सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

बोधकथा स्वामीभक्त हत्ती

 


      एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो

 हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा

 राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.

        काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे

 राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या

 हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती

 सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे

 हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.

        वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे

 तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत

 त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे

 कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला

 सुरुवात केली.

        कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल

 आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या

 टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता

 गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला

 बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.

त्याने राजाला असा सल्ला दिला,”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे

 वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा

 सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे

 नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू

 लागले.

          सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या

 घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री

 संचारली आणि तो  त्या दलदलीतून बाहेर पडला.

       त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या

 माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.

तात्पर्य

निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा