50 Useful
Sentences in English | लहान लहान उपयोगाची वाक्ये
*******************
१) Hey एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी हा शब्द वापरतात. साधारणपणे हा शब्द नम्र
समजला जात नाही.
• Hey! What are you doing there?
अरे, तू तिथे काय करत आहेस?
• Hey you! / Hey! take your hands off my bike.
अरे, माझ्या सायकलवरून हात काढ,
• Hey, you with the hat – come here.
अरे, एऽ टोपीवाल्या – इकडे ये.
• Hey baldie – mind your language.
अरे टकल्या, तोंड सांभाळून बोल.
◆ २) The heck राग अगर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी किंवा वाक्यावर जोर देण्यासाठी the
heck चा उपयोग केला जातो. जसे,
• Where the heck have they gone – we ae already late?
कुठे गेले आहेत ते? आधीच उशीर झालेला आहे
आपल्याला.
◆ ३) How/what about….
= कसं राहील?/बद्दल (तुझा) काय विचार आहे?
• How about tea?
चहा कसा राहील?
• What about going swimming?
पोहायला जाण्याबद्दल तुझा काय विचार आहे?
◆ ४) By the way एखादा नवीन विषय मधेच सुरू करताना किंवा एखादा नवीन प्रश्न मधेच विचारताना
by the way वापरतात. जसे,
• I think we should take some rest now, by the way, what time is
it?
मला वाटतं आता आपण थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे, बरं, वाजले किती?
◆ ५) Talk / Speak of the devil एखाद्याचे नाव घेतल्याबरोबर अनपेक्षितपणे ती व्यक्ती हजर झाल्यास असे
म्हणतात. जसे,
• I think Rahul will not come today. Oh, speak of the devil, here he is.
मला वाटतं राहूल आज येणार नाही. अरे, नाव
घेतल्याबरोबर हजर झाला हा तर.
###################
◆ ६) The
devil चा उपयोग प्रश्नार्थी शब्दासोबत प्रश्नावर जोर
देण्यासाठी केला जाऊ शकतो. जसे,
• What the devil are you doing in my room?
काय करत आहेस तू माझ्या खोलीत?
◆ ७) on earth प्रश्न विचारणाऱ्याला एखाद्या अनपेक्षित उत्तराची अपेक्षा आहे असे
दर्शवण्यासाठी अगर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी why, when, where, how आणि who या प्रश्नार्थी शब्दांसोबत on earth वापरतात. जसे,
• What on earth are you doing here in my room?
काय तरी करत आहेस तू इथे माझ्या खोलीत?
◆ ८)
Hell राग व्यक्त करण्यासाठी अगर जोर देण्यासाठी खालीलप्रमाणे hell चा उपयोग
केला जातो.
• Oh, hell, I have broken my glasses.
…..माझा चश्मा फुटलाय.
• It’s a hell of a good book.
हे खूपच चांगलं पुस्तक या आहे.
• Where the hell are you going?
कुठे चाललास तू?
◆ ९)
just a
minute moment / second
एक
मिनिट/एक सेकंद/एक मिनिट – एक मिनिट.
किंचित वाट पहायला सांगण्यासाठी किंवा दुसरा बोलत असताना आपल्याला
मधेच काही बोलायचे असल्यास असे म्हणता येईल.
◆ १०)
Kindly (बहुधा राग आलेला असला तरी) सभ्यता दर्शवण्यासाठी आज्ञार्थी वाक्यात वापरता
येईल. जसे,
• Kindly give my book back.
कृपा करून माझं पुस्तक परत देऊन टाका.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
◆ ११)
You know विशेष अर्थपूर्ण नसलेला हा वाक्प्रचार बोलताना पुढे काय म्हणावं याचा
विचार करताना किंवा एखाद्याला एखादी गोष्ट आठवायला मदत करताना वापरला जातो. जसे,
• You feel very bored, you know, when you have nothing to do.
माणसाला खूप कंटाळा येतो….जेव्हा करायला काहीच नसतं.
◆ १२)
How do you
like एखाद्याचे मत विचारताना कसं वाटलं?
या अर्थाने याचा उपयोग केला जाऊ शकतो. जसे,
• How do you like our new house?
आमचं नवीन घर तुम्हाला कसं वाटलं?
◆ १३)
There,
there/Now, now सांत्वन करताना बोलतात. जसे,
• Now, now, don’t cry.
रडू नकोस, रडू नकोस.
◆ १४)
What’sit
called/what’s its, his, her, इ. name/what dyou call it
एखाद्या व्यक्ती अगर वस्तूचे नाव आठवत नसल्यास काय
नाव त्याचं/ काय म्हणतात त्याला? अशा अर्थाने यांचा
उपयोग होतो. जसे,
• Your friend, what’s his name, that tall one, had come here in the morning.
तुझा मित्र, काय नाव त्याचं, तो उंच बघ – सकाळी इथे आला होता.
• We have recently bought a machine, what’s it called – yes, a vacuum cleaner.
आम्ही आत्ताच एक मशीन विकत घेतली आहे, काय
म्हणतात त्याला – हं, व्हॅक्यूम क्लीनर)
◆ १५) Pray आग्रहाची
विनंती करताना वापरला जाणारा please या अर्थाचा औपचारिक शब्द
Pray let me go.
कृपया/कृपा करून मला जाऊ दे.
And when will you let me go, pray tell.
मला जाऊ केव्हा देशील – सांग जरा.
@@@@@@@@@@@@@@@
◆ १६)
Same
difference याचा वापर असे दर्शवण्यासाठी केला
जाऊ शकतो की तुम्ही जे बोलले ते तंतोतंत बरोबर नव्हतं हे तुम्हाला मान्य आहे. पण
फरक काही विशेष महत्त्वाचा नव्हता असंही तुम्हाला वाटतं.
•;He has bought a new car recently.
त्याने अलीकडे एक नवीन कार विकत घेतली आहे.
• Actually it is a van. व्हॅन आहे ती.
• Same difference. हो तेच,
◆ १७)
well एखादे वाक्य सुरू करताना किंवा पुन्हा एखाद्या विषयाकडे परतताना
पुढीलप्रमाणे
well चा उपयोग केला जातो.
• उदा:Well, I
must leave now.
बरं, मला आता निघायलाच पाहिजे.
• Well, let’s start now.
बरं, आपण आता सुरुवात करू या.
• Well then, let me leave now.
निघतो मी आता.
• Well now, what do you think should be done?
बरं आता, काय करायला पाहिजे असं तुला वाटतं?
• (Very) well, now that you insist so much, I will come.
बरं, ठीक आहे, तू आता
एवढा आग्रह करत आहेस तर येईन मी.
◆ १८)
In the
world आश्चर्य व्यक्त करण्यासाठी किंवा
वाक्यावर जोर देण्यासाठी खालीलप्रमाणे in the world चा उपयोग
केला जाऊ शकतो :
• He doesn’t have a worry in the world.
कसलीच काळजी नाही त्या माणसाला.
• What in the world are you doing in the cupboard?
काय करत आहेस तू कपाटात?
◆ १९) Don’t
be (so) silly.
मूर्खासारखं वागू नकोस.
◆ २०)
Be your
age / Act your age.
तुझ्या वयाला शोभेल असं वाग.
++++++++++++++++++++++
◆ २१)
All right.
ठीक आहे/मला मान्य आहे.
◆ २२) Mind
your own business, .
स्वत:चं काम बघ.
◆ २३) Hold your tongue.
तोंड सांभाळ.
◆ २४)
I had a
hunch that you would come today.
मला वाटलंच होतं तू आज येशील.
◆ २५)
You are
not fat at all – it’s all in the mind.
तू अजिबात लठ्ठ नाहीस – तसं वाटतंय तुला फक्त.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
◆ २६) Mind
your language.
तोंड सांभाळून बोल/नीट बोल.
◆ २७)
Here,
mind, you are standing on my foot!
अरे बघ, माझ्या पायावर उभा आहेस तू.
◆ २८) Wait a
minute / Wait a moment …. I am just coming.
एक मिनिट – आलोच मी.
◆ २९) What’s
all this nonsense?
काय आहे हा सगळा मूर्खपणा?
◆ ३०) You
have spilt my tea… you nitwit!
माझा चहा सांडून टाकलास तू… मूर्खा!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
◆ ३१)
I will see
you tomorrow morning, okay?
मी तुला उद्या भेटतो – ठीक आहे?
ठीक आहे मग, उद्या भेटू.
◆ ३३)
Slow down!
What is the rush?
जरा हळू घे/हळू हळू कर….. कसली घाई आहे?
◆ ३४)
What is
troubling you, dear?
काय त्रास आहे तुला बेटा?
◆ ३५) What’s
your business here?
इथे तुझं काय काम आहे?
&&&&&&&&&&&&&&&&&&&&
◆ ३६) It/This
is not the case.
अशी गोष्ट नाही.
◆ ३७)
Watch your
language.
तोंड सांभाळून बोल.
◆ ३८)
Are you
going to help me – or what?
तू मला मदत करणार आहेस की काय म्हणतोस?/की काय
विचार आहे तुझा?
◆ ३९)
Okay, wise
guy, if you are so damned smart, why don’t you do this yourself?
बरं, शहाण्या, तू इतका
भलताच हुशार आहेस तर तू हे स्वत: का करत नाहीस?
◆ ४०)
Get out of
my sight.
तोंड काळं कर.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
◆ ४१)
Don’t
get/act wise (with me).
(मला) शहाणपणा दाखवू नकोस.
◆ ४२)
Idon’t
care/who cares?
मला पर्वा नाही.
◆ ४३)
Enough of
this! / Enough is enough! I don’t want to hear this again.
आता पुरे/बस आता/खूप झालं… मला हे पुन्हा ऐकायचं नाही.
◆ ४४) That’s enough, Pravin, give that pen
back to her.
आता पुरे / बस झालं, प्रवीण, तो पेन तिला परत दे.
◆ ४५)
Welcome!
सुस्वागतम / (तुमचे) स्वागत आहे!
**************************
◆ ४६)
Welcome to
India.
भारतात तुमचे स्वागत आहे.
◆ ४७)
Welcome on
board.
विमानात तुमचे स्वागत आहे.
◆ ४८)
Welcome
aboard.
बोटीवर/जहाजात तुमचे स्वागत आहे.
◆ ४९) As you
wish/prefer / like.
जशी तुझी इच्छा/मर्जी.
◆ ५०)
(OK) see
you around.
(बरं) भेटू पुन्हा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा