सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२२

 


सरकारकडून पुन्हा ५४ चिनी अ‍ॅप्सवर बंदी

Free Fire सह अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश


केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले. या अॅप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे. बंदी घालण्यात आलेल्या यापैकी बरेच अॅप्स Tencent, Alibaba आणि गेमिंग फर्म NetEase सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत आणि २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसऱ्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लाँच केलेले आहेत.हे अॅप्स चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर भारतीयांचा गोपनीय आणि संवेदनशील डेटा ट्रान्सफर करत असल्याच्या कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हे बंदी आदेश जारी केले आहेत.

गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉप अॅप स्टोअरनाही हे अॅप्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी Meity ने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे.


आतापर्यंत भारतात २५४ चिनी अॅप्सवर बंदी-पहिल्यांदा जेव्हा चिनी अॅप्सवर बंदी घातली तेव्हा ५९ अॅप्सचा समावेश होता. ज्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community सारख्या लोकप्रिय ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. नंतर नोव्हेंबरमध्ये, स्नॅक व्हिडिओ, AliExpress आणि AliPay कॅशियरसह आणखी ४३ चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये सरकारने आणखी ११८ अॅप्सवर बंदी घातली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा