सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

पृथ्वी , सामान्य ज्ञान              हजारो-लाखो वर्षे आपण ज्या पृथ्वीवर निवास करत आहोत, त्या बद्दल आपल्याला माहिती आहे का ? हे विश्व ची माझे घर असं आपण नेहमी म्हणतो. परंतु आपण कधी विचार केला आहे का, पृथ्वी कशी आहे, तिची उत्पत्ती कधी झाली, कशी झाली, तिचे आकारमान किती ?

   👉 पृथ्वीची उत्पत्ती – 

पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडे चार अब्ज वर्षांअगोदर झालेली असावी असा कयास शास्त्रज्ञ लावतात. पृथ्वी म्हणजे काय तर एक वायूचा मोठा गोळा. पृथ्वीच्या आत तप्त लाव्हारस आहे.


  👉 पृथ्वीचे सूर्य मालिकेमधील स्थान – 

सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी आहे. ग्रहमालेतील एकूण ग्रहांपैकी पृथ्वीचा आकारमानात पाचवा क्रमांक लागतो. स्वतः भोवती फिरायला तिला २४ तास लागतात तर सूर्याची एक प्रदक्षिणा ती जवळपास ३६५ दिवसांमध्ये पूर्ण करते.

  👉 पृथ्वीचे आकारमान, वजन आणि वातावरण – 

पृथ्वीचा आकार लंबगोलाकार असून तिचा व्यास सुमारे १३ हजार किमी आहे. पृथ्वीचे वजन अंदाजे ५.९७२४ * १०^ २४ किलोग्रॅम आहे. तिचे बाह्यांग वातावरणाने बनलेले असून हे वातावरण विविध थरांनी बनलेले आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाणात (७८%) नायट्रोजन, (२१%) ऑक्सिजन आणि उर्वरित (१%) इतर वायू आहेत. पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७०% भाग हा समुद्र आणि महासागरांनी व्यापलेला आहे. उर्वरित भागावर पर्वत, डोंगररांगा, पठार, आणि जंगल आहेत.

तसेच पृथ्वीच्या वातावरणात पृथ्वीपासून वर जाताना ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एकसोस्फिअर असे एकूण ५ थर आहेत.

  👉 पृथ्वीच्या आतील भाग – 

वरून खाली जाताना, पृथ्वीचे ३ मुख्य थर पाहायला मिळतात. सर्वात वरील थराला क्रस्ट असे म्हणतात. क्रस्टची जाडी सुमारे ४० ते ६० किमी असते. यानंतर दुसरा थर म्हणजे, मँटल. मँटलची जाडी २९०० किमी आहे. आणि शेवटचा थर आहे पृथ्वीचा गाभा. या गाभ्याला कोअर असे म्हणतात. कोअरची जाडी सुमारे ७१०० किमी आहे.

  👉 पृथ्वीवरील जीवसृष्टी – 

ग्रहमालीकेतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी उपस्थित असल्याचे मत शास्त्रज्ञांचे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जगण्यासाठी लागणार प्राणवायू (ऑक्सिजन) आणि पाण्याची उपलब्धता फक्त आणि फक्त पृथ्वीवरच आहे. पृथ्वीवर खोल समुद्रापासून ते हवेतील काही किमी अंतरावर जीवन आढळते. यातील कितीतरी प्रकारचे जीव अजूनही आपल्याला माहिती नाहीत.

  👉 पृथ्वीबद्दल काही तथ्य – 

  सर्वात खोल बिंदू : प्रशांत महासागरातील मॅरियना ट्रेंच.

  सर्वात उंच बिंदू : माउंट एव्हरेस्ट

  सर्वात मोठा खंड : आशिया खंड

 सर्वात मोठा महासागर : प्रशांत महासागर

 सर्वात मोठी नदी : नाईल

 ध्रुव : उत्तर आणि दक्षिण ध्रुव.

  एकूण खंड : ७

  नैसर्गिक उपग्रह : चंद्र

पृथ्वीबद्दल काही महत्वाचे प्रश्न – 

१. पृथ्वीची उत्पत्ती कधी झाली?

उत्तर: अंदाजे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी.

२. पृथ्वीवरील सर्वात पहिला जीव कोणता?

उत्तर: अमिबा.

३. सूर्यमालेत पृथ्वीचा क्रमांक कितवा आहे?

उत्तर: सूर्यापासून ३ रा क्रमांक.

४. सूर्यमालेतील ग्रहांमध्ये आकारमानाने पृथ्वीचा कितवा क्रमांक लागतो?

उत्तर: ५ वा क्रमांक.

५. पृथ्वीवरील एकूण भूभागापैकी महासागरांनी व्यापलेला भाग किती आहे?

उत्तर: सुमारे ७० %.

६. पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायूचे प्रमाण किती आहे?

उत्तर: जवळपास २१ %.

७. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे थर किती व कुठले आहेत?

उत्तर: पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्रस्ट, मँटल आणि कोअर असे एकूण तीन थर आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा