची तब्बेत सतत बिघडलेली असे . त्या आजारामुळे तो नेहमी वैतागलेला असे . अनेक वैद्यांनी त्याच्यावर उपचार केले . पण कोणत्याच उपचाराचा परिमाण झाला नाही . 
               राजाचा आजार वाढतच गेला . साऱ्या राज्यात ही बातमी पसरली . तेव्हा एक म्हातारा राजाकडे आला व म्हणाला , " महाराज , आपल्या आजारावर उपचार करण्याची मला आज्ञा द्यावी . " राजाची परवानगी मिळाल्यानंतर तो राजाला तपासून म्हणाला , " महाराज आपला आजार नक्की बारा होईल . त्यासाठी आपण एखाद्या सुखी माणसाचा सदरा आणावा , पण त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख नसावे . त्याचा सदरा आपण घातला तर नक्कीच आपण बरे व्हाल . " म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून सारे दरबारी हसू लागले . पण राजा म्हणाला , " आपण एवढे उपचार करून पहिले आहेत त्यात एक आणखी एक उपचार करून पाहायला काय हरकत आहे ." राजाने सुखी माणसाचा शोध घेण्यास आपल्या सैनिकांना पाठवले . पण त्यांना कुठेच सुखी माणूस आढळला नाही . प्रत्येकाला काही ना काही दुःख होतेच . ते पाहून राजा स्वतः काही सैनिकांना सोबत घेऊन सुखी माणसाच्या शोधात निघाला . खूप शोध घेतल्यानंतर राजा एका शेतात पोहचला . भर उन्हात एक शेतकरी काम करत होता . 
                  राजाने त्याला विचारले , " काय रे ? तू सुखी आहेस का ? " शेतकऱ्याचे डोळे चमकले , चेहऱ्यावर हसू तरळले . तो म्हणाला , " देवाच्या कृपेने मला कसलेही दुःख नाही , " ते ऐकून राजाला खूप आनंद झाला . त्या शेतकऱ्याचा सदरा मागण्यासाठी राजाने त्याच्या शरीराकडे पहिले , पण त्या शेतकऱ्याने फक्त एक धोतर नेसलेले होते आणि त्याचे शरीर घामाने निथळलेले होते . 
                  राजाला कळून चुकले की , कष्ट केल्यामुळेच हा शेतकरी खरा सुखी आहे . त्यानेही ऐषोआरामी जीवनाचा त्याग केला . काही दिवसातच त्याचा सारा आजार नाहीसा झाला . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा